परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

९-१० च्या सायन्स - गणिताला सोडून क्लास लावायची खरंतर गरज नसते सर्वसामान्य बुद्धीच्या पाल्याला. सेमिइंग्लिश असेल तर आठवी जरा खडतर होते पण ठिके ना दोन टक्के कमी पडले आठवीला तर अशी कोणती जगबुडी होते? अर्थात शिकवणारे निदान बरे तरी हवेत यासाठी. प्रत्येक वर्षी अमुक एक मार्क(म्हणजे ९५% च्या वरच) हवेतच, पहिला नंबर आलाच पाहिजे इत्यादी अट्टाहास मला तरी अनाठायी वाटतो.<< अगदी अगदी पटलं

परत येण्याचा जे लोक विचार करत आहेत , ज्यांनी केला आहे , ज्यांनी अमलात आणला आहे त्यापैकी कोणीच उद्योजक होण्याचा विचार केला नाही किंवा ईथे तसा विचार मांडला नाही , प्रत्येक जण खर्च आणि त्याप्रमाणे जॉब असाच विचार करतोय......काय कारण असाव....चंपक सोडुन्........

अमा, टायगर मॉमची पॅरेंटिंग स्टाईल ऑथॉरेटियन वाटली. मला नाही आवडली. करमणूक म्हणुन पुस्तक ठीक आहे पण .....
>>शाळे नंतर ग्रॅड व पीजी शिक्षणासाठी तरी यूएस, युके, सिंगापूरला पर्याय नाही.
देशातही भरपूर पर्याय आहेत. माझा नवरा ८७ मधे इथे आला. त्यानंतर २००० पर्यंत आमचे ओळखीचे/नात्यातले बरेचजण आपल्या पाल्याला इथे शिक्षण्/नोकरी साठी पाठवण्यासाठी उत्सुक असायचे/सल्ले मागायचे. नंतर हळु हळू कमी झाले. सद्ध्या माझ्या जवळच्या नात्यात कुणीही इथे यायला तयार नाही कारण तिथे शिक्षण्/नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

भारतात आई-वडील दोघांचे कामाचे तास, प्रवासात जाणारा वेळ, डेकेअर्सची अवस्था बघता आजकाल निव्वळ होमवर्क करुन घेण्यासाठी मुलांना अगदी पहिली पासुन क्लास लावतात असे माझी आई म्हणाली. माझी मावशी आणि काका त्यांच्या नातीचा अभ्यास करुन घेतात त्यामुळे अजून तरी क्लास लावायला लागला नाहिये पण त्यांना स्वतःला मोकळा वेळ फार कमी मिळतो. सगळ्याच घरातून अभ्यासाला मद्त करणारे आजी-आजोबा असतीलच असे नाही. पूर्वी आजी-आजोबा नसले तर बरेचदा पाळणाघरातल्या काकु, मैत्रीणीची आई वगैरे बरेच मदतीचे हात असायचे. आता तशी परीस्थिती नाही. मुलं पाळणाघरातून होमवर्क साठी शेजारच्याच बिल्डिंगमधे ट्युशनला जातात. एकदा का पहिली पासून सवय लागली की नंतर स्वतःचा स्वतः अभ्यास करणे कठिण जाते.
इथेही भारतीय्/आशियायी लोकं जास्त संख्येने आहेत तिथे मुलं क्लासला जातात. आमच्या गावात क्लास हा प्रकार नाही. त्यामुळे 'कुमॉन नाही? मग आता..' हा प्रश्न मला बरेचदा विचारला गेलाय. आमच्या इथे खरे तर मुलाला जमत नसेल तर शाळेला एक्स्ट्रा मदत करावी लागते आणि शाळा करते पण तरीही आशियायी लोकं मुलांना क्लास लावतात.

