श्री. सचिन कुंडलकर

प्राईम-टाईम स्टार - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

श्री. चेतन दातार यांच्या मृत्यूनंतर २००९ साली लिहिलेला हा लेख -

***
प्रकार: 

'शरीर' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

माझ्याबरोबर आयुष्यभर सतत प्रवास करणारं, वेदना आणि आकर्षण निर्माण करणारं शरीर. माझं आणि माझ्यासोबत येणाऱ्या अनेकांचं. तीळ, लव, जन्मखुणा, हजारो लाखो रंध्रं, पोकळ्या. नितळ आणि केसाळ. उंच, सपाट, थुलथुलीत, बलदंड आणि पुष्ट. शरीरावरची वळणं, शरीरावरचे उंचसखल, मऊ आणि विस्तीर्ण प्रदेश. गुहा. त्यातून सातत्याने वाहणारे अनेकधर्मी स्राव. प्रत्येक शरीराचे आपापले गंध. अगदी स्वतःचे असे. एकाच शरीरातले त्वचेचे असंख्य पोत. कानाच्या पाळीच्या मऊ आरक्त त्वचेपासून टाचांवरचे खरबरीत पोत आणि नखं त्वचेला मिळतात तिथले गाडीसारखे फुगीर पोत. माझ्या शरीराची आणि माझी नीट ओळखही नाही.

विषय: 
प्रकार: 

'मोनोलॉग' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज सकाळी तुमचं डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात गेलो होतो. हातातली कागदपत्रं छोट्या खिडकीतून आत सारल्यावर आतला कारकून मला म्हणाला, “कुठे जाळणार?” मी भांबावून जाऊन गप्पच राहिलो, तसा तो म्हणाला, ”बॉडी कुठे नेणारे जाळायला? वैकुंठातच ना?”

प्रकार: 

'फिक्शन' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काही केल्या घरामध्ये ब्लेड सापडत नव्हतं. मी आधी बेसिनच्या वरचं कपाट उघडलं. मग कपड्यांचे कप्पे शोधले, स्वयंपाकघर शोधलं. घरामध्ये ब्लेड नव्हतंच. पण माझा चडफडाट झाला नाही. घरामध्ये ब्लेड नसणं स्वाभाविकच होतं, कारण धारदार पात्याचं चकाकणारं ब्लेड आपण हल्ली कशाला वापरतो? दाढी करताना सेफ्टी रेझर्स वापरतात, ज्यामुळे त्वचेला इजा पोहोचत नाही. हरकत नाही. मी चपला चढवल्या आणि लिफ्टमधून एकेक मजला पार होताना बघत खाली जायला लागलो. मी त्या दिवशी निळी शॉर्ट आणि काळा टी-शर्ट घातला होता हे मला उगीचच लक्षात आहे.

विषय: 
प्रकार: 

'प्रकरण' - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आपल्याला वाटत असतं की, आपण रोजचं जगणं अगदी आरामात जगतोय. खातोय. पितोय. हिंडतोय. काम करतोय. एकटे किंवा कुणासोबत. आणि वरती आकाशामध्ये तो ढग येऊन थांबलेला कळतही नाही आपल्याला.

असंच वाटत असतं की, आकाश तर अगदी निरभ्र आहे वरती. कारण खरं म्हणजे गेले अनेक दिवस आपण वर पाहिलेलंच नसतं. पण एकदा कधीतरी नजर वर जाते आणि सगळा मामला लक्षात येतो. आपण प्रेमात पडलो आहोत. पहिल्यांदाच किंवा पुन्हा एकदा.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - श्री. सचिन कुंडलकर