इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.
- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं
-भारतातील संधी, नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थितीचा आढावा (अनुभव), वर्क लाईफ बॅलन्स (व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला देता येणारा वेळ)
- मुलं आणि तदनुषंगिक शेकडो गोष्टी ( शाळा, शैक्षणिक पद्धत, पाल्याचा सर्वांगीण विकास, भाषांचा सराव, गणिताचा सराव, वातावरणाचा सराव)
- वृद्ध होत चाललेल्या मातापित्यांची जवाबदारी. पुन्हा एकत्र आल्यावरचे अनुभव. त्यांच्या दृष्टीकोनातून तुमचे परदेशगमन आणि पुनरागमन.
- समाजाचे देणे
- दोहोंचा अनुभव घेतल्यावर आता काय करायचा मानस आहे ?
झक्की, अॅडमिशनमध्ये
झक्की, अॅडमिशनमध्ये डोनेशनरूपी लाच आहे कारण ज्या भावाने ते पैसा मागतात त्या भावाने सोय़ी शाळॆत उपलब्ध असतात का??
आणि राजकारण हा खरंच माझा प्रांत नाहीये....म्हणून त्यांनी खाल्लेल्या पैशाला काय म्हणावं हे मी सांगणं उचीत नाही..
जिथे पैसा दिला जातो/कर भरला जातो भले तो कुठल्याही देशात का असेना त्या पैशाचा मोबदला देणार्य़ास मिळत असेल तर निदान तिथे मानसिक समाधाना वाव आहे....
राहिलं समाधान सर्वांनीच पैसे भरण्याचं...काय आहे कुणालाच जोपर्यंत वाईट वाटत नाही तोपर्यंत हे नुस्तं असंच चालणार नाही तर चक्रवाढव्याजासारखं त्या पटीने वाढणार आहे...मी स्वतः कुठल्याही मोठ्या फ़ीया असणार्या शाळेत शिकले नाही पण माझं अडलं नाही..कधीतरी हे प्रायव्हेट शाळा अमकं तमकं पैशाने विकत घेता येतं हे एखाद्या कीडीसारखं आपल्याकडे शिरलं आणि ज्या वेगाने पसरतंय मागे एक बातमी आली होती की आता एम बी ए पण इतके झालेत की त्यांची गणना नाही...आता मी ज्या पद्धतीच्या शाळांमध्ये गेले किती शाळा तशा उरल्या किंवा उरवल्या आहेत????
असो हा धागा असल्या विषयांवर चर्चा करण्यासाठी नाही म्हणून इथंच थांबायला हवं..
तुम्हाला जर एखाद्या वाईट गोष्टीला चांगलं सोज्वळ नाव देऊन मानसिक समाधान मिळतंय तर घ्या...आणि काय बोलणार......
अहो मी आपले भारतातल्या
अहो मी आपले भारतातल्या यच्चयावत गोष्टींवर सतत टीका करत असे. पण जरा विचार केल्यावर पटले की तसे काही नाही, फरक फक्त 'किती प्रमाणावर' हा आहे. कुठे कमी, कुठे जास्त. म्हणून आता भारतात जे काय आहे, त्यातले जे वाईट असेल तिकडे दुर्लक्ष करायचे असे ठरवले आहे.
एव्हढे सगळे असून भारताची कितीतरी प्रगति झाली आहे. आता लोकसंख्याच इतकी प्रचंड की त्यातले टक्केवारीने अगदी थोडे लोक वाईट असले तरी संख्येने ते कधी कधी एखाद्या लहान देशातल्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा अधिक!!
कुठेतरी काहीतरी चांगले होतच असणार, चांगले लोक असणारच.
माझा एक मित्र अनेक वर्षे इथे राहून भारतात परत गेला, तो म्हणाला कामे व्हावीत असे वाटत असेल तर जरा चहापाणी केले त्या लोकांचे तर कुठे बिघडले. एकूण काम होणे हे महत्वाचे, बारीक सारीक अडचणी या ना त्या रूपाने येणारच, त्यातल्या त्यात हे तेव्हढेच सोपे.
(No subject)
धन्यवाद केदार आणि त्रिशंकु!
धन्यवाद केदार आणि त्रिशंकु!
केदार , हो. दोन्ही देशात
केदार ,
हो. दोन्ही देशात रिटर्न भरावा लागतो. दुसर्या देशात भारतातील उत्पन्न दाखवून कर भरला हे ही दाखवावे लागते.>>>>जरा सविस्तर सांगणार का?
उदा .म्हणजे समजा एखाद्याला देशात १२ लाख मिळतात वर्षाला. तर हे कसे काय दाखवायचे असते आणि अमेरिकेत काय भरायचे?
