गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिल्पा८५, २६ जानेवारीला सुट्टी आहे, तेव्हा घरी बसून आराम करा! नेहेमीचे रूटीन फॉलो करा. एरवीसुद्धा आपण कधी सूर्याकडे बघत नाही, त्या दिवशीही बघू नका Happy उगाचच ग्रहण सुटल्यावर आंघोळ वगैरे करू नका. जेवण, खाणे नेहेमीचे ठेवा. थोडक्यात, सुट्टीचा दिवस सुट्टीप्रमाणे घालवा. ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, एवढाच विचार करा. बाहेर हिंडणे फिरणे तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळून करत असालच.

डॉ खानविलकर आता प्रॅक्टीस करत नाहीत. त्याच जागी डॉ. भावे म्हणून गायनॅक आहेत. या दवाखान्याच्या पाठीमागेच- सारसबागेकडे जाताना डॉ. थत्ते यांचा दवाखाना आहे. तेही उत्तम कन्सलटंट आहेत. तुम्हाला शुभेच्छा मधुराणी Happy

------------------------------------------
चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो! Proud

Usually, in the US after one year of trying to conceive couples are encouraged to seek treatment. For some reason,this guideline is either unknown or not followed in India.

Also, polycystic ovary is very easy to detect through ultra sound . I am surprised how it was not detected before your miscarriagve.
Typical treatment in case of polycystic ovaries proceeds as follows
You will be prescribed a drug called chlomid - It is in tablet form and it encourages production of ovarian follicles / eggs. This is the least invasive process. Your OBGYN/ radiologist will monitor the development of the follicles through blood tests and ultra sounds. At an appropriate time, they will recommend you to have intercourse - typically no more than 2-3 times over a 12 hour period. It is recommneded that the father abstain for 2-3 days prior to this.

If this does not work, the next treatment is injectibles. You will be given shots of pergonal during the first 10 days of your cycle. This is stronger than chlomid and may produce multiple follicles/eggs. In the US patients /spouses are taught to do the shots themselves. The OBGYN/radiologist will monitor your blood hormone levels and development of the follicles through ultra sound. Again you will be recommended a window for intercourse.

Based on the mothers age, this may be tried for several cycles. If this does not produce results, the doctor may recommend in-vitro fertilization. Again you will be given strong doses of Pergonal and induced to produced several follicles /eggs.- as many as 30-40. You will be given general anesthesia, the OBGYN will extract the follicles and then fertilize them with your husband's sperm in a test tube. These embryos will be frozen and then implanted in your uterus in a subsequent cycle. Typically, 2-3 embryos are implanted in each cycle.

In some cases this does not work either. The option then is to use donor eggs or donor sperms as necessary. I know there are several centers in Mumbai and Hyderabad who do this. I am certain you will find good doctors in Pune too. Read up as much as you can. Have faith in yourself. Have patience. Be kind to your partner. Learn to ignore comments from others.

ivillage.com and babycenter.com are two good sites.

Sorry for writing in english!

मधुराणी,

पुण्यात वैद्य भोळे म्हणून आहेत ते या विषयातले तज्ञ आहेत. त्यांची एकच अट असते की पती आणी पत्नी दोघांनीही तपासायला आले पाहिजे. माझ्या ओळखीतल्या काही लोकांना त्यांचा खूप चांगला अनुभव आला आहे. आयुर्वेदिक उपचार करायला हरकत नसेल तर मी त्यांची आणखी माहिती देईन.

आणि कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण मी खूप केसेस अश्या पाहिल्या आहेत की पाण्यासारखा पैसा खर्च केला, आयुष्यातली बहुमोल वर्षे वाट्टेल ते उपाय करण्यात घालवली आणि मग अडॉप्ट करायचे वयही निघून गेले. तसे होऊ नये म्हणून अडॉप्शन हा ही एक पर्याय आहे असा किमान विचार तरी करायला सुरूवात करा. खूप कठिण वाटेल हा विचार. पण निर्णय घेतला तर आयुष्यप्रवर्तक ठरेल.

मधुराणी,
ईमेल मिळाली. रिप्लाय करते एक दोन दिवसात.

मधुरिमा ताई,
तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!

शुक्राणू आणि बिजाणू यांची संख्या जर कमी असेल तर योगा मधे ६ आसनं दिली आहेत. त्याचा खरोखर लाभ होतो. तुम्ही दोघे ही आसने भारतात पुण्यात शिकू शकता आणि रोज करा. फक्त चांगल्या व्यक्तीकडून ती शिकून घ्या.

आसनांची नावे इथे आहेतः
http://hubpages.com/hub/6-Yoga-Exercises-To-Increase-Sperm-Count

Some more information
Chlomid and Pergonal are both combination hormones. It is best to take them under an expert doctors supervision.Monitorin of ovaries through ultra sound and also blood tests is critical. It may be possible to get chlomid tablets in India without a prescription, but please dont use those without expert care.

