न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी.
समुहघाण<<
घाण कोटी.
कोरोना तर कोरोना! आपल्याला काय?

मी असे ऐकले की ऐ. वी. ऐ. ठी. मधे म्हणे इतर मायबोलिकरांच्या उखाळ्यापाखाळ्या पण लय होतात Happy

इथे सिंगापुरात पण आम्ही इथले चुकार मा.बो. कर भेटलो की हेच करतो Happy

मी असे ऐकले की ऐ. वी. ऐ. ठी. मधे म्हणे इतर मायबोलिकरांच्या उखाळ्यापाखाळ्या पण लय होतात <<

नाही बा बी.. आम्हाला लय विषय असतात बोलायला... Happy
विनय

मी असे ऐकले की ऐ. वी. ऐ. ठी. मधे म्हणे इतर मायबोलिकरांच्या उखाळ्यापाखाळ्या पण लय होतात <<

नाही बा बी.. आम्हाला लय विषय असतात बोलायला... >>
बारा करांना त्यासाठी GTG ची गरज नसते. इथेच करतात ते सगळं. Proud

बारा करांना त्यासाठी GTG ची गरज नसते. इथेच करतात ते सगळं <<< Angry

तरी 'वेलकम टू सज्जनपूर' अशी पाटी लावलीय आम्ही Lol

विनय

हॉल मध्ये फ्रिज आहे वाटत... त्या मुळे माझ्या बर्फ पेटी च्य पोष्टीला काहीच प्रतीपोष्टी नाही आल्या... खरच असेल तर चांगल आहे... पण नसेल तर सोफ्ट्/हार्ड कोला मंडळी कशी पिणार .. की दारा बाहेर ठेवायची... नाहीतरी थंडी काही कमी नाही व्हायची तो पर्यंत..... Happy

फ्रीझ आहे तिथे. नयनिश तुम्ही केव्हा अन कसलं पोस्ट टाकलं होतं? परत टाका पाहू.
इथे इतर गप्पाच भरपूर दिसतायत, मला सापड्त नाहिये तुमची क्वेरी Happy

फ्रीज आहे म्हंटल्यावर काही प्रश्न नाही... हीच क्वेरी होती... आईस बॉक्स आणावा लागेल का नाजुक्/मादक पेयांकरता.....

या खेपेला ऐ. वी. ऐ. ठी. ची जाहिरात फार होते असे वाटतं नाही तुम्हाला :))

नाही. ही जाहिरात नाही. हसत खेळत चाललेली जुळवाजुळव आहे. तिकडे विशिष्ठ शहरातल्या ए. वे. ए. ठि. ला लोक उशीरा येतात, चॉकलेटचे डबे विसरतात वगैरे प्रकार आमच्यात होत नाहीत याचे हेच गुपित.

आता ज्यांना ए. वे. ए. ठि. ला यायचे नाही ते फुकट सगळे वाचून जळतात, पण काही यातून शिकावे असे कुण्णाला वाटत नाही!
हटकेश्वर, हटकेश्वर.

झक्की, तिकडे विशिष्ठ शहरातले लोक त्यांच्या शहरात तुमच्या स्वागताची तयारी करतायत आता पासूनच.. तुमच्या आवडी निवडींची चौकशी सुरु आहे (पार्ले) आणि तुम्ही.... ?

अरे, नुसत्याच गप्पा ऐकतोय केव्हाच्या... आहे तरी केव्हा तुमचं ए. वे. ए. ठि ?

>>>आता ज्यांना ए. वे. ए. ठि. ला यायचे नाही ते फुकट सगळे वाचून जळतात

'यायचे नाही' आणि 'येणे जमत नाही' ह्यातला फरक कृपया लक्षात घ्यावा. जळण्यापेक्षा आम्ही दु:खाश्रु गाळतो आहोत हे ध्यानात असु द्यावे! मनास क्लेष देणारे बोचरे शब्द वापरु नयेत ही विनंती! Proud

-ससुरुक
मृण्मयी

मृण्मयि, चुकीबद्दल क्षमस्व. अनवधानाने झाली. या देशात काय नि भारतात काय, अनवधानाने जरी आयकर भरला नाही तरी माफ करतात. तेंव्हा तुम्ही पण माफ कराल अशी आशा आहे.

मिलिंदा, वेळ, तारीख, जागा सगळे केंव्हाच ठरले. खाण्यापिण्याची चर्चा होऊन तेहि पक्के ठरले. आता मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणे चालू आहे.