महागुरु <<<<<<<<<माझ्या मित्राने शिक्षिकेला सांगितले की तिला पहिले काही महिने पटकन समजणार नाही तर कृपया लक्ष द्या. शिक्षिकेने सरळ सांगितले की मला प्रत्येकाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मित्र म्हणाला ठिक आहे, पण मुलगी ज्यावेळी काही प्रश्न विचारेल त्यावेळी थोडे समजाउन सांगा. त्या शिक्षिकेने सांगितले की सरळ सांगितले की वर्गात ६० मुले आहेत , प्रत्येकाने एक-एक प्रश्न विचारला तर शिकवायचे कधी?>>>>>>>>>>>
हे सगळं प्रत्येक शिक्षकांवर असतं. माझ्या मैत्रीणीचा अनुभव एकदम वेगळा आहे. तिच्या मुलीला हिंदी अजिबात येत नव्हतं आणि ती नापास झाली चाचणी परिक्षेत. पण शिक्षकेने मेहनत घेतली इतकच नाही तर पुढच्या परिक्षेत चांगले गुण मिळाल्यावर वर्गात अभिनंदन केलं सर्वांसमोर. मुलांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. आपण इथे नाही का म्हणत शेवटी कोण शिक्षक आहे त्यावर अवलंबून असतं.

मनीष , भारतात नक्कीच खूप पर्याय आहेत. पण इथे मानसिकता अशी आहे कि मुलांना परदेशीच शिकवायला पाठ वायचे. पण सर्व फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स भारतातच शिक्षण घेउन जातात त्यामुळे येथील शिक्षणाबद्दल काहीही वाद नाही. देशी पालकांचे स्वप्न असते. पोरे हार्वर्ड, येल व्हार्टन एमायटी, बर्कले मध्ये शिकावीत असे म्हणून मी तसे लिहीले. तुमची मानसिकता तशी आमची पण. इथे बसून वाट्ते परदेशीचे शिक्षण द्यायचे तर कसे करावे काय सोय करावी. वरीलच असे नाही पण नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, डिजायनिन्ग, केशकर्तन, बयुटी, मेकप शास्त्र फोटोग्राफी, हॉटेल मॅनेजमेन्ट मध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत. ते आपल्या नजरेतून सुटू नयेत असे वाट्ते. हे पोस्ट फार विनोदी वाटायची शक्यता आहे. आता पिड्त नाही. Happy

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

पैका टाका नि मग काय ते बोला << दुर्दैवाने मी पाहिलेल्या भारतात पण आता असेच आहे...
आम्ही शाळेत असताना गरीब विद्यार्थाना घरी बोलावून शिकवणारे चितळे मास्तर त्यानंतर ५/६ वर्षानी पिंगेज क्लासेस मधे रुपांतरीत झाले..

>>> बरं बोलायला जावं तर झक्की
Lol Lol

सॉरी, चांगली चर्चा चालली आहे, पण हे वाचून रहावलं नाही.

भारतात कधी कधी क्लासला जाणे हा नाईलाजही असतो. अमुक क्लासला जा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा! मग पालक आणि मुलं करणार काय?

chanchal<<<<बुवा, माझ्या मुलाच्या बाबतीत पण सारखाच अनुभव आहे. त्यालाही आजी आजोबांबरोबर रहायला खुप आवडते पण रुटीन मधे आला की पुन्हा नेहेमिसारखा असतो, त्यावरुन आम्ही निष्कर्ष काढ्लाय की त्याला नातेवाईक असले तर आवडतात आणि नसले तर काहि अड्त नाही. आणि मला वाटते तेच बरंय. फार हळवी मुलं असली की बाहेर अ‍ॅड्जस्ट होणे कठिण जातं.>>>>>
असं नाही. ही मुलं मोठी होत जातात तशी तशी त्यांची भारताबद्दल उत्सुकता वाढत जाते, कारण इथे राहूनही आपण त्यांना तिकडचे संस्कार शि़कवतो (आणि यात चुकीचं काही नाही), गोष्टी सांगतो. काही काळानंतर त्यांना आपण भारतीय आहोत याचा अभिमान वाटायला लागतो आणि त्यातूनच या इतर गोष्टी त्यांना जाणवायला लागतात, म्हणजे आपल्याला आजी आजोबा, नातेवाईक यांचा सहवास लाभात नाही इत्यादी.

बापरे या बीबीने अचानक एवढा वेग पकडला की वाचून काढेपर्यंत दमछाक झाली.
असो जुलै मधे परत आल्याला ४ वर्षे होतील. सुरूवातीला काही अनुभव लिहिले होते.
आता सवडीने पुन्हा लिहिन.