Also, the hardest part of these treatments is the questions,comments and suggestions from friends adn family. Even well-meaning relatives can say things that cause a lot of grief. It is best to not talk about your treatment to any body -especially if you dont want to hear suggesions and comparisons to other couples.

It is hard to bear the stress and uncertainty. You just have to keep your chin up and take it one day at a time. Be persistent in following your treatment plan. Eat right, exercise regularly. Stop any smoking and stop alcohol - even modest alcohol consumption can hurt your chances .
Maintain a diary if you feel the urge to confide. If you come across online sites, use them with caution too. There are thousands of folks in the same boat as you and you never know who will say something that might offend you. You can get a lot of help and support on such sites. But be prepared for honest ( sometimes brutally so ) feedback.

And to repeat myself, have faith and be kind to your partner through this ordeal.

छिन्नं छिंन्नं स्वादु चैवेक्षुकांडं असा एक श्लोक होता. कठीण परिस्थितीतसुद्धा चंदन, सोनं, उस असे उत्तम पदार्थ आपलं मूळ रूप सोडत नाहीत. हे लक्षात असू द्यावे...

शोनू, पुर्ण श्लोक असा आहे, अर्थ तू म्हणते तोचः

घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारुगन्धम्
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम् |
दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णम्
प्राणान्तेऽपि हि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ||२०||

इथे आहे हा श्लोक, २० वा श्लोकः

http://sa.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4...

वरील पोष्ट आवडले.

मला काही शन्का आहेत,खर तर हे सगळ Dr. लाच विचारायला हव पण आयत्यावेळि आठवत नाहि हे. तेव्हा please मला मदत करा .....
१) गरोदरपणात चायनीज खाल्ल तर चालत का?
२) मी रोज Contact Lense वापरल्याने बाळाच्या डोळ्यान्वर काहि परीणाम होईल का?
३) Loud Music चा बाळाला त्रास होईल का? (ex. watching films in theater , home theater, public programms etc)
४) Bike ने प्रवास (थोडाफार) केला तर चालेल का आता? (५वा चालु आहे)
५) माझा BP थोडा जास्त आहे अस आत्ताच detect झाल आहे, तर ते कस control करता येईल, त्याचा बाळावर काहि परीणाम होईल का?

शिल्पा, एका पानावर हे प्रश्न लिहून घेऊन जायचे. फक्त पान वाचायचे आहे हे लक्षात रहायला हवे Happy

शिल्पा
चीनची लोकसंख्या १ बिलियन पेक्षा जास्त आहे. त्या देशातल्या सगळ्या बायका गरोदर असताना काय खात असतील ?

शोनु, Lol

शिल्पा, बी ने सांगितल्या प्रमाणे आपल्या शंकांची यादी बनवुन नेत जा डॉक्टरकडे. रेफ्रिजरेटर वर लावायची म्हणजे शंका आली मनात की पटकन उतरवायची Happy

बाकी विसाव्या की बाविसाव्या आठवड्यापासून बाळाला ऐकु येते असे वाचण्यात आहे. अगदी रोज मोठ्या आवाजात काम (कारखाने वगैरे) करणार्‍या बायकांच्या बाळांच्या कानावर परिणाम होतो पण एक-दोन वेळा सिनेमा बघण्याने फरक पडणार नाही. तसेच मोठा आवाज असला की बाळ काय प्रतिसाद देतेय ह्यावर तुम्ही लक्ष ठेवा. इशान दडी मारायचा आवाज असला की. मला वाटायचे त्याला भिती वाटते की काय कोणास ठावुक. माझ्या एका मैत्रिणीचे बाळ जोरात हलचाल करायचे.

सध्या बीपी वाढलेलं असताना हॉटेलचं चायनीज खायला नको. भरपूर मीठ असतं त्यात. (बाहेरचं खाणं शक्यतो नकोच. इतर ठिकाणी खाणारच असाल तर बिनमिठाचं करायला सांगून आपण वरून मीठ घालून घ्यावं.)

कंबरेचा वात असणार्या स्रीयांना गर्भार्पणात काय काळजी घ्यावी लागते.

मृ, मी असे ऐकुन आहे की बी पी असलेल्यांनी असं वरुन कच्चं मीठ घालु नये. ख खो डॉ जा !!!

अरे माझ्या देवा! बी, ही सगळी (मीठ न खाण्याची) भानगड माझ्यासाठी नाही रे भाऊ! Proud

मधुराणी,

इथे http://ayurremedies.com/ आहे वैद्य भोळ्यांची माहिती. मोठे भोळे (दत्तात्रेय भोळे) या विषयातले तज्ञ आहेत.

