न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाला ह्यातली पुस्तके हवी असल्यास सांगा. तसेच गणेश वेल व प्राजक्ताच्या बिया आहेत. कोणाला हव्या असल्यास सांगा.

युगांत, कृष्णकिनारा, बापलेकी, गौरी मनातली, गोफ, दुस्तर हा घाट आणि थांग, मुक्काम, विंचुर्णीचे धडे, आहे हे असं आहे, एकेक पान गळावया, खोगीरभरती, अघळपघळ, व्यक्ती आणि वल्ली, चीपर बाय दी डझन, तोत्तोचान, वाइज अँड आदरवाइज, प्रज्वलीत मने, मृदगंध (इंदिरा संत), अंतरंग (नीना कुलकर्णी), व्हायरस, प्रेषित, वामन परत न आला, स्वामी, आमचा बाप आणि आम्ही, अमृतवेल, सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा, अधांतरी, कर्कोटक (ही दोन पुस्तकं का आहेत माझ्याकडे ), निळासावळा, सावित्री, प्रेमचंद की सर्वश्रेष्ठ कहानीया, रुचिरा, सूप्स, रोटी आणि पराठे, गर्भसंस्कार, वंशवेल, मसाज- तंत्र आणि मंत्र, अडगुलं मडगुलं, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, दिवाळी अंक(२००६- ललित, किस्त्रीम, दीपावली, म. टा., मौज, अक्षर), श्री तशी सौ मेंदी विशेषांक, कालनिर्णय (२००४ ते २००९)

इंग्रजी:
_The Personality Of The Cat (Real life stories about cats)
_Life of Pi (Yann Martel)
_Playwright of The Centre: Marathi Drama from 1843 to The Present (Shanta Gokhale)
_A Suitable Boy
_The Inscrutable Americans
_A Farewell To Arms
_The Old Man and The Sea
_Indomitable Spirit (A P J Kalam)
_The Best of Sherlock Holmes
_Bapi The Love of My Life (Anushka Shankar)
_Spouse (Shobha Day)
_Soups and Starters (Cheff Express)
_Italian Favorites (Recipe Book)
_What to Expect When Expecting
_A Child Is Born
_The Expectant Father
_Baby and Child Care

मराठी चित्रपट/नाटक:
देवराई, दोघी, शामची आई, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्वास, नकळत सारे घडले

पुनः एकदा नक्की येणार्‍यांची यादी लिहायला हरकत नाही!

भेळ/कुरकुरे/केळ्याचे वेफर्स - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम (Deep fried milk balls dipped in sugar syrup) - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय
मिळाले तुमच्या न्युजर्सीत तर बटाटेवडे- मृण्मयी
डंकीन डोनट, बार्नीज किंवा स्टारबक्सची कॉफी- मृण्मयी

केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
भाई, सन्तिनो, अन जे उरलेत ते : तुम्ही पार्टी सप्लाइज, अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस -- संदीप
बाउल्स -- संदीप
चमचे -- संदीप
फोर्क -- संदीप
पेपर नॅपकिन्स -- संदीप
ग्लासेस -- संदीप
४ पार्टी टेबलक्लॉथ्स -- संदीप

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(१ किंवा १.५), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(२+१), पन्ना (२ + १/२), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

मृण्मयि, धन्यवाद.
आता हे जपून कसे ठेवायचे? माझ्या प्रिंटरमधली शाई संपली. कुठे फाईल म्हणून जपून ठेवावे तर, नुसतेच चौकोन दिसतात!
ते एक विचारायचे राहिलेच होते. पूर्वी नीट दिसत असे, पण अख्खी डिस्क पुनः फॉर्मॅट केल्यावर बरेच काही काहि कायमचे हरवले, कसे केले होते आधी ते आठवत नाही.

असो, शेवटी कागद पेन्सिल तर आहेच जवळ.

झक्की, धन्यवाद कशाबद्दल? काय जपून ठेवायचंय म्हणता?

चला मृ येणार म्हणजे भ मे पात्राचा प्रश्न सुटला Wink

झक्कींना तु दिलेली यादी छापायची आहे का ? नाही, बटाटेवडे त्यांच्या नावावर (खपवले) होते. आता तु आणणार म्हणतेस. त्यांना पुरावा ठेवायचा असेल स्वतःजवळ Wink

झक्की, तुम्हाला दिवाळी अंक हवे होते म्हणाला होतात. वरीलपैकी हवा आहे का कुठला ?

लालु, रुनी तुमची झाली का तयारी ?