आई-वडिल हेच परत जायचे कारण असेल तर इथे(अमेरीका) सिटीझन झाल्यानंतर त्याना आणता येते का अमेरीकेत?

आंतर्जालविषयक कयद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

आईवडिलांसाठी greencard Processing करता येतं (२००३ मधे मला २ वर्ष लागली होती).

आईवडिलांना आणण्याआधी मेडिकल ईंशुरन्सचा विचार करावा..
Pre-existing condition असेल तर भरपूर मोठा हफ्ता बसतो.

धन्यवाद. <<आम्ही सगळे भाऊ इथे आलो, ग्रीन कार्डावर. नागरिकत्व पण घेतले नव्हते.>> हे जरा सविस्तर सांगता येईल का? ग्रीन कार्ड असताना आई-वडीलांना आणायला(६ महिन्यांपेक्षा जास्त) कोणता विसा प्रोसेस करावा लगेल? (प्रश्न अस्थानी असेल तर कुठे विचारता येईल?)

आई-वडिल हेच परत जायचे कारण असेल तर इथे(अमेरीका) सिटीझन झाल्यानंतर त्याना आणता येते का अमेरीकेत?
>>>>अर्ज केल्यावर ६ महिन्यात ग्रीनकार्ड मिळते. पण परदेसाई यानी म्हटल्याप्रमाणे मेडीकल इन्शुरन्स चा विचार व्हावा.
माझ्या वडीलानी यायला सरळ नकार दिला. ते २०१० पर्यंत ३ वेळा आले. एकदाही २ महिन्याच्यावर टिकले नाहीत. अमेरिकेत घरात पाउल टाकल्या टाकल्या निघण्याच्या दिवसाची तयारी करायचे. सो आमचे विमान तिकडुन परत आले Happy
मला माझ्या बहिणीसाठी अ‍ॅप्लाय करायचा होता पण आम्हीच तिथे राहणार नाही मग तो विचार बारगळला. जे तिथे आहेत त्यानी आपल्या भावंडांसाठी अ‍ॅप्लाय करायचा जरुर विचार करावा. लागतील १०-१२ वर्ष पण ग्रीनकार्ड तरी होइल.(सॉरी थोडेसे विषयांतर).

मनस्मि, माझ्या साबा-साबुंना ईकडे आवडते..माझ्या आजुबजुला त्याण्च्यासाठी बरेच समवयस्क असल्याने त्यांनाही बरे वाटते. ईकडे आल्यावर रोज फिरायला जाणे, भाजी आणने अशी कामे आमच्या मदतीविना करतात. दोन्ही मुले ईकडेच असल्याने त्याना ईकडे यायला, रहायला आवडते. त्यामुळे त्याना एखादे वर्ष राहुन ईकडेच रहायला आवडेल का ते बघायचे आहे.

शाळेविषयी थोडे

मी येथील शाळा पद्धती आणि तेथील नवीन पद्धत (वर्गात ३० -३५च मुले) आणि ICSE,CBSE पद्धत ह्यांचा अभ्यास केला आहे. तिसरी व चौथी चा खास करुन. तेथील ३ री मधील पाल्य येथील मुलांच्या समोर असतो, तेच चौथी बाबतीत. त्याला जास्त माहिती असते. पण अमेरिकेत माहिती करुन घेण्याची पद्धत चांगली आहे. उदा मुलांनाच गुगल किंवा इतर गोष्टी वापरून एखादी केस स्टडी लिहिने, त्यामुळे मुल जास्त प्रेझेंटेशन ओरियेंटड होतात ही खूप चांगली बाब आहे. मी ज्या शाळेत माझ्या मुलीसाठी प्रयोग करून पाहिला त्या टाईपच्या शाळेत हीच पद्धत आहे. मुलीला डिफरंशीएट करायला सांगीतले आणि तिला दोन्ही शाळेच्या पद्धती मध्ये (३ री साठी) फरक वाटला नाही. उलट तेथील ३ री च्या सिलॅबस मुळे तिला माहिती जास्त मिळाली. तीला पण वेळोवेळी गुगल वगैरे वापरून तिचा प्रोजेक्ट पूर्ण करायला सांगीतले. त्यामुळे इकडील पद्धत आता तिकडे बर्‍याच शाळात रुळत आहे.