बी, तो सल्ला तू मधुरिमाला कशाला देतो आहेस, तिला already जुळे आहे.

शिल्पा,

१) गरोदरपणात चायनीज खाल्ल तर चालत का?
>> चायनीज जेवणात MSG वापरलेले असते. ते गर्भाच्या दृष्टीने चांगले नसते. तेंव्हा ऑर्डर करण्यापूर्वी ते घालणार नसल्याची खात्री करून घ्यावी. तसेच शेल फिश shrimps etc. मध्ये विषारे असू शकतात. तेंव्हा तेही टाळावे.
२) मी रोज Contact Lense वापरल्याने बाळाच्या डोळ्यान्वर काहि परीणाम होईल का?
>>नाही.
३) Loud Music चा बाळाला त्रास होईल का? (ex. watching films in theater , home theater, public programms etc)
>>खूप लाऊड म्युझिक शक्यतो टाळा. आयुर्वेदात गर्भावस्थेत ते वर्ज्य सांगितले आहे.
४) Bike ने प्रवास (थोडाफार) केला तर चालेल का आता? (५वा चालु आहे)
>>बाईकने प्रवास करण्यापेक्षा चाला. व्यायामासाठी योगासने करा. गर्भिणी अवस्थेत चालतील अशी आसने निवडा. बी, जरा मदत कर बघू. Happy
५) माझा BP थोडा जास्त आहे अस आत्ताच detect झाल आहे, तर ते कस control करता येईल, त्याचा बाळावर काहि परीणाम होईल का?
>>BP जास्त असेल तर बाळावर परीणाम होऊ शकतो. थोडे वाढले तर लगेच होणार नाही. पण सतत आणि जास्त प्रमाणात वाढले तर होईल. काळजी घ्या.
वरती मृण आणि सिंड्रेलाने म्हंटले तसे मीठ कमी खा. गरज पडल्यास सुवर्ण सूतशेखर, चंद्रप्रभा ही औषधे घ्या पण शक्यतो कुणा वैद्याला दाखवून प्रमाण ठरवा.

बाकी जास्त विचार करू नका. आनंदी राहा.

शोनू, Rofl
बी चं कशाबद्दल अभिनंदन गं सिंडे? ;)))

बहुतेक सिंड्रेलानी माझ्यासाठे मुलगी शोधले असेल म्हणून माझे अभिंनंदन करत असेल Happy धन्स!!!

धन्यवाद, तुम्हा सगळ्यांचे...
मी हे सगळं नक्की विचारेन Dr. ला, पण काही वेळा अनुभवांचे सल्ले जास्त सोयिस्कर, आपलेसे आणि योग्य वाटतात म्हणुन हा प्रयत्न केला.:) आणि काही वेळा डॉक्टरी भाषा अवघड वाटते असो पण तुम्ही सगळयांनी इतक्या पटकन प्रतिसाद दिलेला पाहुन खुप बरं वाट्लं.
Actually मला चायनीज खुप आवडतं. पण गेले ५ महीने नाही खाल्लय (खुप control करुन), पण हल्ली काही दिवस खुपच ईच्छा होतेय म्हणुन विचारले. असो करेन आणखी ४ महीने control माझ्या बाळासाठि.
पायांवर सुज normal आहे का? गेले ५-६ दिवस जास्त आनि कायम आहे कमि करण्यासाठि काही घरगुति उपाय सांगाल का? मीठ कमी केलेय मी आता अन्खि काही?

तु चायनीज घरी करुन खाउ शकतेस. इथे मायबोलीवर कृती आहेत. MSG साठी काय घटक पदार्थ टाळले पाहिजे अशी पण माहिती आहे (बहुतेक).

बी, तु मृचं अभिनंदन तिला मुलगा शोधल्याबद्दल केले वाटते.

बीपी हाय असल्यावर पायांवरची सूज नॉर्मल आहे शिल्पा. मीठ कमी करणं तर आहेच पण रोज चालण्याफिरण्या सारखी exercise करत जाच. सूज कमी करण्यासाठी उशीवर पाय ठेवून (उंच होतील अशा रितीने) बस. त्याने फायदा होऊ शकतो.

गर्भारपणात वजन न वाढू देण शक्य आहे का?

ह्म्म्म, तुमच्या डॉ. ला विचारुन काय ते ठरवा. मी वाढू दिलं नव्हतं पण त्याचं कारण वेगळं होतं. साखर्,गोड पदार्थ पूर्ण बंद केले होते आणि भरपूर चालत होते रोज. त्यामुळे कंट्रोल करु शकले.

गर्भारपणाच्या third month मधे mumbai to nainital हा प्रवास करणे योग्य आहे का? please suggest me.

Pages