नमस्कार. काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात कमी वेळेत प्रचंड मोठा पाऊस पडला. लोणावळ्यामध्ये तर पूर्ण पावसाळ्याइतका पाऊस दोन दिवसांमध्ये पडला. त्यामुळे लोणावळ्यात मोठा पूर आला आणि इंद्रायणी- पवना नद्यांनी लोणावळ्यापासून पिंपरी चिंचवड- आळंदीलाही तडाखा दिला. लोणावळ्यातले माझे मित्र श्रीरंगजींच्या परिसरात आठ फूट पाणी होतं. योगेश्वर सोसायटी, भांगरवाडीतलं त्यांचं तळमजल्यावरचं घर दोन दिवस अर्ध पाण्यात होतं. महापूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्याशिवाय लोणावळ्यातल्या हुडको भागातल्या वस्तीला महापूराचा मोठा फटका बसला. तिथे एनडीआरएफने बोटींमधून लोकांना वाचवलं.
कधी कधी मूड उगाचच नकारात्मक होउन जातो. जळी-स्थळी- काष्ठी-पाषाणी फक्त स्वतःच्या चूका आठवु लागतात. आणि त्याही १० पटींनी मॅग्निफाईड. खरे तर आपण सारे जण उन्नीस बीस त्याच किंवा तितक्याच गंभीर चूका करत असतो, जवळ जवळ चूक करता करता सावरलेलो असतो. ते काही का असेना, निखालस ईव्हिल आणि निर्दयी आपल्या इनर क्रिटिकला ते मंजूर नसते. खदाखदा हसत क्वचित कुत्सित हसत आपल्यातील प्रत्येक दोष तो १० पटींनी मॅग्निफाय करुन दाखवत असतो. कामच आहे ना ते त्याचे - उगाच तांडव करायचे.
नमस्कार मंडळी,
माफ करा धागा काढायला जरा उशीर झाला. माझ्या माहितीतील सेवा सुविधांची इथे माहिती देत आहे. इतरांनीही यात भर घालावी ही विनंती.
✪ समाजातल्या अवघड प्रश्नांना सोडवण्याचा ध्यास
✪ पंखास या बळ दे नवे, झेपावया आकाश दे
✪ कर्तृत्वाचा व दातृत्वाचा "सेतू"
✪ अनाथ असण्यापासून सनाथ होण्याचा प्रवास- गायत्री पाठक
✪ गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मिळूनी करू मात
✪ "तुम्ही जे कराल, तेच तुमच्याकडे फिरून येईल"
✪ अनाथ मुलींना मिळणार हक्काचं माहेर
✪ कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता
पेंटरचा व्यवसाय असलेल्या एका कामगाराचे मदतीचे आवाहन त्यांच्याच शब्दात.


पेंटर सारखे काम असल्याने नियोजन करता येत नाही. हातावर पोट आहे. इन्श्युरन्स नाही.
तरीही त्यांनी लाखभर रूपये बचतीतून जमा केले. पण त्यांना लागणारी रक्कम प्रचंड आहे. ती मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मिलाप या फंडरेजरद्वारे मदतीसाठी आवाहन केले आहे.
मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे. "आर्ट इज नॉट आर्ट अनटिल इट डिस्टर्ब्स यु" हे वाक्य या पुढील कवितेबद्दल तंतोतंत खरे आहे. ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीची पराकोटीची दाहक, इन्टेन्स कविता आहे ही अतिशय वेगळ्या विषयावरील ही कविता वाचकाच्या हृदयात भीती, घृणा, वात्सल्य आणि करुणा यांचा कल्लोळ माजवते, या सर्व भावना एकाच वेळी उद्दीपीत करते.
या विषयावर मी वाचलेली ही पहीलीच कविता. माझा ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीला , तिच्यातील प्रतिभेला तसेच स्वतःची कहाणी जगापुढे मांडण्याकरता लागणार्या धैर्याला कडक सॅल्यूट.
.
नमस्कार मायबोलीकर, मी बरीच वर्ष रोमात आहे मायबोलीवर आणी आज ब-याच वर्षानी इथे लिहितो आहे. एका गोष्टीविषयी तुमचा सल्ला / विचार हवा आहे.
एक जवळची नात्यातील चुलत बहीण आहे जिच्याविषयी सल्ला हवा आहे. ही बहीण सध्या नाशिक जवळ एका तालुक्याच्या ठिकाणी तिच्या नव-याबरोबर राहते पण तिच लग्न register नाहि. नव-याकडुन सतत बोलणी आणी त्रास आहे. माझे काका/काकु आता हयात नाहीत आणी तिला सख्खा भाउ/बहीण कीन्वा मावशी कोणी नाहिये.. बहीणीच वय ५४ आहे ..