न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, कॅरीओकी पण. मस्तच. हिंदी गाणी नाहीत का तुमच्याकडे अनिलभाई?

सायो,
कोणती गाणी हवीत. मला लिस्ट मेल कर लवकर.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

कोणतीही.... गाणेबल.... किशोरची वगैरे असतील तर मस्तच... माझ्याकडेही काही आहेत का ते बघते.

अरे कुणि भारत इंग्लंड किंवा भारत श्रीलंका यांचे एक दिवसीय सामने डीव्हीडी वर रेकॉर्ड करून ठेवले असल्यास कृपया घेऊन या. कॉपी करून किंवा पाहून लग्गेच उलट पोस्टाने परत पाठवीन. धन्यवाद.

"पाडाला पिकलाय् आंबा"
" जांभूळ पिकल्या पानाखाली ढोल कुणाचा वाजतो"
"अय्यय्या करू मै क्या, सुक्कु सुक्कु"
"काठी नि घोंगडी घेउन् द्या की रं, मला बि जत्रेला येउं द्या की रं"

नि विसरू नका -
"मेरे सामनेवाली खिडकी मे, एक चांदसा टुकडा रहता है"
" मै निकला,गड्डी लेके, रसतेमे, एक मोड आया, उथ्थे दिल छोड आया"
"रमय्या वस्तावय्या, रमया वस्तावय्या"
"मै झूठ बोलिया, कोइना, "
"ना तो कारवाँ की तलाश हाइ, ना तो हमसफर की तलाश है, येह इश्क इश्क है, इश्क इश्क"

माझ्याकडे लिरिक्स नाहित. त्यामुळे गाणी सांगितलीस तर मी सांगेन आहे की नाही ते. मग तुला लिरीक्स आणता येतील.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

<<गुलाब जाम (Deep fried milk balls dipped in sugar syrup) >>

अरारारा. काय हे वर्णन गुलाबजामचे. अश्याने खाववणार नाहीत हो.
हे म्हणजे 'डुकराच्या मासाची तळलेली भजी' म्हंटल्यासारखे वाटते. तर जे काय पदार्थ आणायचे ते आणा, पण इंग्रजीत भाषांतर नको.

अरे वा वा लै भारी गाणी आहेत.

वार्निंग १: माझा लेक गाण्याची पहिली ओळ संपत आली की मोठ्याने ईssssss असे म्हणतो किंवा टाळ्या वाजवतो तेव्हा don't take it personal.

वार्निंग 2: त्याने असे केले की त्याचा डॅडी "Ishan is a good boy" म्हणतो, पण don't take it personal.

झक्की गाण्यांची लिष्टांवर लिष्ट देताय पण गाणं म्हणणार ना तुम्ही..... Wink

हो ना... झक्की धपाधप नुसती गाणी टाकत सुटलेत...

ढगाला लागली कळं किंवा उसाला लागंल कोल्हा वगैरे नकोयत का? Wink

थोड वॅसलीन ओठान सकट जिभेला ही लावुन या.... म्हणजे सटासट गाणी पण म्हणाल... Proud

लोकांनो गार्बेज बॅग्ज विसरु नका.
मैत्रेयी, तिथे गॅस आहे का? असेल तर आपण चहा करु शकू.

<<म्हणजे सटासट गाणी पण म्हणाल>>
एकतर मी दिवसा एव्हढी पीत नाही. नि मी गाणी म्हंटली तर तुम्हाला बरेचसे व्हॅसलिन कानात घालून ठेवावे लागेल. अगदी बहिरे होइस्तवर.

गार्बेज बॅग्ज आहेत ग तिथे हॉल मधे.
चहा घ्यायला माझ्याकडे जाता येईल Happy किंवा मृ तर्फे डन्किन मधून कॉफी आणता येईल.

हो तर, कॉफी आणते ना मी. मधल्या वेळी खायला डोनट्स पण!

इशान ईSSS म्हण्तो. Lol पुढल्या २-३ दिवसात त्याला ऊSS म्हणायला शिकव. हिमेसभायची गाणी कोणी गायलंच तर....... Proud

वा अगदी जोरात चाल्लीये तयारी..

मृ.. तू पण जाणारेस??? FL हून बारात?? भलताच उत्साह आहे.. !! drive करणार असशील (कुठून ही कुठे ही) तरी आपल्या आजूबाजूला जीव आहेत हे लक्षात ठेव.. Proud

मज्जा करा सगळे gtg ला आणि वृत्तांत पण टाका.. Happy

"विमानाच्या आजूबाजूला उडणार्‍या पक्षांना पण जीव आहेत" असं पायलटला बजावून सांगत राहीन!

