न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,
चीनी मुली सहनशील असतात असे एकले ते खरेच का? Happy
काय काय प्रश्ण विचारलेस मग?
हे काय, ते काय, हे का लावतात? ते का लावतात? ते कधी लावतात..... (मीच थकले इथे टायपून प्रश्ण)
Happy

-------------------------------------------
रंजीश हि सही दिल हि दुखाने के लिये आ,
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ.

भेळ/कुरकुरे/केळ्याचे वेफर्स - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम (Deep fried milk balls dipped in sugar syrup) - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय

केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
भाई, सन्तिनो, अन जे उरलेत ते : तुम्ही पार्टी सप्लाइज, अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस -- संदीप
बाउल्स -- संदीप
चमचे -- संदीप
फोर्क -- संदीप
पेपर नॅपकिन्स -- संदीप
ग्लासेस -- संदीप
४ पार्टी टेबलक्लॉथ्स -- संदीप

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

बाकी गप्पांमधे हे फारच मागे ढकलले गेले होते. सुप्रभात !!!

<<<बी,
चीनी मुली सहनशील असतात असे एकले ते खरेच का?
काय काय प्रश्ण विचारलेस मग?
हे काय, ते काय, हे का लावतात? ते का लावतात? ते कधी लावतात..... (मीच थकले इथे टायपून प्रश्ण)>>>
आता याचा नि आपल्या ए. वे. ए. ठि. चा काय संबंध? अश्या लोकांबद्दल ए. वे. ए. ठि. मधे बोलले की म्हणतील हे लोक कुचाळक्या करतात!
हटकेश्वर, हटकेश्वर.

सिंड्रेला, धन्यवाद. आता कुणितरी येणार्‍यांचीहि नावे इथे जपून ठेवा. नि त्यात बी नि मनस्विनी यांची नावे आहेत का तपासा. असली नसली तरी त्यांना सांगा, अशी एकमेकांची प्रेमळ चौकशी करण्यासाठीच ए. वे. ए. ठि. आयोजले आहे तिथे या. किंवा मग बा. रा. च्या बा. फ. वर किंवा मग पु. पु. किंवा पा. सारख्या बा. फ. वर लिहा. तिथे हे शोभून दिसते.

झक्की, तुम्ही इथे "आमच्या" बाफचा अनुल्लेख केलाय...त्रिवार निषेध Wink

अरे, जीटीजी आहे वाट्टं. मला वाटलं कॅन्सल झालं की काय!!!!

आणि माझ्या नावावर पास्ताच आहे कां? (फक्त)

<<<झक्की, तुम्ही इथे "आमच्या" बाफचा अनुल्लेख केलाय...त्रिवार निष<<<>>
हे काय खाई त्याला खवखवे काय? त्यात वाईट काही नाही लिहीले आहे त्या दोघांनी, नि भ. मे. वालीने पण. फक्त या बा. फ. वर नको असे म्हंटले.

सायो, तुला अजून काही आणायचय का Happy अवश्य आण बर का!!

सिंडे,, milk balls हे curdled milk पासून की milk powder पासून ते स्पष्ट केलेलं बरं, नाही का? (नुस्त्या गुलाबजाम ने लोकांना खुलासा होत नाही.) Proud
झक्की, ह्या पोस्टचा ए. वे .ए. ठी. शी जवळचा संबंध आहे. त्यामुळे ह्या बा.फ. वरची माझी काही असंबध्द पोस्ट्स् विचारात घेऊन कुचाळक्यात मला फक्त पावणेदोन सेकंद स्थान द्यावे ही विनंती. Happy

ह्म्म, ट्रेडर जो चा क्रॅनबेरी/ऑरेंज ब्रेड करुन आणावा म्हणतेय....

लोकहो, मला माझ्याजवळील श्रीमद्भगवद्गीतेचे मराठी भाषांतर सापडले! 'महाराष्ट्र भाषा चित्रमयूर' कै. कृ. ना. आठल्ये यांनी अनुवादलेली, 'जनलोकवासी' डॉ. ना. धों. देशपांडे यांनी सुधारलेली, व द्विमित्र प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेली प्रत आहे. तेंव्हा तुमच्या जवळ हेच पुस्तक असेल, तर आणण्याची तसदी नको.

कुणाला दिलीप प्रभावळकर, किंवा मंगला गोडबोले यांची विनोदी पुस्तके वाचण्याची इच्छा आसल्यास मी घेऊन येईन.

झक्की आता इथे ग्रंथ किंवा पुस्तकांबद्दल लिहायची गरज होती का Happy आणि वर आम्हाला सल्ले देता Happy शिवाय इथे अध्यात्म आणि विनोद यात कुणाला रस आहे का हेही माहिती नाही Happy

बरं अद्याप किती ऐ. वी. ऐ. ठ्या पार झाल्या आहेत याचा हिशेब आहे का कुणाकडे?

