न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, आकडा क्रशेसचा असला तर बर्फात पुरायला तुमच्याकडे एवढा स्नो पडला आहे का? येणार्‍यात भक्कम वीर आहेत. Happy

एवेवेठिला टाईम कॅप्सूल गाडा.

भाई, माफ करा. खरंच चिवडा पोस्टात टाकणार होते, मैत्रेयीच्या घरी पाठवायला. पण गेले ३-४ दिवस बाहेर पडता आलं नाही. उद्या बाहेर पडता येईल की नाही शंकाच आहे. तेव्हा पुढल्या एवेएठिसाठी चिवडा उधार.

झक्की तुम्ही खास आमच्याकरता हे गटग आयोजीत केले आहे

नाही हो. भलतच काय? हे सगळे बाकीच्या लोकांनी केले आहे, मी नुसताच येणार, खाणार नि परत.
लोकांना भेटणे, गप्पा मारणे, माझ्या लहानपणाच्या थापा मारणे हे मला जास्त आवडेल.

ते, शेपू -मसुर-बटाटा मटक्या, हे सगळ्यांनी खाल्लेच पाहिजे असे नाही ना!

त्यांना फक्त मसालेभात नी गूळपोळी खायचीय ना? मग आता दगड गोट्यांची आठवण नको करुन देऊस. Wink
सिंडी, अर्ली डिसमिसल झालं की नाही शेवटी?

नाही Sad

३५ लोक नाही व्हायचे ना? फार तर २५-२६ डोकी होतील. वर २१ लिहिलेत त्यात ४-५ लोकांचे अदर हाफ अजून धराय्चे हा का ना का! आता काय काय राहिलेय ? फायनल मेनू लिस्ट अपडेट करा लवकर परत एकदा.
पोळ्या वगैरे कुणी आणत नसेल तर मी आणेन (अन हॉल भाड्यात अ‍ॅड करून टाकेन Happy ). पण लवकर कळवा.

अजून तरी फक्त फ्लरीज म्हणत आहेत परवाच्या दिवशी. त्यामुळे सो फार सो गुड Happy
गुळाच्या पोळ्या येतायत ना? Happy :तोंपासु बाहुली: अन अबे, नक्षी इ. मंडळी काय आणतायत ?

स्टार्टर म्हणून तिखटमिठाच्या पुर्‍या ठेवायच्या का? Uhoh त्या उडवल्या तर फक्त सामोसेच रहातायत. बाकी कुणीतरी काहीतरी चाट आयटम वगैरे आणा ना.

माणुस/बामा काय आणतायत?

नात्या आणतो म्हणत होता गुळाच्या पोळ्या? अपडेट टाक रे नात्या.
स्टार्टर्स कमी आहेत खरंच (पार्लेकर / बारा ए वे ए एठिच्या खाण्याच्या स्टॅन्डर्ड ने फारच कमी Happy ) आता कुणी काही अ‍ॅड करणार असतील तर स्टार्टर्सच आणा.

हो हो. मी गुळपोळ्या आणीन.

हेडकाऊंट ठरला का? मी एकटाच येणार आहे.

गटग नक्की ना? नाहीतर मला पोळ्यांची गळ्यात माळ करुन घालावी लागेल. Happy

छे छे तशी वेळ येणार नाही. मामा लोक रिकामे डबे आणतात गटगला येताना Proud

बाई, तुम्ही यंदा "नैनोवालीने..." गाणं म्हणा. मधले डायलॉग वैद्य म्हणतील.

नात्या एकटा का रे? बायकोला काय सांगितलेस नक्की बाराकरांबद्दल Happy
डोकी मला वाटते सुमारे २५-२६. भाई म्हणतात सुमारे २५-३० !
पोळ्याची माळ ? यु किडिंग ? इथे लोकांची खायची 'तयारी' किती आहे ऐकून तर माहित आहेच ना तुला Happy

बायकोला काय सांगितलेस नक्की बाराकरांबद्दल >> पितांबरी मोड ऑन आहे. (विबासं नाही Happy

पोळ्याची माळ ? यु किडिंग >> गटग कॅन्सल झालं तर म्हणत होतो मी.

नात्या , अरे दुसर्‍या दिवशी त्या पोळ्यांसाठी लोक तुझ्या घरी येतील. काळजी करु नको. पार्लेकर तुझ्या मागे आहेत. Proud

चमन फिश आणणार आहे.
विनयच अजुन ठरलेल दिसत नाही काय आणायच ते.
माझा फोन नंबर आहे ना. कोणाला हवा असेल तर मला फोन करा.. आय मिन इथे मेसेज टाका. Happy

Pages