ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असा गैरसमज करून घेउ नये.
हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे.
हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.
कोणाला ह्या माश्याचे खरे नाव माहीत असल्यास नक्की कळवा ह्या माश्यांच्या जमाती मार्फत त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल 
रस्सा करायचा असल्यास इतर रश्या प्रमाणे खोबर्याच्या वाटण घालून करता येतो.
माशाला चव चांगली असते.


















) आता एक वर्ष झालं, प्रस्थापित मायबोलीकर होण्याच्या प्रोसेस मधला एक ठळक टप्पा गाठला आणि मनाशी ठरवतच होते की आता मायबोलीकरांना भेटलं पाहिजे. तर एक दिवस दिनेशदांची मेल आली. ते भारतात येणार होते आणि जागूकडे काही जण जमणार होते. दिनेशदांचं आमंत्रण, जागूसारख्या सुगरणबाईकडे जेवण आणि माझी वर्षपूर्ती असा सगळा योग एकत्र जुळून आला नि आमचं घोडं एकदाचं मायबोलीच्या गंगेत न्हायला तयार झालं.









