भारतिय रेल्वे आणि तॄतिय पंथी व ईतर

Submitted by डॉ. बंडोपंत on 6 February, 2013 - 02:23

रेल्वेच्या प्रवासात बर्‍याचदा रिझर्वेशनचे तिकीट मिळाले नाही की, अगदी गितांजली असो की कोणतीही सुपरफास्ट एक्सप्रेस असो तॄतियपंथी लोंकांकडुन बर्‍याचदा पैसे मागितले जातात कधीकाळी ते त्यात समाधानी होते. लोकही अशा लोंकांना यथायोग्य देऊन मोकळी होत. परंतु आता त्रास जास्त वाढला आहे. हे लोक सरळ पुरुषांच्या मांडीवर येऊन बसतात (कधी कधी ते तॄतियपंथी असल्याचे जाणवत नाही कदाचित यात पैशासाठी काही बाया घुसल्या असल्या बाबत शंका येत) आणि पैशाची मागणी करतात. कमी दिले तरी त्रास देतात. नाही दिले तर मारतातही. नुकताच नंदुरबार जवळ अशी मारहान केल्याचे वाचले आहे. रेल्वे प्रशासनही यांच्याकडे दुर्लक्ष करते आहे. यांना सरकारने यथायोग्य सन्मान द्यायला पाहीजे पण हे होत नाही. दुसरे पुड्या विकणारे, भिकारी हे ही रिझर्वेशनच्या डब्यात असतातच यांनाही कोणी हटकत नाही . पुढेमागे मेट्रोतही दिसायला लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असला त्रास आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये पुणे ते मनमाड दरम्यान अनुभवला होता. रेल्वे प्रशासन कांहीही लक्ष देत नाही. आताही पुणे दौंड दरम्यान असतो.

यात पैशासाठी काही बाया घुसल्या असल्या बाबत शंका येत>>> पैशासाठी बाप्ये भी घुसलेत अस वाटतय.
हप्ता वसुल केल्यासारखं पैसे वसुल कर्तातच.

असाच अनुभव मलाही सुरतला जातानी आला आहे. बाजुला काही पुरुष व काही तॄतिय पंथी टोळके थांबलेल्या रेल्वे खाली बसुन पैशाची देवानघेवान करीत होते.

गुण्डागर्दीचे हे एक नविन रूपडे आहे, हिन्दी सिनेमासृष्टीनेही यान्च्या उदात्तीकरणात हातभार लावला आहे. अर्थात सरकारकडून/प्रशासनाकडून कोणतीही ठोस अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
त्यान्ना(ही) आपले म्हणा [अन गप्प बसा]! Proud