न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. बेष्ट झालेलं दिसतय गटगं.. लै भारी.. ह्यावेळी झक्कींच्या लेंग्याला काही धोका नव्हता ना? की कोणी ठग आलेच होते?

झक्की, करोना होती की नाही ह्यावेळी?

काकू/वहिनी, आरती सगळे खुपच शांत वाटले.
>> बरोबर आहे. आरतीला मी भेटलो होतो तेव्हा माझे असेच मत झाले होते. काल तर ती सिंड्रेलाबरोबर आली होती तिथे. त्यामुळे मला अजून जास्त शांत आणि समंजस वाटली.. Proud

जमलेला बर्फ तर होताच. पार्किंगहून माबोकरांना वाकडी वाट करुन जावं लागलं पण डगमगतील ते माबोकर (पक्षी: बाराकर) कसले? परत येतानाही भुरुभुरु बर्फ पडायला सुरुवात झालेली.

पन्ना Lol

एवेएठि थंडी-स्नोला न जुमानता दणक्यात पार पडलं. Happy
एम्टी आणि कं.चे जय्यत तयारीबद्दल आभार.
सायोचे आम्हांला हातीपायी सुखरूप नेऊन आणल्याबद्दल आभार. मला तू संगितल्याप्रमाणे लगेच गॅस भरायला मिळाला.

खाण्यापिण्याची नेहमीप्रमाणेच चंगळ होती आणि सगळेच पदार्थ चवदार होते. (हनी वोडका जरा माइल्ड वाटली या वेळी... पण असू दे. :P)
त्या पुर्‍या कुठे गायब झाल्या नंतर?
तिळगुळाच्या वड्या एबाबांनी केल्या होत्या म्हणे. मस्त झाल्या होत्या, पण त्यांना डिशला 'तिळगूळ' असं लेबल लावावंसं वाटलं, यावरून पार्ल्याक्वांना त्यांच्या एकूण पाककलेतल्या कॉन्फिडन्सची कल्पना आली. Light 1

विनयचे उउवि जोरदार! भाई आणि त्याने सादर केलेला 'फू बाई फू'मधला प्रवेशही सॉल्लिड रंगला.

बाकी गप्पाटप्पा (ज्यांना सामान्य लोक गॉसिप्स म्हणतात) नेहमीप्रमाणेच. Proud

नक्षीने मायबोलीवर आली नाही तोच एम्टीशी पंगा घेतला. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Proud

लोकहो, बारके बारके तुकडे टाकण्यापेक्षा एक सलग वृत्तांत टाका.

मामा, काड्या टाकण्यापेक्षा कुठली गाणी गायली ते सांगा. आर्त गानहाका मारताच भारतातून कोणी 'ओ' म्हंटलं का? कळवा.

झक्की काय (काय) म्हणाले?

व्हिडिओ शूटिंग केलंय का?

भाई नाचले का?

>>त्यांना डिशला 'तिळगूळ' असं लेबल लावावंसं वाटलं
Lol

अरे जरा कोणीतरी नीट वृत्तांत टाका की रे...

केपीकाका बाफवर पोस्टी लिहिताना सुटले आहेत एकदम.. दोन चार फाको करंडक नक्कीच घेऊन जातील...

त्यांना डिशला 'तिळगूळ' असं लेबल लावावंसं वाटलं >>
१. तिळाच्या वड्या "आणल्या" Wink
२. लेबल फक्त चिमट्याला होते - पु-यांच्या चिमट्यालाही होते. Happy

पुर्‍या खरच कुठे गायब झाल्या ? पेक्षा कुणी गायब केल्या ? Uhoh

मंचुरियन देसाईंनी आणल्यामुळे स्वतःला फिश करी समजत होतं Proud

चमी आणि पन्नाने केलेले चिकन प्रकार भारी होते असे कळते. माझ्या चिकन-उपाशी नवर्‍यातर्फे धन्यवाद बर्का Happy

देसाई, वैद्य नीट नीट वृतांत लिहा. आलू बंजार्‍यावर कमीत कमी तीन ओळी तरी आल्याच पाहिजेत बर्का. फोटो काढणार्‍यांनी अनुल्लेखाने मारलं की बंजार्‍याला. Proud

पन्नाचं चिकन माझ्या लेकीला आवडतंच नेहमीच. त्यामुळे तिने काल ओरपलंच. पुन्हा कितव्यांदा तरी पन्नाकडून रेसिपी घ्यावी लागेल. माझ्याकडे फ्रिझरला चिकन मॅरिनेडमध्ये घालून तयार आहे.

>> मंचुरियन देसाईंनी आणल्यामुळे स्वतःला फिश करी समजत होतं
Lol

हो, फोटोत मसालेभातही नाही! :|

चिकन करीबद्दल धन्यवाद Happy

सगळेच पदार्थ जबरी होते! आलू बंजारा (ह्यात शेपू नव्हता, त्यामुळे मी खाऊ शकले), तुरीया पात्रा वाटाणा, व्हे.मं, शेवेची कढी, तिळगुळ, वड्या, कोथिंबीर वडी, पापू, चमीचं चिकन, गुळपोळ्या, मसालेभात, गोडायवा.. सगळं सगळं मस्त!!!

