न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिसळीबरोबर पाव भाजीचा पाव सही लागतो. पण तो पाव गोड नसला पाहिजे Happy

अमृताने शीटीच्या ए वे ए ठि वेळी आणले होते ते पाव छान लागतात मिसळ व पाव भाजीबरोबर- grinder rolls.

भेळ - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय

केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
भाई, सन्तिनो, अन जे उरलेत ते : तुम्ही पार्टी सप्लाइज, अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस -- संदीप
बाउल्स -- संदीप
चमचे -- संदीप
फोर्क -- संदीप
पेपर नॅपकिन्स -- संदीप
ग्लासेस -- संदीप
४ पार्टी टेबलक्लॉथ्स -- संदीप

मैत्रेयी,
तुमच्या क्लब हाऊसमधे कचर्‍याच्या पिशव्या ठेवायला काय सोय आहे ते पाहून कचर्‍याच्या पिशव्या आणू शकशील का? आम्ही बाकीच्या वस्तू आणतो.

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

हो .ते मी बघेन. म्हणूनच मी कचर्‍याच्या पिशव्या लिहिल्या नव्हत्या आधी Happy ती बी ने ऍडिशन केली !!

झक्का, माझ्याकडे इस्कॉनचं 'भगवद्गीता - जशी आहे तशी' आहे, ते आणून देते हवंतर. पण मला स्वत:ला ते विशेष (म्हणजे अजिबातच) आवडलेलं नाही.

(बाकी तुम्ही हे ए.वे.ए.ठि.च्या बाफवर का लिहिलंय? कुठे काय लिहावं याचा काही विचार..? :P)

आता गीता वाचूनही फारसा फरक पडेल असे वाटत नाही.

अहो, ती गाढवासमोर वाचली तर फरक पडत नाही. म्हणून मी ए. वे. ए. ठि. च्या ठिकाणी वाचणार नाहीये.

घरी आणून, स्नान, पूजा करून, उदबत्त्या लावून मग वाचीन. म्हणजे मी कसा एकदम शुद्ध शुद्ध होऊन जाईन. एकदम स्वर्गात राखीव जागा.

स्वाती, पुस्तक देऊ केल्याबद्दल धन्यवाद. पण मला इस्कॉनचे पुस्तक नको. माझ्याकडे चिन्मयानंदांचे गीतेवरील पुस्तक आहे, नि कॅलिफोर्नियाचे श्री. प्रभुपाद स्वामींचे पण आहे. पण प्रभुपाद वारंवार मधे मधे ख्राइस्ट नि बायबल घुसडतात. मला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही.
तर परत ए. वे. ए. ठि. बद्दलः एकंदर किती लोक बीअर पिणारे नि किती वाईन पिणारे? जास्त आवडती बीअर किंवा वाईन कुठली? हे सांगितल्यास जे हवे तेच आणायचा प्रयत्न करीन.

अहो, ती गाढवासमोर वाचली तर फरक पडत नाही. म्हणून मी ए. वे. ए. ठि. च्या ठिकाणी वाचणार नाहीये.
झक्की Lol

इथे मस्त झक्कास बेत आहे. पण मी रगडा बरोबर पॅटीस नाही पाहीले?

अहो, ती गाढवासमोर वाचली तर फरक पडत नाही >> Lol

इस्कॉनची पुस्तकं अत्यंत बोर असतात खरंच. मी पण एकदा गीता वाचायचा प्रयत्न केला होता. त्या लोकांनी 'क्रिष्ना कॉन्शसनेस' असा एक प्रकार शोधून काढला आहे आणि त्याचा उल्लेख वाक्यागणिक करतात ते... त्यामुळे फार बोर होतं.

ओ झक्की, त्या स्वाती आंबोळे तुम्हाला 'झक्का' असं का म्हणतात? क्की काका चा शॉर्टफॉर्म आहे का तो?

शी, iskon ची मी इंग्लीश मध्ये वाचलेली पुस्तके इतकी बोर आहेत ना नी ते कृष्णाला एकदम वेगळ्याच रीतीने पेश करतात.
विषयांतर मुळे क्षमस्व.

>>> विषयांतर मुळे क्षमस्व.
Lol
मनु:स्विनी, अगं न्यू जर्सीचा बाफ आहे हा! Lol

>>>विषयांतर मुळे क्षमस्व.

तरी बरं वरच्या इस्कॉनच्या पोस्टशी निगडीत पोस्ट आहे.
त्यामुळे अशी सुसंगत पोस्ट लिहील्यबद्दल क्षमस्व म्हणायला पाहीजे खरं तर... Proud

पण महत्वाचा मुद्दा: बीअर नि वाईन. त्याबद्दल काही मते?

बीअर नि वाईन. त्याबद्दल काही मते? <<<

१. बीयर प्यायला तेवढी गरमी नाही...
२. वाईन संध्याकाळी प्यावी.