रिमझिम, रिटर्भ भरताना
रिमझिम,
रिटर्भ भरताना तुम्हाला इनकम फॉर्म अदर कंट्रीज असा एक ऑप्शन फॉर्म मध्ये येतो. त्यावर टिचकी मारा. तिथे गेल्यावर तुम्हाला किती इनकम, केंव्हा केंव्हा मिळाले व त्यावर किती टॅक्स त्या देशाने कापला हे सर्व प्रश्न विचारले जातील. भारतातील फॉर्म १६ तुम्हाला मार्च मध्ये मिळेल. किंवा तुमच्या डिसेंबर महिन्याच्या पे स्लिप वरून पण तुम्ही एप्रिल ते डिसे किती रक्कम मिळवली व त्यावर किती टॅक्स भरला ते कळेल. ती रक्कम भरायची. फेडरल मध्ये ते दोन्ही दिसेल
हे सर्व तुम्ही जर अमेरिकेचे नागरीक असाल तरच करावे लागणारच.
भारतातिल उत्पन्ना वर जो कर
भारतातिल उत्पन्ना वर जो कर भरणार असाल, त्याचा टी.डी. एस. फॉर्म तुम्ही मागु शकता. सॅलरी असेल, वा प्रोफेशनल फी असेल, तर आधीच देणारा टॅक्स कापतो. त्याचा १६ ए फॉर्म देतो. पण एकुणात जर टॅक्स जास्त असेल तर तुम्हाला अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. त्याचे रीटर्न ही भरावे लागते. भारतातिल पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
जसे तुम्ही वर उदा. दिले आहे त्या प्रमाणे जर १२ लाख पगार म्हणुन मिळाला असेल, तर तुमचा एम्पॉयर टीडीएस कापेल. त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण हेच पैसे जर तुम्हाला प्रोफेशनल फी वा भाड्या पोटी मिळाले असतिल वा ठेवींवरचा इंटरेस्ट म्हणुन मिळाले असतिल, तर मात्र जे टीडीएस कापले जाईल, ते खर्या टॅक्स पेक्षा कमी असेल. अशा वेळी तुम्हाला अॅडव्हान्स टॅक्स भरायला लागेल व रीटर्न ही फाइल करायला लागेल.
अमेरीकेतिल पध्धत वर केदार नी दिली आहे. ( मला त्या बद्दल काहिच माहिती नाही)
भारतातिल टॅक्स बद्दल काही विचारायचे असल्यास मला विपु करु शकता.
धन्यवाद मीरा. केदार, याचा
धन्यवाद मीरा.
केदार,
याचा अर्थ भारतात राहणार्या अमेरिकन नागरिकाने दर वर्षी अमेरिके मधे पण टॅ़क्स चे फॉर्म भरावे लागतात का?
याचा अर्थ भारतात राहणार्या
याचा अर्थ भारतात राहणार्या अमेरिकन नागरिकाने दर वर्षी अमेरिके मधे पण टॅ़क्स चे फॉर्म भरावे लागतात का?
----- नुसतेच फॉर्म नाही तर भारतात त्या उत्पन्नावर टॅक्स भरतो आहे हे पण दाखवावे लागत असेल, अन्यथा त्या उत्पन्नावर अमेरिकेत टॅक्स (ग्लोबल इन्कम) लागेल.
OCI धारकाला भारतात सरकारी नोकरी करता येत नाही असे वाचले ते खरे आहे का? कुणाला अधिक माहिती आहे का? मतदानात भाग घेता येत नाही या शिवाय (OCI चे) भारतात रहाण्याचे तोटे काय आहेत?
उदय - सरकारी नोकरी न करता
उदय - सरकारी नोकरी न करता येणे आणि मतदान न करता येणे. हे दोनच. बाकी एनआरआय आणि ओसीआय मधे काही फरक नाही.
भारतात १२ लाख रुपये पगार असेल
भारतात १२ लाख रुपये पगार असेल तर त्यावर अमेरिकेत टॅक्स भरावा लागणार नाहि, फॉरेन अर्न्ड इन्कम इंक्लुजन च्या नुसार. वार्षिक उत्पन्न $९१,५०० ($१८३,००० जर फाइलिंग जॉइंटली) च्या वर असेल तरच अंकल सॅमला पैसे ध्यावे लागतील.
माझ्या माहितीप्रमाणे भारतात
माझ्या माहितीप्रमाणे भारतात उत्पन्नावर टॅक्स भरल्यावर ते उत्पन्न आणि टॅक्स अमेरिकेत दाखवावा लागतो. पण Dual Taxation नसल्यामुळे परत तेवढाच टॅक्स भरावा लागत नाही.. जाणकार सांगतीलच..
