न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवस कचेरीत (की कचोरीत ??) गडबड आहे पण बायकोला हा मेन्यू दाखवतो आणि काय आणणार आहोत ते सांगतो... शतिल(ASAP)

झक्कीकाकांच्या घरच्या ए.वे.ए.ठि.ला एक मृ आली होती ना ती मृ वेगळीच. तिचीगोष्ट प्रत्यक्ष भेटल्यावरच सांगेन.
पण मृण्मयि फ्लोरिडाकर, तुम्ही डाकिरी नि पुडाच्या वड्या घेऊन या.
एक फोटो पाठव म्हणजे लावता येईल तिथे

आणि मग त्या फोटोला हार घालायचा, उदबत्त्या लावायच्या का? नि आरती करून प्रसाद वाटायचा?
मैत्रेयि, त्या ठिकाणी 'hot spot' आहे का? असल्यास जाणकाराने एक laptop घेऊन न येणार्‍यांसाठी live video दाखवावा.

मी सेट अप, क्लीन अप, पार्टी सप्लाईज, ज्यांनी अवघड पदार्थ निवडले आहेत त्यांना हवी असेल तर स्वयपाकात मदत, तिथे लहान मुलं रडायला लागली तर त्यांना फटके देऊन शांत करणे, हे सगळं करेन... Happy Proud

आणि मोठ्यांनी दंगा, रडारड केली तर??????
प्राजक्ता

झक्की आहेत ना त्यासाठी...

नयनिश.. चिकन च काय झाल.>>>>> बाकी लोकांनी बेत हाणुन पाडला..... Sad

बरं साधरण खायचा मेन्यू ठरला ना? आता मला जरा सांगा की पुस्तकांची देवाण्-घेवाण करायचि का? माझ्याकडची यादी (छोटीच आहे) टाकते २-३ दिवसात.
प्राजक्ता

>> नयनिश.. चिकन च काय झाल.>>>>> बाकी लोकांनी बेत हाणुन पाडला.....
असू असू दे... आम्ही नंतर तुझ्या घरीच येऊ एकदा जेवायला Wink

कधी ही ...... कुठला ही शनिवार चालेल Happy

पण चित्रेंना रविवारी यायचं असेल तर ?

सोड्याची खिचडी पाठवु का?

सोड्याची खिचडी पाठवु का? >> पाठवा. पण डायेट हं... Lol

नात्या, Lol (बरं मग फ्लेवर कळवा. चेरी-कोक चालेल का?)

पण चित्रेंना रविवारी यायचं असेल तर ?>>>>>>> तुमच्या कडे पाठवतो.... Proud

आमच्याकडे रविवारी चिकन नसतं...आ स्व पु असते....चित्रेंना खूप सगळ्या चिरलेल्या भाज्या मिळतील फक्त आणि शिजवलेल्या डाळी Wink

आमच्याकडे रविवारी चिकन नसतं...आ स्व पु असते....चित्रेंना खूप सगळ्या चिरलेल्या भाज्या मिळतील फक्त आणि शिजवलेल्या डाळी >>>>> सांगा चित्रे आहे का हिम्मत जायची शिटी ला आजुनही.. Proud

सोड्याची खिचडी पाठवु का?>>>>>> ए वे ए ठी ला यायच नाव नाय आणी उगाच पार्लेगिरी करतेस काय ? Wink

मैत्रेयी, हवे असलेले पार्टी स्प्लाइजमधे जेवण संपल्यानंतर disposable वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकच्या बॅगा लागलील ना की तिथे गार्बेज बीन्स असतील? कारण इथे सिंगापुरात आम्ही disposable पिशव्याही आणतो.

तुमच्या या मेळाव्याला माझ्याकडून शुभेच्छा!!!!!!!

हूं SSSSSSSSS
बकासुर परिषदेची चांगलीच तयारी चाललेली दिसते.

भेळ - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय

केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
भाई, सन्तिनो, अन जे उरलेत ते : तुम्ही पार्टी सप्लाइज, अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस
बाउल्स
चमचे
फोर्क
पेपर नॅपकिन्स
ग्लासेस
४ पार्टी टेबलक्लॉथ्स
कचर्‍याच्या पिशव्या (बी पुरस्कॄत).

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

ह्या यादीत माबोवरील तीन बडी धेंडं येणारेत त्यांची नावे (का) नाहीत ? Uhoh

ह्या यादीत माबोवरील तीन बडी धेंडं येणारेत त्यांची नावे (का) नाहीत <<
१. बडी धेंडे माहीत नाहीत.
२. धेंडाना पुरेल एवढी जागा नाही.
३. धेंडाना जमणार नाही.
४. धेंड रोमात आहेत.
५. वरीलपैकी कोणतेही किंवा सर्व..... Lol

तीन बडी धेंडं?? गुलदस्त्यात आहेत का? Proud

सSSSSप्राइज सSSSSप्राइज Wink अगं बडी आहेत धेंडं...गुलदस्त्यात मावत नाहीत Wink

ते धेंडे आहेत की धोंडे ते जरा क्लीयर करा बघु. Happy
- अनिलभाई

आल्यावर कळेलच धेंडं आहेत की धोंडं आहेत की धिंड्या आहेत Wink

तुमचा बेत मस्त आहे. पण मिसळ बरोबरचा पाव राहिला आहे.

पावभाजीतला पाव वापरणार असतील ते आर्च! Biggrin

पुस्तकांची देवाण्-घेवाण
कुणाजवळ श्रीमद्भगवद्गीतेचे मराठी भाषांतर व विवेचन केलेले पुस्तक आहे काय? असल्यास मला मिळू शकेल काय?

आता गीता वाचूनही फारसा फरक पडेल असे वाटत नाही. Proud

BTW, मिसळीबरोबर कुठला पाव जातो? पावभाजीचा की साधा स्लाईस्ड ब्रेड?

Pages