शाळांमध्ये (ह्या नवीन पद्धतीच्या) डेस्क पासून सर्व अमेरिकनाईज आहे. शाळेत स्वीमिंग पुल पासून टेनीस कोर्ट ते मोठे ग्राउंड (जी माझी गरज) अशा शाळा आता गेल्या ५ एक वर्षांपासून निघत आहेत.त्यामुळे जे लोक आजही ६० + मुलांच्या शाळेला (आपल्या मनात तेच इंम्प्रेशन असल्यामुळे व आपणही त्याच शाळेत शिकल्यामुळे) नावे ठेवतात त्यांनी अशा शाळांकडे लक्ष देऊन बघावे. माझ्या सुदैवाने अशा दोन शाळा माझ्या घराच्या २ किमीच्या आत आहेत.
ह्या पद्धतीच्या शाळात मुलांना होमवर्क असते पण ते अमेरिकेसारखे रोजचे दोन पानं वगैरे. तसेच सहामाही परिक्षा नाही तर दर महिन्याला युनिट टेस्ट सर्व विषयांची, त्यावरून वार्षीक % काढले जाणार, त्यामुळे अ‍ॅव्हरेजला स्कोप आणि नेमके परिक्षेत (वार्षीक) आजारी वगैरे पडणे, किंवा दडपण असे नाही हे मला आवडले. अमेरिकेतही असेच काहीसे आहे. ( मी मिडल स्कुल वा हायस्कुल बद्दल बोलत नाही याची नोंद घ्यावी)
तिला अमेरिकेतून आली म्हणून काही सेपरेट वागणूक नव्हती कारण अर्धे मुलं अमेरिकेतुनच आले होते. Happy को एड आहे, हेडमास्तरीन बाई थोड्याश्याच रुड आहेत हे ही लक्षात येते कारण त्यांच्या टर्म मान्य नसतील तर दुसर्‍या शाळा पाहा असे त्यांनी इतर पालकांना सांगीतले आहे कारण डिमांड आणि सप्लाय हेच दिसते, इतर पालक लगेच अ‍ॅडमिशन घ्यायला तयार. पण मुलांकडे योग्य ते लक्ष दिले जाते. माझी मुलगी साडे तीन महिन्यात मराठी पेपर ततपप करत का होईना वाचू लागली होती.

ह्या शाळात असणारी मुले आणि आपण ज्या शाळात शिकलो ह्या खूप फरक आहे हे मला जाणवले. मी इतर शाळा जशा प्रसिद्ध DAV सिटी इन्टरनॅशनल वगैरे पण पाहिल्या पण त्या आम्हाला प्रयोगासाठी आवडल्या नव्हत्या. ब्लु रिज पण पाहिली होती, तसेच पोद्दार पण. पोद्दार ही शाळा खूप चांगली आहे पण ती फार लांब होती,

ह्या प्रयोगाकडे मी फार सिरियस पणे बघीतले होते त्यामुळे मुलीचे कुठलाही दबाब न टाकता आलेले इनपुटस फार महत्वाचे होते. प्रयोगानंतर मुलीला विचारले की पुढे कुठे शिकणार, तिने त्वरीत उत्तर दिले की भारतात! कारण ती वापस येताना गणपती आले होते आणि ती त्यात (शाळेत) एक गाणे म्हणनार होती तसेच कॉलनीत एक नाचही बसवला होता, त्या आधी १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात तीने शाळेत दोन गाणी बसवली होती.

दुसरी बाब म्हणजे माझे भारतातील सहकारी, ज्यांना मी प्रोजेक्टवर इकडे बोलावून घेतले, त्या पैकी काही लोकांचे मुल ऑर्कीड नावाच्या शाळेत शिकत होते. ते मुलं इथे दुसरी, तिसरीत गेले, त्यांना इथे शाळेत सेटल व्हायला अजिबात वेळ लागला नाही, अगदी इंग्लीश कम्युनिकेशन मध्ये पण! शिवाय ते त्यांच्या सहकार्‍याच्या व इथे शिकणार्‍या माझ्या मुलीच्या थोडे पुढेच आहेत.