(तेव्हा दोन्ही चालतील... )

विनय Happy

ती मल्ड वाईन का ग्लु वाईन पण चालेल. Happy
- अनिलभाई

भाई मी आले जीटीजीला तर नक्की करुयात ग्लुवाईन, मात्र कुकींग रेंज हवी तिथे. Happy

काय गं अजून जर-तरच का ? वर मी काय लिहिले वाचले नाही का ? Happy

LOL खरंच बकासुर जमले आहेत सगळे Happy
मजा करा.
भाई, पहिलं पोस्ट अशक्य आहे Lol

रुपाली, तू (सहपती) फ्लोरिडाला ये बघू! कुकिंग रेंज वगैरे सगळं आहे. Happy तेव्हा झकास ग्लुवाइन करता येईल. (वरच्या यादीतलं सगळं करून खाऊ!!!!) (पांशामोऑ) "बारातल्या ए. वे. ए. ठी.करांच्या कुचाळक्या पण करता येतील!" (पांशामोऑ) Proud

आधी झक्कींच्या प्रश्नांची उत्तरे:
१. बीयरः (दुरुस्ती);--http://www.socyberty.com/Lifestyle-Choices/Top-3-Worlds-Most-Expensive-B...
२. वाईनः Red Wine

'बारातल्या ए. वे. ए. ठी.करांच्या कुचाळक्या' हा नेहमीचा कार्यक्रम करता येईल (असं म्हण).

रुनी, एकंदरीत बाराला येणं स्वस्त्यात पडेल असं दिसतंय....

विनय

वरील यादीतः झणझणीत बटाटेवडा - झक्की...

सिलेक्शनमधल्या बियर्स आणायला सांगायच्या सोडून करोना काय?<<<

'करोना प्यार है' असं गाणं म्हणायचं होतं..

विनय

करोना प्यार है
Lol

अरे केरीओकीचा प्रोग्राम करायचा का?. कोणाला इंटरेस्ट आहे का?. लवकर इथे गाणी टाका तुम्ही म्हणणार असाल ती.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

नमस्कार मंडळी.
मी वरच्या तीनहि beers (की बिअरा, की बिअरी, की काय?) ची चौकशी केली. एकतर त्या मर्यादित प्रमाणात उत्पादन करतात, शिवाय त्या आपल्या ए. वे. ए. ठि. च्या आत मिळणार नाहीत. करोना हवी आहे का? माझा विचार सॅम अडॅम्स आणण्याचा आहे. चालेल?

करोना प्यार है<<< म्हणजे करोना बीअर आवडते असे, की कुठल्या सिनेमाचे नाव? सिनेमाचे नाव नसावे. सगळे शब्द हिंदीत कसे? एकतरी इंग्रजी शब्द घुसडायला हवा ना? जसे 'करोना love है'.

अरे केरीओकीचा प्रोग्राम करायचा का?. <<< हो भाई चालेल. गाण्यांची यादी करायला वेळ लागेल. तीन चारशे गाणी आठवायची म्हणजे... Happy

ते झणझणित वड्यांचं काही बोलला नाहीत झक्की.. बियरी चालतील...

विनय

अरे केरीओकीचा प्रोग्राम करायचा का?. कोणाला इंटरेस्ट आहे का?. लवकर इथे गाणी टाका तुम्ही म्हणणार असाल ती.>>>>> भाई.. मस्त आयडिया.... पण तुमच्या कडे कॅरिओकी ट्रॅक्स आहेत का ?.. मी गाण म्हणीन पण कोरस मध्ये.... Proud एकटा न म्हणण्यात बाकी सगळ्यांचाच फायदा आहे....
अरे इकडे बियर वगैरे च्या गोष्टी चालल्यात म्हणजे बर्फ ही लागेल... कोणा कडे मोठी बर्फ पेटी आहे का? ... बर्फ आणता यईल जवळ पास कुठुन तरी..

खालील गाणी तुम्ही म्हणा
मै निकला गड्डी लेके रसतेमे एक मोड आया, उथ्थे दिल छोड आया. - गदर
ओम शांति ओम - ओम शांति ओम
धडक धडक - बंटी और बबली
कजरा रे - बंटी और बबली
नगारा नगारा (की नागडा नागडा?) - जब वुइ मेट
तोपर्यंत मी झोपेन. मग घरी जायची वेळ आली की हे गाणे म्हणा, एकदम जोरात.
मौजा हि मौजा - जब वुइ मेट

माझ्याकडे आहेत थोडे केरेओकी ट्रॅक्स. जुनी/नविन गाणी कुठली हवीत ती सांगा म्हणजे शोधुन आणेन.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

अरे वा... कराओकी का... म्हणजे आता 'सSSप्राईज .. सSSप्राईज!' मधले नमुने प्रत्यक्षात पहायला मिळणार...:फिदी:

Pages