याचा अर्थ भारतात राहणार्या
याचा अर्थ भारतात राहणार्या अमेरिकन नागरिकाने दर वर्षी अमेरिके मधे पण टॅ़क्स चे फॉर्म भरावे लागतात का? >>>
उत्तर हो. इनकम कितिही असले तरी आणि जरी भारतात राहत असाल व अमेरिकन नागरिक असाल ( वा अमेरिकेत राहून भारतात उत्पन्न मिळवत असाल) तर येथील रिटर्न मध्ये ते दाखवावे लागेल.
टॅक्स लागेल की नाही तो प्रश्न नाही. ९१५०० च्या वर लागेलच. पण टॅक्स लागत नाही त्यामुळे तो देश दाखवायची गरज नाही असे नाही.
वार्षिक उत्पन्न $९१,५००
वार्षिक उत्पन्न $९१,५०० ($१८३,००० जर फाइलिंग जॉइंटली) च्या वर असेल तरच अंकल सॅमला पैसे ध्यावे लागतील. >> हे फक्त earned income (salary) साठी investment income ला ही लिमीट लागु नाही.
Interesting court case about
Interesting court case about college admission for OCI in India
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Born-in-US-grew-up-here-H...
A division bench of Justice P B Majmudar and Justice Ramesh Dhanuka was hearing a petition filed by Pune residents Milind and Sujata Tendulkar after their daughter Pooja was disqualified to appear for MHT-CET exams because she is a US citizen by birth.
इथे हा प्रश्न इथे बरोबर आहे
इथे हा प्रश्न इथे बरोबर आहे की नाही माहिति नाही पण,विषय चालला आहे म्हनुन परदेशी राह्त असल्यास भारतिय नागरिकास भारतात घर्,जागा घेतल्यास कर भरावा लागतो का?
भारतात घर असेल तर नाही. पण
भारतात घर असेल तर नाही.
पण परदेशात असेल तर २०१२ पासून वेल्थ टॅक्स मध्ये नवीन रुल आला आहे.
http://economictimes.indiatimes.com/news/nri/returning-to-india/budget-2...
केदार, भारतात पण प्रॉपर्टी
केदार, भारतात पण प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतोच ना? निदान आम्हाला तरी लागत होता.
प्रॉपर्टी टॅक्स? की वेल्थ
प्रॉपर्टी टॅक्स? की वेल्थ टॅक्स?
प्रॉपर्टी टॅक्स हा महानगर पालिका घेते. जो तुम्ही एकदा का पझेशन घेतले की भरावाच लागतो. त्यात तुम्ही भारतिय आहात का नाही ह्याच्याशी संबंध नसतो. तो ती जागा तुमच्या पझेशन मध्ये आहे म्हणुन व तुम्ही पलिकेने दिलेल्या सुविधा जशा स्युवरेज, पाणी, रस्ते इ. वापरता म्हणुन असतो. त्याचा आणि वेल्थ टॅक्स चा आपापसात काहिहि संबंध नाही.
OCI धारकाला भारतात सरकारी
OCI धारकाला भारतात सरकारी नोकरी करता येत नाही असे वाचले ते खरे आहे का? कुणाला अधिक माहिती आहे का? मतदानात भाग घेता येत नाही>>>>दोन्ही बरोबर.
या शिवाय (OCI चे) भारतात रहाण्याचे तोटे काय आहेत?>>>मी OCI आहे आणि भारतात राहतोय. भारतातील रस्ते आणि ड्रायव्हिंग सोडल्यास आणि तुम्हाला भारतात सरकारी नोकरी किंवा निवडणुक लढवायची नस्ल्यास काहीच तोटे नाहीत
भारतात तुम्ही Agricultural Land खरेदी करु शकत नाही हा एक तोटा समजु शकता.
मुले ७ वी किंवा ८ वी मध्ये
मुले ७ वी किंवा ८ वी मध्ये असताना भारतातल्या अभ्यासक्रमांत आणि US च्या किती फरक जाणवतो.हिंदी ,इतिहास ,भूगोल हे विषय वेगळे असणार पण अजून मोठा कोणता फरक जाणवतो? आता मुलगा ६ वी मध्ये आहे ,आणि परतायचे विचार सुरु आहेत .
पुण्याच्या विद्याव्हॅली शाळेबद्दल माहिती हवी होती .
स्वराली पुण्यातल्या शाळा
स्वराली पुण्यातल्या शाळा अश्याच काहीशा नावाचा धागा आहे. त्यावर उत्तर सापडेल
तसेच ता धाग्यावर आहे का उत्तर ते पण पहा http://www.maayboli.com/node/13293
विद्या व्हॅलीबद्दल ऐकीव
विद्या व्हॅलीबद्दल ऐकीव माहिती - शाळा तशी चांगली आहे पण थोडी आड बाजूला असल्यामुळे commute सोयीचे नाही या कारणास्तव चांगले शि़क्षक मिळत नाहीत/सोडून जातात ब-याचदा.