आणि म्हणूनच मी लिहिले की मुलांना प्रॉब्लेम येत नाही. ज्यांनी केवळ त्यांच्या काळचाच भारत पाहिला त्यांनी हा भारत पाहण्याची पण आवशक्ता आहे. कारण पैशामुळे बर्‍याच गोष्टी आता सुसह्य होतात.

कुठे राहावे हा केवळ वैयक्तीक निर्णय आहे, अमेरिका ही चांगली भारतही. काही मुद्दे इथे जास्त चांगले तर काही मुदे तिथे जास्त वाईट! आपण कसे जुळवून घ्यायला तयार आहोत ते महत्वाचे . मुळात तिथे जायची गरज नाही, इथे राहावे वाटले इथे राहावे, पण गेलोच तर तिथे गेल्यावर जुळवून घ्यावे लागते हे अध्याह्रुत आहे. अपेक्षा घेऊन गेलो की वापस यावेच लागते.

सोनपरी, माझ्या माहितीत बरेचजणानी ६ महिन्याचा विझिटर विसा इथे आल्यावर पुन्हा ६ महिन्यांसाठी वाढवून घेतला होता. पण माझी माहिती बरीच जुनी आहे. आता रुल्स बदलले असल्यास माहित नाही.

केदार तुमच्या मुलीची शाळा कोणती आहे? आम्ही मुलगी २-३री त गेल्यावर भारतात परतण्याच्या विचारात आहोत.

विस्डम वल्ड स्कुल, औंध अनेक्स.
माझी मुलगी अमेरिकेतच शिकत आहे पण मी मागील वर्षी जुन ते सप्टे मध्य असा प्रयोग करून पाहिला होता.

छान धागा आहे..बर्याच दिवसा पासून वाचते आहे..
आज माझ्याही मनातले विचार मांडते आहे.आम्ही मुलगा ३ री ला होता तेव्हा इकडे आलो ..तसे तिकडे चांगले चालले होते ,मी नाहीच म्हणत होती पण नवर्याला इकडे यायचेच होते.दोघे IT मध्ये होतो, माझा पण h1 visa झाला पण तो आधी पुढे आला ...२००७ recession year!
सुरुवातीला नवरा भारतीय consultanting कंपनी मध्ये होता ,कमी महिन्यांचे contract असलेले प्रोजेक्ट मिळत होते म्हणून मी पण जाऊ शकत न्हवती, माझा पण जॉब पुण्यात सुरु होता.नन्तर त्याने एका कंपनी बदलली ,कायम स्वरूपी जॉब असल्याने मी पण इकडे आली.पण चुकीच्या वेळी आल्याने इकडे पण प्रोजेक्ट मिळत न्हवता आणी आम्ही राहतो तिथे १,२ कंपन्या होत्या ..सुरुवातीला मुलगा पण adjust होत न्हवता.त्याच्या वयाचे मुलंच आम्ही राहतो तिथे न्हवते..खूप मिस करायचा तो भारतातल्या मित्रांना ! म्हणून मला मी पण दुसरीकडे जॉब शोधणे योग्य वाटत न्हवते .अशात ६ ,७ महिने गेले.जवळ पास जॉब करायचा असल्याने प्रयत्न सुरु होते पण यश आले नाही ..मग काय सगळ्यात शापित असलेला व्हिसा मिळाला h4! माझ्या दृष्टीने तरी!
मग तर सगळाच आनंद होता ...apply केल्यावर फोन तर यायचे पण h1 म्हटले कि सॉरी उत्तर यायचे.हळू हळू ओळख झाली ,मैत्रिणी मिळाल्या,मुलाला पण एकाद दुसरा मित्र मिळाला पण त्याला पहिले वर्ष जरा अवघड गेले शाळेत पण मिक्स होण्यासाठी जड गेले ...पण त्याने केले adjust नवर्याला ४,५ वर्ष राहायचे होते ...मला वाटायचे कि परत जावे आणि भारतात जॉब करावा पण एकटे कसे manage होईल याचा विचार करून टेन्शन यायचे !आता मुलगा ५ वी ला आहे ,दर वर्षी सुट्टी मध्ये भारतात जातो ..पुढच्या वर्षी कायमचे जाणार आहोत म्हणून मी तिकडची पण पुस्तके घेवून येते आणि वेळ मिळेल तसे शिकवते ...क्लास लावला नाही , घरीच अभ्यास करतो आणि अडले तर विचारतो आणि french चा अभ्यास पुस्तक व कॉम्प्युटर वर करतो.अजून तरी मला क्लास किंवा kumon ची गरज वाटत नाही ..पण पुढच्या वर्षी भारतात गेल्यावर मुलाच्या अभ्यासाचे कसे होईल याचे टेन्शन आहेच..!पण नंतर होईल असे वाटते .
माझ्या एक्स्पीरियंस मध्ये gap वाढली आहे पण आता तरीही प्रयत्न करायचे ठरवले आहे ..१,२ certifications पण केली आहेत.बरेच काही हरवले तर थोडे फार गवसले ! असेच आमच्या काहीसे अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दल महता येईल !

