न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ते ' ये साम मसतानी मदहोस किये जा ' म्हणेन. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

सँटीनो, पण तिथे अनुराधा पटेल च्या अपेक्षेने जाऊ नकोस. पस्तावशील. Proud

सँतिने, तुला पटेल न पटेल पण तिथे एक भ मे येणार आहे बर्का Wink

सँतिने, तुला पटेल न पटेल पण तिथे एक भ मे येणार आहे बर्का >>>> सँटीनो च आडनाव पटेल आहे का ?

चाफ्या, तो पस्तावेल च हे कशावरून ?:फिदी: Happy

मी 'आज उनसे पहली मुलाकात होगी... फिर आमने सामने बात होगी ' हे गाणं म्हणणार... Proud Happy

ते 'आज उणसे पहली मुळाखात होगी.. फिर आमणे सामणे बात होगी' अस म्हणाव लागेल..
आणि ते मुळा खात खात म्हणाव लागेल Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

मी 'आज उनसे पहली मुलाकात होगी... फिर आमने सामने बात होगी ' हे गाणं म्हणणार... >>>> राकेश रोशन च गाण आहे ना ?

असेल बुवा... मला ते गाणं किशोर कुमारने म्हटलं आहे एवढंच माहिती आहे...

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/120131.html?1165471
हे वाचून ठेवा! ह. ह. ने सांगीतलेले खेळ खेळायला विसरू नका!
सॉरी हं जरा जास्तच वेळा एडीट केलं. पण एकदा ही कुजबुज वाचाच ए. वे. ए. ठी आधी!

मला 'पल पल दिलके पास...' चालेल....

विनय

आता आठवल... पराया धन पिकचर च गाण आहे " आज उनसे पेहली मुलकात होगी....

हे गाणं म्हणणार्‍याकडे घोडा आहे का ?

हे गाणं म्हणणार्‍याकडे घोडा आहे का ?>>>> हौ.. पांढरा..... Happy

सँटीनो, पेहेली मुलाकात कोणाशी? काक्यांशी ??? त्यानं काय होतंय???

मृ. अग काकवांना भेटला तर फक्त एका पैठणीच्या बदल्यात सँटीनोला त्याची "अनुराधा" पटेल. Proud

रुपाली, प्रत्येकी एकेक पैठणी म्हण! निव्वळ एका पैठणीत येव्हड्याजणींच्या मनीपर्सा शिवून होतील फारतर!

Lol

एव्हढा पण काही घेर नाहीये बरं Wink

मला "वो जब याद आए.. बहोत याद आए..." चालेल... सिनेमा: पारसमणी
झक्की, माझ्या कडे पण ईस्कॉन वाल्या प्रभुपाद स्वामींचीच भगवद गीता आहे... त्या मुळे ए वे ला न आणलेलीच बरी..... Happy

सिंडे, सांग तुझ्या मैत्रिणीला तीचा नवरा कुठलं गाणं गाणार म्हणतोय ते. नयनीश आज तु मार खाणार!!!! Proud

कॅरिओके सुरु केलं की मला फोन करा. स्पीकर फोन चालु ठेवा. मी "मैं तो आरती उतारू रे" गाऊन दाखवेन!

आरती कोण ? भ मे ? ती कशी काय उतरणार तुझ्या फोनमधुन ? ह्याचा अर्थ भ मे म्हणजे मृ असा होतो का ?

वैद्यांच्या (माझ्या मैत्रिणीबरोबरच्या) लग्नाला झालीत पाचाहुन अधिक वर्षे. वैद्या गाणं गावोत अथवा रडगाणं, मैत्रिणीला फरक पडत नै Proud

सिंडे, अशी टिंगल करणं बरं नव्हे! संतोषीमाता कोपली तर पाणी पुर्‍या संपतील तू जाईपर्यंत! Happy

सिंडे, सांग तुझ्या मैत्रिणीला तीचा नवरा कुठलं गाणं गाणार म्हणतोय ते. नयनीश आज तु मार खाणार!!!! >>>>> तस बायको ला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न नसावा.. आणी म्हणताना तिच्या कडे बघुन म्हणीन, उगाच राडा नको... Proud

वैद्या गाणं गावोत अथवा रडगाणं, मैत्रिणीला फरक पडत नै >>>>>>> सत्य कटु असते.... Sad

नमस्कार मंडळी.
गाणी म्हंटल्यावर हाताला लागतील त्या सिडी उचलून त्यावरील गाणी लिहीली. पण आता मला इतर काही गाणी सुचवायची आहेत.
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा.
रघुपति राघव राजाराम, पतितपावन सीताराम.
वंदेS मातरम, सुजलाम सुफलाम
सूतकताई करू चला, पेळू आणि टकळी घेऊन सूतकताई करू!
देहाच्ची तिजोरी. हो, अशी अवीट गोडी आहे या गाण्याला. कितीदा म्हंटले, ऐकले तरी समाधानच होत नै, नैक्का!

माझ्यातर्फे- बर्का बर्का...मैका मैका....असे ऐकु येणारे घजनी चित्रपटातील गाणे Wink

सगळी गाणी सोलोच का पण.. दोघे जण किंवा जणी किंवा एक जण + एक जणी असे म्हणा की. हवे तर एखादे समुहगाण पण होऊन जाऊ द्या..

सगळी गाणी सोलोच का पण.. << आमसोलाची कढी मेन्युत आहे म्हणून Happy

हे 'समुहगाण' काय असते?

विनय Happy

रघुपती राघव आणी वंदे मातरम ची नवीन वर्जन्स सुद्धा आहेत झक्की... तुम्ही आयकाल तर दंग रह जाओगे....
रघुपती राघव : कुच कुच होता है...
वंदे मातर्मः कभी खुशी कभी गम किंवा रेहमान नी गायलेल ही चालेल....

खरच...केलीये संपादीत Sad

Pages