न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ईकडे तुम्हाला भेटायला तिकीटं लागलीयत
म्हणजे कुठे? माझ्यासाठी एक घेऊन ठेव. Proud

विनय, जे काही खाण्याचं आणाणार असाल ते सकाळीच मैत्रेयीकडे ठेवून जा. म्हणजे तुम्हाला यायला उशीर झाला तरी कोणी आब्जेक्षन घेणार नाही! Happy

देसाई खरे सेलेब्रिटी आहेत... त्या मुळे उशीरा एंट्रीच शोभेल त्यांना..... बाकी मृ खाण्या बद्दलच्या विचाराला : अनुमोदन.... Proud

>>>>> मी म्हंटले त्या आधी मीच तुमची टेस्ट घेतो, त्यात तुम्ही पास झालात तर माझी टेस्ट घ्या. Lol
क्या बात है झक्की! याला म्हणतात आत्मविश्वास नि मराठी बाणा! Proud
पण हे तुम्ही त्यान्ना इन्ग्लिश मधे ठणकावुन सान्गितल असेल ना????? कस? कस? जीटीजीत हे पण म्हणून दाखवा बर! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

भेळ/कुरकुरे/केळ्याचे वेफर्स - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम (Deep fried milk balls dipped in sugar syrup) - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय
समोसा - अनिलभाई
मिळाले तुमच्या न्युजर्सीत तर बटाटेवडे- मृण्मयी
डंकीन डोनट, बार्नीज किंवा स्टारबक्सची कॉफी- मृण्मयी

केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
सन्तिनो, अन जे उरलेत ते : अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस -- संदीप
बाउल्स -- संदीप
चमचे -- संदीप
फोर्क -- संदीप
पेपर नॅपकिन्स -- संदीप
ग्लासेस -- संदीप
४ पार्टी टेबलक्लॉथ्स -- संदीप

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

- अनिलभाई
It's always fun when you connect.

ईकडे तुम्हाला भेटायला तिकीटं लागलीयत << नयनीश, तिकीटे विकून पैसे खिशात घालू नका..

विनय Happy

माझा नवरा नी पोरं ऍड केली आहेत.
झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(२+२), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

सगळे नाही हो घालणार खिशात..... फक्त कमिशन आणी गेट फी..... Wink
तसे झक्कींना बघायला पण तिकीट लागलीयत... Proud

म्हणजे मला तुम्ही कुठे लपवून ठेवणार का? एखाद्या अंधारकोठडीत? खायला प्यायला आणून द्याल ना तिथे? मग झाले तर.
माझ्याशी बोलायला अधिक पैशाचे तिकीत का?

मला सुद्धा यायला जमणार आहे बर्का. काय करुन किंवा घेऊन येईन ते अजून ठरलं नाही.
पण पुस्तकं कोणाला हवी असतील तर कळवा लवकर. स्वाती नाही येणार का ? तिची पुस्तकं परत करायची होती....

बर आता डायरेक्शन्स बद्दल सूचना :
पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
for directions, look for : 47 Franklin Drive, Plainsboro NJ 08536
काही लोकांनी सांगितले की ४३-४५ हा घर क्र. दाखवत नाही मॅप वर. ऍक्चुअली ते कम्युनिटीचं क्लब हाउस आहे अन त्याला मेलिन्ग ऍड्रेस वगैरे नाहिए. म्हणून ४७ फ्रॅन्कलिन शोधा म्हणजे सापडेल नकाशात.
घर क्र ४१ अन ४७ च्या मधे एक पार्किन्ग एरिया आहे. त्याला लागूनच मागे प्ले ग्राउंड अन स्विमिन्ग पूल अन क्लब हाउस आहे.
बहुतेक लोक टर्नपाइक ने / US १३० च्या बाजूने येतील असे दिसतेय. १३० वर दक्षिणेला जाताना डे रोड Dey Rd intersection ला उजवीकडे वळा, डे रोड वर सुमारे २ मैल गेल्यावर डावीकडे Franklin Drive लागेल. तिथे सिग्नल् नाहिए, पण लेफ्ट टर्न लेन आहे.
तो टर्न जर मिस झाला तर लगेच Scotts corner rd चा मोठा intersection अन सिग्नल आहे - हा बहुधा कोणी मिस करत नाही Happy . तिथे डावीकडे वळा, त्या रस्त्यावर second left trun is Franklin drive again.
जमल्यास मला मायबोलीवरूनईमेल टाका, मी माझा सेल नं. देऊन ठेवेन.