चार चार टेबलक्लॉथ लागतात का? बापरे बरेच मेनू आणि जेवणारे आहेत Happy

आणि वाढायला डाव वगैरे लागतील ना? कुणी जर मीठ वगैरे विसरलं पदार्थात घालायला तर मीठाची एक बाटली पण ठेवा Happy

ऐ. वी. ऐ. ठ्या पार झाल्या आहेत >>>>
बी तुला कालच शिकवले ना पार्ले बाफ वर ए (e) आणि ऐ (ai)मधला फरक मग परत त्याच चुका करतोस, १० वेळा लिही ए.वे.ए.ठी. Happy

सवयीचा परिणाम Happy

ए. वी. ए. ठी. Happy

प्रत्येक ए. वे. ए. ठि. चे वॄत्तांत आहेत ना माबो वर.. माझ्या रंगीबेरंगी पानावर जा..

१. २००८ - माझ्या घरी.
२. २००८ - देवळात (लक्ष्मीकांतच्या घरी).
३. २००७ - झक्कींच्या घरी.
४. २००६ - चटणी मेनॉर.
५. २००६ - देवळात.
६. २००६ - झोपडी.
७. २००५ - चटणी मेनॉर.
८. २००२ - अखील माबो (ओक ट्री रोड).

त्याशिवाय गणपती, दिवाळी, Crown of India इथे ए. वे. ए. ठि. होतच असतात...
विनय

यंदा शोनू का नाही दिसत आहे Happy बहुतेक देशातून आणलेंलं जिन्नस संपवायचं नसेल म्हणून इथे येत नसावी Happy

झक्कि, माझ्यासाठी मंगला गोडबोलेंची आणाल का पुस्तकं? मी वाचून झाल्यावर पाठविन परत.
कोणाला बाप-लेकी, पु. ल., नवे-जुने दिवाळी अंक काही हवं आहे का?
प्राजक्ता

आणि वाढायला डाव वगैरे लागतील ना? >> बी चा काय डाव आहे कळत नाही. ऐ.वे.ऐ.ठी च्या लोकापेक्षा त्याला जास्त चिंता लागुन राहीली. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

<<झक्की आता इथे ग्रंथ किंवा पुस्तकांबद्दल लिहायची गरज होती का आणि वर आम्हाला सल्ले देता शिवाय इथे अध्यात्म आणि विनोद यात कुणाला रस आहे का हेही माहिती नाह<<>>
अहो बी! ए. वे. ए. ठि. ला पुस्तक आदान प्रदान हा एक मोठा कार्यक्रम असतो. म्हणून त्याबद्दल इथेच लिहायचे.
मला पु लं. ची पुस्तके, जुने दिवाळी अंक (म्हणजे २००५ नंतरचे) हे आवडेल.

आज घाई गर्दीत इकडे येणच झाल नाही... असो.... कोणा कडे वस्त्रहरणची विडीयो सी डी असेल तर कृपया आणावे... राईट करुन परत देईन लगेच.....
ऐ.वे.ऐ.ठी च्या लोकापेक्षा त्याला जास्त चिंता लागुन राहीली>>>>>>>> हे "कांदेपोहे/सनईचौघडे" वाले दिसतात... Proud सिंगापुरात हा मेन धंदा की जोडधंदा.... Wink

भाई.... "तारीफ करुं क्या उसकी जिसने...." आहे का कॅरिअओकी मध्ये... (शिनेमा माहीत असेलच)... Happy

भाई, मला माझी (एकमेव) गझल म्हणायची आहे तर त्याचे पार्श्वसंगीत आहे का Wink

तरिफ असेल माझ्याकडे संध्याकाळी बघतो आणि सांगतो. शिंडे कुठली गजल हवीय...
- अनिलभाई
It's always fun when you connect.

अय्याssss मैत नै तुम्हाला...ऐ ते न च...इथे आहे बघा पान नं दोनवर Wink

बगतो हा.. प्र्याक्टीस सोडू नका हा. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

<<<"तारीफ करुं क्या उसकी जिसने...<<<
आयला, एव्हढे जुने गाणे! मग मेरे 'सामनेवाली खिडकीमे,' किंवा 'यक चतुर नार' किंवा 'रमय्या वस्तावय्या' किंवा माझे आवडते 'देखिये साहिबो, वो कोई और थी और ये नागिनि, मैं उनसे मरता हूं, ह्हा!' 'मेरे मनकी गंगा' किंवा ' सौ साSल पहिले, मुझे तुमसे प्यार था,' अशी अनेक गाणी आहेत. त्यापेक्षा मला त्यातल्या त्यात नवीन म्हणजे 'मौज्जा मौज्जा' Where's the party tonight' अशी गाणी छान आहेत.

'देखिये साहिबो, वो कोई और थी और ये नागिनि, मैं उनसे मरता हूं, ह्हा >>

अहो झक्की, नागिन नाही हो .. :p नाजनी! Happy

नाजनी म्हणजे काय? मी हा शब्द नागिनि असाच ऐकत असे. पण तुम्ही अगदी पाSर देशाच्या दुसर्‍या टोकापासून चूक बरोबर केलीत याबद्दल धन्यवाद!

मला उर्दू काही फार येत नाही पण नार, ललना अशा अर्थाने वापरत असावेत हा शब्द .. सुंदर, नखरेल स्त्री असा अर्थ असेल असं वाटतं हिंदी पिक्चर ची गाणी ऐकून .. Happy

नगिनी... Lol

नाजनी म्हणजे काय? मी हा शब्द नागिनि असाच ऐकत असे >> Lol

झक्की, 'मला चुकीची ऐकू आलेली गाणी' या बाफवर टाका हे तुमचं गाणं....

Pages