भारतात जायची ओढ लागली आहे.जॉब मिळाला असता तर थोडे फार सुसह्य झाले असते इथले राहणे ...दोन महिन्यांपूर्वी एका कंपनी मध्ये इंटरव्ह्यू झाले ,चांगले ४ राउंड्स पण नंतर काही झाले नाही ..निराश झाली होती पण आता परत प्रयत्न सुरु आहेत.
मला तरी इथले जीवन एकसुरी वाटते ,भारतात कसे नेहेमी चहल पहल असते ..lively वाटते असे माझे मत आहे.माझ्या मुलाला भारतातच जास्त आवडते म्हणून तो लवकर रुळेल याची खात्री आहे.हा काही गोष्टी सोडाव्या लागतील पण बरेच काही गवसेल असे मनोमनी वाटते.

त्यामुळे जे लोक आजही ६० + मुलांच्या शाळेला (आपल्या मनात तेच इंम्प्रेशन असल्यामुळे व आपणही त्याच शाळेत शिकल्यामुळे) नावे ठेवतात त्यांनी अशा शाळांकडे लक्ष देऊन बघावे.>>>> अतिशयच महत्त्वाचे आहे हे वाक्य.
मस्त पोस्ट केदार.

काहीही करून आपल्या मुलाने अमेरिकेत पीजी करावं ह्या माईंडसेट्मधून भारतीय पालक बाहेर येत असतील तर चांगलचं आहे.
माझ्या ओळखीत किमान अशी ४-५ तरी मुलं आहेत ज्यांनी अमेरिकेतल्या कोणत्यातरी सामान्य दर्जाच्या विद्यापीठांमधून पीजी आणि Ph.D. केल आणि आता नोकरीसाठी वणवण भटकत आहेत.
त्याउलट त्यांचेच काही claasmates अमेरिकेतल्या डिग्रीच्या नादी न लागता भारतात नोकरी करायला लागले आणि आता कंपनीतर्फे अमेरिकेत येऊन पोचले आहेत. कंपनीतर्फे आल्यामुळे Medical Insurance वगैरेपण विनासायास मिळाला. Student म्हणून आले असते तर Medical Insurance पण चांगला मिळाला नसता आणि शिवाय खर्च भागवायला इथे वेटरचे काम करावे लागले असते.
CMU, Cornell, Yale, MIT वगैरे विद्यापीठांमधून पीजी आणि Ph.D. केल असेल तर प्रश्नच नाही. पण केवळ अमेरिकेत शिकायला मिळतयं म्हणून हुरळून जायचे दिवस आता संपले आहेत.
जेव्हा H1 visa साठी मोठी रांग असायची, तेव्हा अमेरिकेतल्या पीजीला वेगळा H1 कोटा असणे हा महत्वाचा फायदा होता. पण सध्या तो पण फायदा नाही.
माझ्या २-३ मैत्रिणींनी अमेरिकेतून Ph.D. केल तरी त्यांचं GC चं application eb2 category मधूनचं झालं.

