समाज

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

Submitted by अत्रुप्त आत्मा on 21 February, 2013 - 14:37

http://sphotos-e.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/487859_553207024704322_294282854_n.jpg
(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजीhttp://maps.google.co.in/maps?hl=hi&q=घनगड&psj=1&bav=on.2,

शब्दखुणा: 

भारतीयांचा परदेश प्रवास - कारणे व परिणाम

Submitted by पुग on 20 February, 2013 - 04:33

मनुष्य परदेशी का जातो , त्याची काय कारणे असू शकतात व त्याच्या परदेश गमनाचे काय परिणाम होतात या विषयी माझे विचार मांडावेत हा या लेखाचा प्रयत्न आहे. खरे तर परदेश गमन हे काही मनुष्यास नवीन नाही.गेली अनेक शतके विविध कारणास्तव तो हे करत आला आहे. मी गेल्या सुमारे १०० वर्षातील विविध घटना विचारात घेतल्या आहेत.
मनुष्याची परदेशी जाण्याची इच्छा प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे मुळे होते
१. वैयक्तिक कारणे
२. सामाजिक कारणे

१. वैयक्तिक कारणे

महिला दिन २०१३ संयुक्ता-सुपंथ सामाजिक उपक्रमः माहिती पाठवण्याचे आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 17 February, 2013 - 23:51

नमस्कार,
गेली ३ वर्षे महिला दिनानिमित्त मायबोली-संयुक्ता-सुपंथ तर्फे गरजू संस्थांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा उपक्रम चालवला जातो. ह्या वर्षी पण हा उपक्रम होणार आहे पण उपक्रमाचे स्वरूप थोडेसे वेगळे ठेवत आहोत. आशा आहे उपक्रमाला अजून जास्त प्रतिसाद मिळेल.

वेगळेपणा काय असेल?
१. दोन प्रकारे उपक्रम राबविला जाईल.
- आर्थिक मदत - ज्यात दरवर्षीप्रमाणेच गरजेच्या वस्तू विकत घेऊन संस्थेला दिल्या जातील.
- श्रमदान/बुद्धी दान वगैरे... ज्यात आर्थिक मदतीची गरज नसेल

आमचें गोंय - भाग ११- कोंकणी भाषा: इतिहास आणि आज

Submitted by टीम गोवा on 17 February, 2013 - 23:49

वयाची ऐशीतैशी...

Submitted by मोहना on 12 February, 2013 - 22:49

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकर्त्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोटाळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."

शब्दखुणा: 

भूत कसे बनते? -- एक प्राचीन पाक कृती ;-)

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 February, 2013 - 05:41

भूत बनविण्याची पाक-क्रुती:-

साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते)

शब्दखुणा: 

आमचे गोंय - भाग १० - गोव्याची खाद्यसंस्कृती

Submitted by टीम गोवा on 11 February, 2013 - 00:03

लेडीsज (अँड जंटलमन) ऑफ द ज्युरी..

Submitted by लोला on 10 February, 2013 - 19:50

"मला तर इथं क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय... "

हाताची घडी घालत, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतरांकडे आणि मग छताकडे बघत आजीबाई म्हणाल्या.

चार भिंतीतलं राजकारण

Submitted by रैना on 6 February, 2013 - 08:15

चार भिंतीतलं राजकारण- विद्या बाळ

"...घराघरातलं कुटुंबात शिजणारं आणि चालणारं राजकारण कुटुंबसंस्थेइतकंच जुनं आहे. आपल्याला ते जाणवत नाही, लक्षात येत नाही. याची दोन कारणं आहेत. कुटुंबाच्या गौरवीकरणात आपल्यावरच्या म्हणजे स्त्रियांवरच्या उदात्त संस्कारांची परंपरा फार मोठी आणि घट्ट आहे. त्यामुळे स्वार्थत्याग, समर्पण, वात्सल्य, सोशिकता यासारख्या ‘गुणांची’ मक्तेदारी स्त्रियांवर लादण्यात परंपरा यशस्वी झाली आहे. वास्तविक हे ‘गुण’ हे खरंच चांगले असतील तर पुरुषांमध्येही त्यांची रुजुवात का बरं करण्यात आली नसेल? ..."

- विद्या बाळ

पूर्ण लेख इथे उपलब्ध आहे. वाचनिय.

शब्दखुणा: 

भारतिय रेल्वे आणि तॄतिय पंथी व ईतर

Submitted by डॉ. बंडोपंत on 6 February, 2013 - 02:23

रेल्वेच्या प्रवासात बर्‍याचदा रिझर्वेशनचे तिकीट मिळाले नाही की, अगदी गितांजली असो की कोणतीही सुपरफास्ट एक्सप्रेस असो तॄतियपंथी लोंकांकडुन बर्‍याचदा पैसे मागितले जातात कधीकाळी ते त्यात समाधानी होते. लोकही अशा लोंकांना यथायोग्य देऊन मोकळी होत. परंतु आता त्रास जास्त वाढला आहे. हे लोक सरळ पुरुषांच्या मांडीवर येऊन बसतात (कधी कधी ते तॄतियपंथी असल्याचे जाणवत नाही कदाचित यात पैशासाठी काही बाया घुसल्या असल्या बाबत शंका येत) आणि पैशाची मागणी करतात. कमी दिले तरी त्रास देतात. नाही दिले तर मारतातही. नुकताच नंदुरबार जवळ अशी मारहान केल्याचे वाचले आहे. रेल्वे प्रशासनही यांच्याकडे दुर्लक्ष करते आहे.

Pages

Subscribe to RSS - समाज