न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यासारखे, दोन्ही हात कोटाच्या खिशात ठेवून रहा. म्हणजे हात हलवत आलो आहे हे लोकांना कळत नाही!
>> झक्की, Lol एक नंबर..

(आणखी २ बटाटे कमी करावे काय ? >> आज्जे, कमी कसले करतियेस? वाढव. मी घेऊन जाणार आहे थोडं घरी..

तुमच्या karaoke, Thumb Drive वर आणल्यात तर Netbook वर लावता येतील.
सोबत Lyrics पण घेऊन या.

विनय Happy

हातासरशी , आय मॅक्स, ३ डी पण घेऊन या. आय पॅड, आय फोन, होलोग्रामपण. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक्स चे प्रदर्शन भरवू. आणि मग ते सगळे सेट अप करणे फार काँप्लिकेटेड झाले की सरळ तोंडाने गप्पा मारू,गाणे म्हणू, कानाने ऐकू. हवी कशाला इलेक्ट्रॉनिक्स?
उद्या म्हणाल स्काईपवर ए. वे. ए. ठि. करू!!
Happy Light 1

वाढव. मी घेऊन जाणार आहे थोडं घरी..>>>
त्या रुनीला वाडगी पोस्ट करायला सांगा रे कुणीतरी. मग रस्से घरी नेता येतील. डिस्क्लेमर रस्स मांडीला झोंबल्यास संयोजक जबाबदार नाहीत.

हे हे स्काईप वर ए. वे. ए. ठि..भावना कळाल्य....पण ए. वे. ए. ठि च फूल फार्म अजून महिति नाही.

एका वेळी एक ठिकाणी.. Happy

हा मायबोली (बाग राज्य) लिंगोबा आहे. देवळातल्या पहिल्या सम्मेलनाला एका व्यक्ती एकावेळी दोन ठिकाणी असण्याची शक्यता होती. म्हणून नवीन सुरूवात. एका वेळी एका ठिकाणी भेटणारे बा(ग) रा(ज्य) कर..

पुन्हा एकदा:
मैत्रेयीच्या कम्युनिटीचं क्लबहाऊस ४१- ४७ या नंबर्सच्या मध्ये आहे. (फ्रँकलिन ड्राईव्ह) इथे आहे. वर पत्ता टाकलेला आहे.
तसंच नव्या मंडळींनी संपर्कातून मैत्रेयीला मेल करा म्हणजे ती फोन नं. पाठवेल.

चालेल, मी एक मोठी स्ट्रॉ ठेवेन म्हणजे बाटली खाली ठेवल्यावरही मला पिता येईल. Proud
बायदवे, आपण तिघंच ना गाडीत? Uhoh

चालेल, मी एक मोठी स्ट्रॉ ठेवेन म्हणजे बाटली खाली ठेवल्यावरही मला पिता येईल.

<< Report drunk driver च्या signs वापरायची वेळ येणार का हायवे वरच्या इतर गाड्यांना Proud

या बुवा, धमाल करु.>>>
फक्त बुवांना धमालीचे निमंत्रण? मी, ईबा व झक्की फक्त रीटाच्या मार्गावर का?

आता पन्ना वगैरे येत नाहीत तेव्हा... मी पेशल भाजी आणतोय..

(अपने हाथोंसे बनाकर). Proud

व्हेजी पेशल आहे.. शिंडे घाबरू नकोस..

बुवा,
दोन गाड्या घेवुन या. एकमेकाची वाट बघत बसण्यात बराच वेळ जाईल. आणि
कोणाला थोडा वेळ जास्त रहायचे असेल तर रहाता येइल. Happy

शीला की जवानी सुरू झालं की मला ऐकायला मिळावं म्हणून फोन करा. मुन्नी बदनामला केला तरी चालेल. (भजनं ऐकवण्यासाठी नाही केला तरी हरकत नाही.)

शीला की जवानी सुरू झालं की>> मुन्नी बदनामला केला >>>
नक्की कधी ते सांग. शीला वयात आल्यावर का मुन्नी बदनाम झाल्यावर. Proud

शीला की जवानी सुरू झालं की मला ऐकायला मिळावं म्हणून फोन करा. मुन्नी बदनामला केला तरी चालेल. (भजनं ऐकवण्यासाठी नाही केला तरी हरकत नाही.)
<<< मला पण ऐकवा आणि भाईंनी डान्स वगैरे केला तर जरुर व्हिडिओ करा!

व्हिडिओ शूटिंग करा, पण भाईंच्या नृत्याचा व्हिडिओ नाही पाठवला तरी चालेल. Proud हिमेस्भायकडून प्रेरणा घेऊन मायबोली या विषयावरचं गाणं गायले तर ते मात्र पाठवा.

पदार्थांमधे उरलेल्या गुळाच्या पोळ्या पाठवल्या तर नका पाठवू म्हणणार नाही, सेम गोज फॉर विडे/मीठा पान. तसंच ईबा किंवा इतरांनी मसाले दिले तर चिमुटभर मसाले स्वतःकडे ठेवून उरलेले पण इकडे पाठवा.

मी करतो त्याला नृत्य किंवा डान्स म्हणता येणार नाही. तो एक वेगळाच प्रकार आहे. तो स्वताच्या डोळ्यानी अनुभवायचा असतो. Happy

Pages