सोहा

कोणत्यातरी सामान्य दर्जाच्या विद्यापीठांमधून पीजी आणि Ph.D. केल>>> अमेरिकेतील तृतिय/ चतुर्थ श्रेणिच्या मान्यताप्राप्त विद्यापिठमधून जरी तुम्ही उच्च शिक्षण घेतलत तर ते फायद्याचच आहे. नोकरी मिळणे न मिळणे हा मार्केट चा भाग आहे शिक्शणाचा नाही.

Student म्हणून आले असते तर Medical Insurance पण चांगला मिळाला नसता आणि शिवाय खर्च भागवायला इथे वेटरचे काम करावे लागले असते.>>>

वेटरचे काम करण्यात काय कमिपणा आहे? शिकणे म्हणजे काय वाटते तुम्हाला माहीत नाही पण इथे जानिटर म्हणुन काम करताना जितके अटेंशन टु डीटेल शिकता येते तितके लॅब मधे बसून सुधा नाही असा माझा वैयक्तीक अनुभव आहे... शुल्लक कामातून कमालीचा प्रोफेशनलपणा शिकायचा असेल तर जरूर एकदा अशी हलकी समजली जाणारी कामे इथे करून बघावीत... त्यातून कॉलेजचा मेडिकल इंश्युरंस खूपच चांगला असतो असाही अनुभव आहे.

त्यातूनही विद्यापिठा पेक्षा तुमचा गाईड हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो पीजी करताना. गुरु-शिश्य परंपरेतील शिक्शणाच्या तीशय जवळा जाणारी आणि उत्त्म एथिक असलेली इथली पीजी सिस्टिम चान्स मिळत असेल तर जरूर शिकायला या हेच मी म्हणेन... नोकरी मिळणे न मिळने, झगडावे लागणे हा नशीबाचा भाग...

विषयांतरा बद्दल क्षमस्व!

मी थोडासं विषयांतर करती आहे क्षमस्व..!

अमेरिके मधे शिकायला येणे, ऑनसाइट कंपनी मधून येणे, लग्न करून येणे, किंवा नंतर शिकणे / जॉब करणे हे प्रत्येक अनुभव आणि माइंडसेट वेगवेगळे असतात, त्यांचे कंपॅरिज़न होऊ शकत नाही आणि करू ही नये असा मला वाटतं

अमेरिके मधून MS , Ph.D करणं मला तरी काही गैर नाही वाटत..
हां पण कुणी अगदी अट्टाहास मात्र ठेवू नये
Medical Insurance हा काही अमेरिकेला शिकायला न येण्याचा क्राइटीरिया असु नये अस मला तरी वाटते
आणि सगळेच काही वेटरच काम नाही करत.. तुम्ही कोणत्या यूनिवर्सिटी मधे शिकताय , टाउन काय आहे फंडिंग किती आहे, तुमचा गाईड अश्या बर्‍याच गोष्टीन वर आहे ते सगळे

H1B साठी अजूनही US मास्टर्स साठी वेगळ २० K चा कोटा आहे.

कूणाकडे US मधली Ph.D आहे ह्याचा अर्थ असा होत नाही की H1/ ग्रीनकर्ड EB1 मध्ये होईल.
तुमची जॉब रिक्वाइर्मेंट , कंपनी ची लीगल डिपार्टमेंट अश्या बर्‍याच गोष्टी आहेत
इथे माइक्रोसॉफ्ट मधे बरेच Ph.D लोकं जी रिसर्च मधे काम करत नाहीत, पण Dev आहेत त्यांचा EB1 मधे होत नाही; EB1 साठी इथे रिसर्च मधे असावं लागतं
आणि जरी एखादी Dev जॉब रिक्वाइर्मेंट Ph.Dसाठी ची असली तरी लॉयर्स ना EB१ साठी convience करणे जमतेच असा नाही

Ph.D करून जर तुम्ही रिसर्च, टीचिंग फील्ड मधे असाल तर नक्की EB1 मधे H1/ ग्रीनकर्ड होऊ शकतं

Pages