Dey फॉर मन्ना डे की काय ..? Wink भाई, किंवा झक्की (सिनीयर मेंब्रान पैकी कोणी तरी..) "ए मेरी जोहराजबीं " म्हणा.....

माझ्याशी बोलायला अधिक पैशाचे तिकीत का?>>> तुम्ही म्हणाल त्याला तिकीट लावु हो... तुमच्या कडे बार च्या चाव्या आहेत..... Wink

अजून काही सूचना :
१) हॉल चे भाडे $७५ आहे. आत्ताच्या अन्दाजानुसार १२-१३ फॅमिली धरल्या तर त्यानुसार contribution will be approx. $6 per family. कृपया (शक्यतो) सुट्टे पैसे आणा Happy

२) साडेअकराची ठरलेली वेळ धरली तर निदान २-३ लोक ११ पर्यन्त तिथे मला सेट अप ला मदतीला आले तर बरे होईल. (तिथे खुर्च्या, टेबल्स स्टोअर रुम मधे ठेवलेली असतात ती आपल्याला अरेन्ज करावी लागतात. टेबल जरा असेम्बल पण करावी लागतात काही वेळा. ) कोणाला जमतंय, त्यांनी इथे कन्फर्म करा. विनय ला उशीर होणार आहे. भाई, संदीप ?

३) पार्टी सप्लाइज, टेबल क्लॉथ्स , पाणी, सोडा इ चे जे कुणी इन चार्ज आहेत त्यांनी लवकरात लवकर या, त्यामुळे संदीप, सेट अप ला मदत करणार्‍यात तुला धरूनच टाकते, चालेल ना Happy
तसेही पार्टी सप्लाइज , टेबल इ.अरेन्ज केल्याशिवाय सेट अप पूर्ण होणारच नाही.

अजून कुणाला काही शंका / सूचना आठवत असल्यास इथे लिहा.

ए सॉरी, मला यायला जमत नाहीये Sad
सगळे जण मिळून मज्जा करा, फोटो काढा भरपुर! जमल्यास video पण काढा. ह्या वेळेस मी वृत्तांतावर समाधान मानेन.

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(२+२), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २)

>>>>>>>>>कृपया (शक्यतो) सुट्टे पैसे आणा

ते नसल्यास क्रेडिट कार्ड घेता का? Wink

माझा नवरा नी पोरं ऍड केली आहेत >>> सायोनारा(२+२) >>> सायो, दोन पोरं नी दोन नवरे ऐ ते न च Uhoh

इकडे राहून नवल ते काय? इकडे चार चार नवरे नी अगणित पोरं असू शकतात Wink

आणि तुझेही दोन नवरे आणि अर्ध मूल दिसतंय लिस्ट्मध्ये

बरं, येणारी मुलं कोणत्या वयोगटातली आहेत? लेकीला वेळ कसा घालवावा प्रश्न पडलाय.

एज ग्रुप्स बरेच वेगवेगळे असणार आहेत असं दिसतय.
परवा हवा बरी आहे, ४५-४८ फॅ आहे म्हणे , तसे असेल तर हॉल च्या बाहेर प्ले ग्राउंड आहे तिथे थोडा वेळ तरी नक्की खेळता येईल. उरलेला वेळ गाणी - नाच इ. पाहून एन्टरटेन होतील्च आपोआप.

आपापले डी एस घेऊन यायचं मुलांसाठी, हा का नी ना का Happy

मी एकटीच येणारे
झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(२+२), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २), शोनू (१)

छ्या, आमच्यापर्यंत डीएस पोचलं नाहीये अजून. असो, जमेल तसं खेळतील.