सायो आणि झक्की ह्या ड्रायवर लोकांचे विशेष आभार Happy

झक्की तुम्हाला परत जाताना फार पिडले नाही ना पार्ल्याक्कांनी? मागल्या वेळी काय ती अवस्था केली होती तुमची निघतानाच.. Wink

झक्की तुम्हाला परत जाताना फार पिडले नाही ना पार्ल्याक्कांनी?
नाही हो टण्या. उलट गाडीवर बर्फ साचले होते ते काढायला मदत केली.

ए.वे. ए. ठि. त अडथळा येऊ नये म्हणून सौ. ने मला फोन करण्या ऐवजी घरच्या वाटेला लागल्यावर मी तिला फोन करून घरी किती वेळाने पोचेन ते सांगायचे ठरले होते.

पण गाडी साफ करून घाई घाईने गरम गाडीत बसायच्या भानगडीत फोन करायचे राहिले. मग घरी येऊन गाडी गराजमधे नेऊन ठेवल्यावर कोटाच्या कुठल्या खिशात मोबाइल होता तो काढून ठरल्याप्रमाणे फोन केला. दोन सेकंदात घरात येतो असे सांगितले. म्हणजे सांगितल्याप्रमाणे घरी येण्यापूर्वी फोन करण्याचा कायदा पाळला!

Lol धन्य आहात तुम्ही! एरवी दुसरं कोणी हे म्हंटलं असतं तर ठाप वाटली असती पण तुम्ही असं काही खरच करू शकता ह्याची आम्हाला खात्री आहे झक्की!!!! Lol

बुवा, तुमचा मेलबॉक्स फुल होता हे ऐकून मला म्हणाले की म्हणूनच मी सेल फोन वगैरे घेतच नाही पण हळूच कोटाच्या खिशात लपवला होतात वाटतं. Happy

झक्की काय (काय) म्हणाले?
>>
ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो.

सर्वात आधी झक्कींनी मला आणि विशालला पकडलं. विशालला ते नेहमी मायबोलीवरचा विशाल कुलकर्णी समजतात. विशालने (नेहमीप्रमाणे) 'अहो मी तो विशाल कुलकर्णी नाही हो' असे सांगितले. नंतर झक्कींनी आम्हाला (नेहमीप्रमाणे) वीस एक वर्षांपूर्वीचे अनुभव सांगितले की ते त्यावेळी कसं फोर्ट्रान आणि कोबोल मध्ये प्रोग्रॅमिंग करायचे वगैरे. तिथेच शेजारी आरती शांत बसली होती. तिला म्हणाले की, का हो, एवढ्या शांत का? रिलीजची चिंता करताय का? अहो मी तुम्हाला एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर सांगतो की आजचे रिलीज हे फक्त पुढे पुन्हा उगीच काहीतरी रिलीज करता यावे यासाठी असतात! त्याचा कामाशी काही संबंध नाही!! Proud

मग नंतर मला म्हणाले की, 'तुमच्या भागात फार यहुदी लोक राहतात हो. कंपनीत यहुदी लोक असतील तर त्यांच्यापासून सावध रहा. तुम्हाला काय वाटते, जाईल त्या देशातून त्या लोकांना हाकलून का देतात?' असं म्हणून मग हिटलर, जर्मनी वगैरे बरंच काय काय सांगितले मला. झक्की हे सांगून सांगून माझा ब्रेनवॉश करणार आहेत एक दिवस.. Happy

मग निघताना आम्ही गप्पा मारत उभे होतो. तेव्हा न्यूजर्सीमधील भारतीय रेस्टॉरंटस असा विषय निघाला. झक्कींना कुठलेतरी नवीन मराठी माणसाचे रेस्टॉरंट कळले होते त्या भागातले. तेव्हा नात्या म्हणाला, "ते हरी चटनी रेस्टॉरंट का?" तेव्हा झक्कींनी शेरा मारला, "छे हो! अहो मराठी माणसाचं आहे रेस्टॉरंट! नाव इंग्रजी असणार त्याचं!! हिंदी कसं असेल?" Lol फार हसू आलं मला. झक्की ऐनवेळी कोट्या मस्त करतात खरंच.

फचिन Lol 'तुमचे बाबा हाफ पँटमध्ये होते तेव्हा..... ' हा डायलॉग आला नाही का यावेळी? Wink

झक्कींनी आरतीला सुद्धा 'अहो तुमची बहिण लहान आहे हो...तुम्ही किती फाड फाड बोलता तिला' असं म्हंटलं. पुणे गटग पासून ही परंपरा कायम आहे Wink

Pages