माझ्या कडे चांगला कॅरम बोर्ड नि सोंगट्या, पावडर वगैरे आहे. आणू का? विनय, कधी काळी त्या श्रीलंकेच्या कॅरम खेळणार्‍या गोलंदाजासमोर फलंदाजी करायचा योग आला तर सवय करून घेतलेली बरी नाही का?
तसेच horse shoes and post हाहि खेळ आहे. कॅरम लहान मुलांना द्यायला भीति वाटते पण दुसरा खेळ त्यांना चालेल.

तिकडे विशिष्ठ शहरातल्या ए. वे. ए. ठि. ला लोक उशीरा येतात, चॉकलेटचे डबे विसरतात >>>> झक्की अहो एव्हडचं नाही... बाकी ही बरच काही बाही आहे.. जे "विशिष्ठ" लोकांसाठी राखून ठेवलय... तुम्ही येणारच आहात ना लवकरच.. तेव्हा बाकीचे सगळे "प्रकार" ही व्यवस्थित दाखवू....

झक्की, गंमतीत म्हंटलंय. प्लीज माफी मागु नका!

तेव्हा बाकीचे सगळे "प्रकार" ही व्यवस्थित दाखवू... >>> पण हे गंमतीत नाहिये हां.. नीट पूर्वतयारी करून या.. झटके सहन करायची.. Happy

प्लीज माफी मागु नका!<<<
अहो, नाही क्कशी मागणार माफी? चूक झाली ना? आता तुमच्याकडचा माफीचा साठा संपला असेल तर पुनः येईल तेंव्हा द्या, घाई नाही.
<<<<
नीट पूर्वतयारी करून या.. झटके सहन करायची..
आयला, कुणाला धमक्या देता? पुणेकरांना घाबरत नाही मी! फार तर फार माझा 'तीव्र निषेध' कराल! जसे भारतीय नेते म्हणतात की आम्ही अतिरेक्यांचा 'निषेध' करतो!!
<<<<<

प्लीज माफी मागु नका!<<<
अहो, नाही क्कशी मागणार माफी? चूक झाली ना? आता तुमच्याकडचा माफीचा साठा संपला असेल तर पुनः येईल तेंव्हा द्या, घाई नाही.
<<<<
नीट पूर्वतयारी करून या.. झटके सहन करायची..
आयला, कुणाला धमक्या देता? पुणेकरांना घाबरत नाही मी! फार तर फार माझा 'तीव्र निषेध' कराल! जसे भारतीय नेते म्हणतात की आम्ही अतिरेक्यांचा 'निषेध' करतो!!
<<<<<

चिडू नका हो इतकं... तीव्र निषेध करण्यासाठी एकच पोस्ट दोनदा पोस्टलात का? Happy

झक्की पावडर नक्की आणा. भ.मे. वाल्यांच्या कमी झाला तर त्याना उपयोगी पडेल. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

अनिलभाई, कित्ती जुन्या काळात अहात तुम्ही. हल्ली पावडर वगैरे कुणीच फासत नाही. मस्कारा, आय लाईनर, ग्लॉसी लिपस्टीक, हा थर तो थर असे बरेच प्रकार असतात Happy

भ मे वाली आहे वाल्या नाही Wink

अस का?. म्हणजे वाली - सुग्रीवा तला वाली. मला वाटल वाल्या कोळीतला. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

सिंडे, ते आदरयुक्त असावं! Happy

बी, बरीच बारकाईने न्याहाळाणी चाललेली दिस्तेय! Happy

इथे ट्रेन मधे प्रवास करतना चिनी कन्यां पासून आज्यांपर्यंत मेकअप कीट सोबत बाळगतात आणि सर्वांसमोर मेक अप करतात. पेन्सिलीनी भुवया कोरतात .. हे तर रोजचं दृश्य आहे. त्यामुळे थोडीफार माहिती आपोआप मिळाली Happy

त्यामुळे थोडीफार माहिती आपोआप मिळाली >>
बी, त्यांनाही प्रश्ण विचारलेस की काय? हे काय लावताय म्हणून? Happy

प्रश्नच येत नाही Happy

बी, त्यांनाही प्रश्ण विचारलेस की काय? >> Rofl
मीही अगदी हेच म्हणणार होते! बी, खर सांग बघू काय काय प्रश्न विचारलेस अन कशी उत्तरं मिळाली ते Happy

बघा मेकअप चे नाव काढताच भ.मे. वाली आली Happy

मैत्रेयी, ट्रेनमधे पहायचे आणि मग ऑफीसमधी चिनी मुलींना विचारले हे काय ते काय ते त्या मग त्यांची मेकअप किट काढून सांगतात याला आय लाईनर म्हणतात, त्याला ग्लॉसी लिपस्टीक म्हणतात Happy

Pages