पुण्याच्या विद्याव्हॅली
पुण्याच्या विद्याव्हॅली शाळेबद्दल माहिती हवी होती .>>
नक्की काय माहिती हवी आहे ?
माझ्या दोन्ही मुली विद्याव्हॅली शाळेत आहेत.
आम्ही मे २००९ ला पुण्यात परतलो तेंव्हा माझी मोठी मुलगी ८ वी ला व छोटी २ रीला होती. बारातून (NJ) निघण्यापुर्वीच विद्याव्हॅलीत प्रवेश घेतला. शाळेने अॅडमिशन साठीचे पेपर त्यांचा बारातल्या शाळेत ई-मेलने पाठवले होते. तिथल्या टिचरने ते सोडवून घेतले आणि सिलकरुन विव्हॅ शाळेला परत पाठवले.
शाळा खुप छान आहे... काही गोष्टी वगळता.. उ.दा. शाळेत जाण्या-येण्याचा रस्ता खूप खराब आहे. पालकांना सुद्धा शाळेत कंपल्सरी शाळेच्या बसने जावे लागते. शाळेच मोठ्ठ मैदान आहे. शाळेत संगीत, खेळ वगैरेला सुधा खुप महत्व दिल जात.
शाळा शहराबाहेर आहे. छान निसर्गाच्या सानिध्यात.
७ वी पर्यंतची फी ५० हजाराच्या आत आहे. ८ वी नंतरची ६० च्या आत. बस फी १५ हजाराच्या आसपास वर्षाला. पुर्ण पुण्यातुन बसेस आहेत.
मोठ्या मुलीच या आधीचं सगळ शिक्षण भारता बाहेर झालेल. सुरुवातीला हिंदी आणि केमीस्ट्री थोड कठीण गेल.. पण नंतर काही त्रास झाला नाही. सिंगापुरला असताना ती हिंदी शिकत होती. त्यामुळे तिला हिंदी लिहिता वाचता येत होत. पण नंतर चार वर्षांचा गॅप पडला.
मला वाटत की पाल्य भारतीय नागरीक नसेल तर हिंदी ऑप्शनल आहे.
अजुन काही माहिती हवी असल्यास कळवा.
अधिक माहितीसाठि विव्हॅची वेबसाईट http://vidyavalley.com/
लक्ष्मीकांत माहिती बद्दल
लक्ष्मीकांत माहिती बद्दल धन्यवाद ! फी बद्दल ,admission बद्दल माहिती हवी होती .
मी त्यांना मेल केला आहे admission बद्दल पण अजून फोन लागत नसल्याने बोलणे झाले नाही आहे .म्हणून सांशकता आहे.तसे थोडा उशीर झालेला आहे पण प्रयत्न सुरु आहेत.तुमची मोठी मुलगी ८ वी ला होती तर adjust व्हायला वेळ लागला का ?माझ्या मुलाची ७ वी मध्ये admission घ्यावी लागेल,त्याचा हिंदी लिहिण्या वाचण्याचा स्पीड कमी आहे पण लिहिता वाचता येते .पण तिकडे लेखन जास्त असेल त्याची तयारी तिकडे आल्यावरच होईल.
सध्या सुट्टी सुरु असल्यामुळे
सध्या सुट्टी सुरु असल्यामुळे फोनला रिस्पॉन्स मिळत नसेल. प्रयत्न करीत रहा. आम्ही रात्री जागवून फोन लावलेत.

हिंदीचा तसा प्रॉब्लेम नको यायला. सोबत मराठी पण होते. केलं तिने मॅनेज. माझ्या मुलीने पहिल्या वर्षी फ्रेन्च पण घेतल होतं.
स्वरालि तुम्हाला ऑल द बेस्ट.
स्वरालि तुम्हाला ऑल द बेस्ट.
स्वरालि तुम्हाला ऑल द बेस्ट.
स्वरालि तुम्हाला ऑल द बेस्ट.
धन्यवाद अमा! सध्या सुट्टी
धन्यवाद अमा!
सध्या सुट्टी सुरु असल्यामुळे फोनला रिस्पॉन्स मिळत नसेल.>> रात्री जागूनच फोन करावे लागणार आहे आता.पण ऑफिस ला पण सुट्टी आहे असे दिसते आहे.
इन्टरनेट कनेक्शन कोणते चांगले आहे.
पुण्यात विद्याव्हॅली, इंदिरा
पुण्यात विद्याव्हॅली, इंदिरा वैगरे स्कुल मध्ये हिंदी, मराठी असे विषय कितवी पासून सुरु होतात.
३री- ४थी च्या मुलांची कितपत तयारी करुन घ्यावी लागते? म्हणजे त्यांना हे विषय कितपत येण अपेक्षीत आहे?
Pages