ओह, तीन बडी धेंडं म्हणत होतीस ती ही होय..... Happy

सिंड्रेला, मला प्रेमचंद की सर्वश्रेष्ठ कहानीयां आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा हे देऊ शकशील का प्लीज... धन्यवाद. Happy

माझ्याकडे सध्या ही मोजकीच पुस्तके आहेत. त्यापैकी कुणाला काही हवे असल्यास घ्या:

राजा शिवछत्रपति
राऊ
मृत्युंजय
ययाति
योगी कथामृत
स्वामी विवेकानंद यांची भारतीय व्याख्याने
असा घडला सचिन (मी नाही....सचिन तेंडुलकर Wink )

The Complete Sherlock Holmes volumes I and II
Selected Short Stories of O. Henry
Wings of Fire
A Brief History of Time
Story of Civilization volume VII - The Age of Reason Begins
Letters of Swami Vivekananda

असंख्य इंजिनीअरींगची पुस्तके.... (मृण्मयी, तुम्हाला हवी आहेत ना इंजिनीअरींगची पुस्तकं ? Wink )

नयनिश,
तुझ गाण मिळाल का रे. याहू वर पाठवलय. शिंडे. तुझी गझल अजुन नाही मिळाली. तुला आणखी कुठल मराठी गाणं हव असेल तर सांग. येरे घना , तुझे गित गाण्यासाठी, रेशमाच्या रेघानी,मेंदीच्या पानावर, येवु कशी कशी मी नांदायला, झाली फुले कळ्याची.. ही काही गाणी. आणखीही आहेत. कुणी म्हणणार असेल ए.वे.ए.ठी ला तर पाठवीन. लवकर सांगा. मृ, तु कोणत गाणं म्हणणार.
Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

तुझ गाण मिळाल का रे. << भाई कॄपया अनुस्वार वापरण्यास विसरू नये ( गाणे, गाणं )

उगाच काहीतरी गैरसमज होतील... Happy

विनय

मिळाल मिळाल.... गाणं... आजुन ऐकायच आहे पण मिळाल..... धन्यवाद भाई.... Happy

अनिलभाई, तुम्हीं आपली भलीमोठी पेटी भरून घरातलीं असतील नसतील तितकीं गाणीं घेऊन या. नि मग लोकांना शोधू द्यात, त्यांना कोणतें गाणें हवे ते. कसें?

आणि तें गाणे कुठलें शम्मीकपूरवर चित्रीत केलेलें, 'मुझको (का तुझको) शायद धोक्का हो गया'. बहुधा तुमच्या जन्मापूर्वीचा सिनेमा होता हा.

विनय केल रे दुरुस्त. तु कुठल गाणं म्हणणार आहेस.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

भाई, गाणं म्हणावं लागणार असेल तर मी तिकीटं रद्द करते. जीव वाचवायला देखिल मी गाऊ शकत नाही! त्या ऐवजी सगळ्यांच्या वाटणीची आवराआवरी करायला सांगा. (जेवायच्या आधी 'वदनीकवळ' म्हणेन... मनातल्यामनात!) Happy

विनय केल रे दुरुस्त <<< काय केल दुरुस्त....? Sad

मी 'रिमझिम गिरे सावन' किंवा 'पल पल दिलके साथ'.. Track असेल माझ्याकडे बहुतेक. तुमच्याकडे असला तर आणाच. तुम्ही Mike, Amp असं काही आणणार का? की मी सोय करू?

विनय Happy

भाई,

यापैकी कोणतं आहे का तुमच्याकडे? असेल तर पाठवा ना... किंवा तुमच्याकडे काय काय आहे त्याची लिस्ट द्या इथे जमल्यास...

फूलों के रंगसे, दिल की कलम से..
दिन ढल जाये रात न जाये...
ये दिल ना होता बेचारा...

दिन ढल जाये, ये दिल आहे. मी मेल करिन सन्ध्याकाळी. मला इ मेल पत्ता पाठव रे.
पल पल आणि रिमझिम पण आहे रे.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

सगळी इतकी तरल- मुलायम छापाची गाणी का?

मेरे भैस को डंडा क्यों मारा...
रामदुलारी मायके गयी...
माझ्या नवर्‍यानं सोडलीया दारू...
आरं आरं पावट्या...
अशी गाणी का नाही ?

अशी गाणी का नाही ? <<< तुम्ही तिकीट कँसल केलं ना म्हणून.. नाही तर मी भैंस को डंडा... म्हणणारच होतो.. Lol

विनय

माझ्या तिकीटाचा आणि तुमच्या म्हशीचा काय संबंध? Proud

सध्या किती हिमवर्षाव झालाय आणि किती कुडकुड थंडी आहे ते कळवा मंडळी. त्यानुसार किती विंटर जाकीटं, लोकरी कोट, स्वेटर्स, टोप्या वगैरे आणायचे ते ठरवते.