त्यापेक्षा विमानातल्या मनुष्यांना पण जीव आहेत असं पक्षांना सांग Wink

ऍडमा, इतकं काही विशिष्ठ शहरातल्या लोकांसारखं बोलायला नकोय. BTW, मृ आधी ओस पडलेल्या कनेटिकटात येणार आहे, मोकळा श्वास घ्यायला Wink

म्हणजे बारातला श्वास कोंदटलेला आहे असं सिंडीला भासवायचंय काय? Wink

ऍडमा, इतकं काही विशिष्ठ शहरातल्या लोकांसारखं बोलायला नकोय. >>> घ्या आता मी कुठे काय बोललो विशिष्ठ शहरातल्या लोकांसारखं ??? चांगल्या शुभेच्छा दिल्यात.. तुमचीच डोकी तिरकी (म्हणजे चालण्याच्या दॄष्टीने आकाराने नाही) .. तर कोण काय करणार.. Proud

फक्त 'म्हणून' दाखवीन. 'गाऊन' नाही!>> आयला नाच रे मोरा गाणं मी लहानपणापासुन गायलेलच ऐकलय. आता पहील्यांदाच म्हंटलेल ऐकेन. Wink

Lol

- अनिलभाई
It's always fun when you connect.

मला आणखी काही बालगीतं 'म्हणता' येतात :
*आभाळ वाजलं धडाड्धूम
*माकडं निघाली शिकारीला
*एकदा एक चित्ता, हातात घेऊन अडकित्ता
*आई माझं रॉकेट
*आलगट्टी गालगट्टी शोन्याशी गट्टी फू
* नळा नळ गळका
*खोडी माझी काढाल तर
ह्याकरता कॅरिओके ची गरज नाही! Proud

मी पण मी पणः एक होते माकड त्याला भेटले बोकड Wink

भाई, मला "रेशमाच्या रेघांनी..." ची धुन पाठवाल का ? एका मैत्रिणीला हवी आहे. तुमची हरकत नसेल तर देइन.

शिंडे,
तुला पाठवायचा मेसेज चुकुन सायो ला पाठवला.
मला इ-मेल कर. म्हणजे तुझा इमेल पत्ता मिळेल पाठवायला. संध्याकाळी पाठविन.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

सुप्रभात लोक्स...
मला खूप वाईट वाटतंय येता येत नाही म्हणून. जाऊ दे मी आपली मागच्या ए. वे. ए. ठि.च्या आठवणींवरच समाधान मानीन.
बाकी तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. मज्जा करा. वृत्तांत टाकाच. (म्हणजे विनय टाकतीलच :))

हो,हो. मला आला मेसेज चुकुन.

भाई.....कही पे निगांहे कही पे निशाना..... चलो जी छोडो गाओगे क्या गाना..... Wink

sorry लोक्स... माझ्या Client ने शनिवारी एक Test ठेवलीय..

तास दोन तासाची Test आहे , आणि ९ वाजता सकाळी सुरू होईल. तेव्हा मी ११ पर्यंत रिकामा होईन.
अगदीच उशीर झाला तर १२, साडे १२... पण मी ए. वे. ए. ठि. पासून एका मैलावर आहे तेव्हा बाकी Problem येऊ नये.

विनय Wink

बीअर नि वाईन संपली तर आम्हाला दोष देऊ नका.

तुम्ही क्लायेंटला सांगत का नाही की हे काय माझे आता परीक्षा देण्याचे वय आहे का? इतकी वर्षे नोकरी केली ती काय फुकट? त्यावरून तुम्हाला कळत नाही की मला काय येत नि काय नाही? नि त्यावरून कळत नसेल तर एक तासाची टेस्ट घेऊन काय डोंबल कळणार आहे?

मी पूर्वी एकदा डेटा सेंटर मॅनेजर म्हणून तिथे गेलो, तेंव्हा ते मला म्हणाले युनिक्स ची टेस्ट घ्या! आता त्या काळी मी इथल्या भाषेत सांगायचे तर युनिक्स चा 'गूरू' होतो. मी म्हंटले त्या आधी मीच तुमची टेस्ट घेतो, त्यात तुम्ही पास झालात तर माझी टेस्ट घ्या. मग मुकाट्याने गप्प बसले!!

येताय ना... मग ठीक आहे.... ईकडे तुम्हाला भेटायला तिकीटं लागलीयत.... Proud

Pages