<<कृपया (शक्यतो) सुट्टे पैसे आणा >>
Financing, bail out असे काही उपलब्ध आहे का?
>>भाई, किंवा झक्की (सिनीयर मेंब्रान पैकी कोणी तरी..) "ए मेरी जोहराजबीं " म्हणा..... >>
हा सिनेमा आला तेंव्हा भाई कदाचित् जन्मले पण नसावेत. असले तरी आई बाबा नि दूध यापलीकडे इतर गोष्टींची जाणीव नव्हती. काही काहि प्रकार आपोआप होत असत त्यांच्या चड्डीत, त्याचेहि त्यांना भान नसेल.
मी स्वतः त्यावेळी, अर्रे व्वा, म्हातार्‍याला चळ लागला ह्! आजीबाई वर लाईन मारतो! असे म्हंटल्याचे आठवते.

<<अर्ध मूल दिसतंय >>
अर्धं मूल? ही काय भानगड आहे?
म्हणजे खरे तर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला कळले आहे, पण भोचकपणा करायला मी कुठल्यातरी विशिष्ठ शहरात शिकलो होतो, ते अजून लक्षात आहे. तर कृपया राग मानू नका!

१९६५ ... भाई जन्मले नसावेत..... ?????? भाई आता तुम्हीच सांगा....
आणी लाईन बीईन कसली आली झक्की... अहो, स्वतःच्या लग्नाच्या, ३ मुलं असलेल्या बायकोला उद्देशुन लाला केदारनाथ हे गाण म्हणतो ....

उरलेला वेळ गाणी - नाच इ. पाहून एन्टरटेन होतील्च आपोआप.> कोण नाचणार आहे?. आधी कळलेल बरं. आताश्या इथे भुकंप व्हायला लागलेत म्हणुन विचारतोय.
मला समोसे ११:३० वाजता मिळणार आहेत. तेव्हा मी १२:०० वाजेपर्यत पोचेन.

माझी जोहराजबी आली माझ्याबरोबर तर म्हणेन मी ते गाणं.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

माझी जोहराजबी आली माझ्याबरोबर तर म्हणेन मी ते गाणं.>>>>>>> माझी येणार आहे बरोबर पण मी गाण न म्हंटलेलच बर.... Wink जोहराजबीन वगैरे सोडुन घरी येवुन "छोड चले बालम हमको ..." अस काही तरी गात बसावं लागेल.... Proud

मग तुम्ही "बचपन की मोहब्बत को..." गाणं म्हणा हा का ना का Wink

डीएस म्हणजे काय ?

कोण नाचणार आहे?. आधी कळलेल बरं. आताश्या इथे भुकंप व्हायला लागलेत म्हणुन विचारतोय. >>

मृण्मयी म्हणाल्या होत्या ना की त्या लहान मुलांना बडबडगीतांवर नाच शिकवणार आहेत म्हणून...

मग तुम्ही "बचपन की मोहब्बत को..." गाणं म्हणा हा का ना का >>>>> Lol
डीएस म्हणजे काय ?>>>>> मला ही हा प्रश्न पडला होता..... पण मी आपल डी फॉर डायपर असा काहितरी अर्थ लावुन गप्प बसलो... Proud

Nintendo DS (Double Sided screen) हे मुलांचे खेळणे आहे, बर्‍याच मुलांकडे दिसते. त्यात वेगवेगळे खेळ असतात..

विनय Happy

मला पण डीएस कळलं नाही.
मैत्रेयी, मी ११.३० पर्यत येते. चालेल ना?
प्राजक्ता

अच्छा. माझ्या लेकाला १-२ फुटके disposable पेले, ३-४ चमचे, आणि ५-६ कागदीपंचे दिले तर तासभर तरी निवांत Wink

अरे वा, तुमच्याकडे खेळण्यातली कार आलेली दिसत नाहीये अजून. आमच्याकडे त्याच वयोगटात पहिली कार हातात पडली. आता घरभर कारच कार. मी दोन चार बॅकपॅकमध्ये ठेवून देईन की प्रश्नच नको.

Pages