मेरे भैस को डंडा क्यों मारा...
रामदुलारी मायके गयी...
माझ्या नवर्‍यानं सोडलीया दारू...
आरं आरं पावट्या...
अशी गाणी का नाही ? >>>

Rofl काय एक एक गाणी आहेत भारी.... फार हसलो...

मॄ
'काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं' नाही येत का तुला ?

मला किस्त्रिम, दीपावली, ललित, म. टा., अक्षर ही मासिके आवडतील. वांदा एकच आहे. मी २६ फेब्रुवारी ला भारतात जाणार तो एकदम २० मार्चला परत येईन. नि तोपर्यंत बहुधा जाण्याच्या गडबडीत असेन. तेंव्हा आपण यंदा जुलै मधे पुनः माझ्याकडे ए. वे. ए. ठि. करू. म्हणजे तेंव्हा जरूर आणा.
मृ, असतील तर तीहि गाणी पाठवा! माझ्या मते रडकी किंवा गंभीर गाणी, कितीहि चांगली असली, तरी आपण मजा करायला जमतो आहोत तर असलीच गाणी बरी.

मृ,
मला वाटत खुप गर्मी असेल तेव्हा. जवळ जवळ ४५ फ, पण तुला थंडीच वाजेल तेव्हा सगळच घेवुन ये. शिवाय एक पर्सनल हीटर ची पण व्यवस्था करु. Wink
- अनिलभाई
It's always fun when you connect.

आज तसं इथेही थंडी होती पहाटे. चांगलं ५० फॅ होतं!
वेदर ऍलर्ट् साठी धन्यवाद!
तर आता यँव तँव गाण्यांची एक आणखी यादी करावी की काय?
मला लहान मुलांची बडबडगीतं भरपूर येतात. बच्चेमंडळींना म्हणून दाखवीन. Happy

जरुर मृ..
शोनु, तु म्हणुनच दाखव ते गाणं ए.वे.ए.ठी.ला.
लुगड्यात गमावल असं काहीस आहे ना पुढे. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

मृ, एकच 'एस्किमो ब्रँड'चं जॅकेट पुरेल. Wink टोप्या, हातमोजे घेऊन ये.

बेसिकमधेच पंगा आहे. किती वाजता ए.वे.ए. ठि चालू करायचंय?

साधारण अकरा साडेअकरा ची ठरवू या वेळ. फार उशीर नको. नाहीतर इतक्या मोठ्या जेवणानन्तर वेळच मिळणार नाही ती वरच्या लिस्ट मधली नाच गाणी करायला Happy

मृ, तुला बसायला इलेक्ट्रिक ब्लँकेट वगैरे घेऊन ये. आम्ही 'शेअर कर' म्हणणार नाही. Proud

साडेअकरा ची वेळ बरी आहे. फार उशीर नको. नाहीतर इतके सगळे खायला वेळ पुरणार नाही. नाच-गाण्याचे काय जो/जी नाचत/गात असेल त्याने खाण्या/पिण्यातुन बरेक घ्यायचा हा का ना का Proud

मृ, स्वेटरं/खेटरं प्याक करण्याआधी हे बघ.

खाता खाता नाच गाणी! हाकानाका!!!! Proud

एलेक्ट्रिक ब्लँकेट घेण्याइतकी गंभीर परिस्थिती आही का? खरेदी साठी रेक्विझिशन टाकते. ('ब्लँकेट पी ओ' वर पण खरेदी करता येईल म्हणा! Proud ) सायो खरंच! कंगवा, टूथ ब्रश आणि इ. ब्लँ. शेयर करु नये असं म्हणतात! Proud

एस्किमो ब्रँड? माझ्याकडे लंडन फॉग आहे! एडी बॉवरचं जॅकेट फडतुस निघालं. न्यु यॉर्कहून येता येता स्नोशूज फेकून दिले. Sad (एकाच वेळी घातलेल्या) मोज्यांच्या दोन जोडांवर आणि स्नीकर्सवर भागवेन. (हातमोजे मिशेल ओबामाने घातलेल्या हातमोज्यांसारखे बेडुक रंगाचे होते. माबोकरांच्या धास्तीने नवे वेगळ्या रंगाचे घेतले. :P) तर अशी माझी जय्यत तयारी झालीय.

सिंडे ते वेदराचं काही खरं नाही. फुटभर म्हंटला की इंचभर स्नो पडायचा. आणि निव्वळ गारठा म्हंटल्यावर हिमवादळ झालेलं बघीतलंय.

Pages