न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

सिंडी, तुला लक्षात आलंय का? पन्नाने जरी येणार्‍यांच्या यादीतून नाव काढलं असलं तरी चिकन करीतून नाव काढलेलं नाही अजून.

अरे वा वा पन्नाची चिकन करी येणार म्हणजे नॉन-व्हेजवाले व्हेजवर हात मारणार नाहीत. (आणखी २ बटाटे कमी करावे काय ? :फिदी:)

मानसिक आधाराबद्दल खुप आभार. येवू शकले नाही तर मला खुप वाईट वाटेल. अगदी पहिल्या दिवसापसुन तयारी करत होते. सगळ्यांना भेटायचे आहे. बघु.

नुसती चिकन करी येऊन उपयोग नाही.. ती माझ्या हाताने सर्वांना वाढण्यातलं समाधान खर.. त्यामुळे नेस्क्ट टाईम.
सिंडी, बटाटे वाढव Proud

फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम म्हणुन काही आहे की नाही >>> पन्ना, शोकगृहात डांबून घेतलं आहेस की काय स्वतःला ? Wink

पन्ना, कांद्यात खपतील नॉन-व्हेजवाले Proud

फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम म्हणुन काही आहे की नाही >>> पन्ना, शोकगृहात डांबून घेतलं आहेस की काय स्वतःला ? >>> हो ना.. आणि आता जोको का मरे हा विचार करत्येय Proud

बराच वाहिला की बाफ....

आम्ही काहीतरी स्टार्टर आणणार आहोत ..
की
सद्य पारिस्थिती पर नजर रखते हुए .. काही गोड आणू ?

>>सद्य परिस्थिती?
सुमंगलाताईंचे येणे बहुतेक cancle होतयं त्यामुळे 'जेवणानंतरचे गोड' ह्याबद्दल इतरांचा विचार करुन ते लिहले गं

>>कोणी पिक करेल का
भाई, तुम्ही या इकडे पाय पिक करायला Lol

वेट, हेवी स्नोमुळे बरीच झाडं पडलीत.. Sad

Pages