अनुभव

राजाराम सीताराम एक ............भाग ११.........पिटी परेड

घराची किंमत

'घरापासून दूर राहिल्यावर घराची किंमत कळते', म्हणतात.

आता, म्हणताना जरी 'घराची किंमत' असं म्हणायची पद्धत असली, तरी इथे 'घर' म्हणजे काय, तर आई-बाबा, भाऊ-बहिणी, काही आवडीचे मित्र-मैत्रिणी वगैरे सगळं आलंच. ते तर महत्त्वाचेच, पण घर म्हटलं की तितकंच महत्त्वाचं म्हणजे रोज न चुकता तिनतिनदा मिळणारा आयता पौष्टीक आहार. इष्टसमयी प्रगट होणारे चहापोहे निराळे, आणि ही कामं 'न सांगता' करून देणार्‍या 'आई' या व्यक्तीकडून आपली आवडनिवड जपली जाणं हे सगळं म्हणजेच ते 'घराची किंमत' असावं बहुधा.

नशीब भाग - ५२

१९९० चा तो काळ होता. मोठ्या मुलाचे शाळेत शिक्षक वर्गाशी पटत नव्हते कारण मागील भागात घडलेला नाटकातील बक्षीस सोहळा. मी वर्तमान पत्रातून शिकवणी जाहिराती बघितल्या. त्यातल्या एका दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधला. बोलण्यावरून समजले बाई "मद्रासी" होती. तिने माझ्या मुलाच्या शाळेचे नाव विचारले, मी नाव सांगताच त्या शाळेतल्या मुलांना ती शिकवत नाही सांगून दूरध्वनी बंद केला. मी यादीतला दुसरा दूरध्वनी क्रमांक शोधला. बोलण्यावरून समजले बाई "बंगाली" होती. ह्या बाईने शाळेचे नाव, इयत्ता, कोणते विषय, विषय शिकवणार्‍या शिक्षकाचे नाव वगैरे विचारले. तिने सांगितलेले शिकवणी शुल्क ऐकून मी दूरध्वनी बंद केला.

नशीब हे शिकलो - ५१

माझ्या पहिल्या माझदा गाडीला अपघात झाला त्यानंतर मला गाडी मिळायला चार महिने लागले. माझी नवीन गाडी माझदा ३२३च होती, रंग आम्हा सगळ्यांनाच आवडला होता. सि मिस्ट समुद्राच्या पाण्याचा हिरवा रंग, गाडीचा आकार फार आकर्षक होता. ही गाडी घेऊन ६ महिनेच झाले असतील दुबईला पुन्हा कामा निमित्त पाहाटे जाऊन दुपारी एकला परत येत होतो. गाडीत एकटाच होतो. मी युएई सीमेच्या आत होतो. गाडीचा वेग थोडा कमी केला व एका हाताने पाण्याची बाटली पकडायचा प्रयत्न केला. ति सरकून खाली पडली म्हणून उचलायला गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकही गाडी नव्हती मी एकटा रस्त्यावर होतो.

कलंदर, मी आणि जाहिराती (२)

कलंदर, मी आणि जाहिराती (१) - http://www.maayboli.com/node/15684
***
***

'माझ्या व्यवसायाच्या जाहिराती करायच्या आहेत. येऊन भेटू शकाल का?' असा एक दिवस फोन आला. आपल्याला काय, आपण सांगितलेल्या कामाचे नि दिलेल्या भाकरीचे. चलो स्वारगेट, तर चलो स्वारगेट. नो प्रॉब्लेम.

फोनवरून दिलेल्या मित्रमंडळ चौकातल्या पत्त्यावर जाऊन भेटलो. प्रसन्न-हसतमुख, गोरं, उंचनिंच सव्वासहा फुटी, बघता क्षणीच छाप पडेल असं व्यक्तिमत्व. नाव प्रताप काळे. जाहिरातींच्या स्वरूपावरून इस्टेट एजंट असावा. जाहिरातींचे ड्राफ्ट्स देऊन, हिशेब करून लगेच पैसेही देऊन टाकले.

एक श्वान जोडी

ही जोडी मी रोज बघत होतो, कुतुहूल वाढले, मालक फोटो करता तयार झाला. सकाळी ९ ला घेतलेल्या ह्या प्रतिमा.

44.jpg46.jpg52.jpg58.jpg

वाढदिवस!!!

वर्षातले ३६३ दिवस एकीकडे! आणि *हा दिवस दुसरीकडे!
अशा तुलनेतही ज्याचे पारडे खाली जाईल, तो दिवस म्हणजे वाढदिवस!!

सकाळी बरोब्बर ६.१५ ला जाग आली. मोबाईलला गजर करण्याची गरजच पडली नाही. एका आवर्तनामधे उठलो. पांघरूणाची घडी केली. आवरलं. एक पेला भरून पाणी प्यालं. पुस्तकात वाचल्याप्रमाणे प्राणायाम केला. १२ सूर्यनमस्कार घातले. जॉगिंगला गेलो. साधारण अर्ध्या तासाने परत आलो. मनसोक्त व्यायाम झाल्यामुळे आनंद झाला. दिवसाची सुरुवात अशी छान झाली, म्हणजे दिवसही छानच जाणार! त्यातून आज माझा वाढदिवस! मग काय बोलता?

राजाराम सीताराम........भाग १०......एक गोली एक दुश्मन। ..भाग २

ह्या आधीचे ९ भाग येथे वाचायला मिळतील

ह्या आधीचे..........

……………. उस किकर को दाये छोडके आना। पहले तीन लुंगा। बाकीची मुले छू झाली व मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. बऱ्याच वेळाला त्या झाडाला शिवून झाल्यावर कॅप्टन गिलने, ज्यांनी ज्यांनी आतून स्वेटर घातले होते त्यांना काढायला लावून त्याची होळी पेटवली. किती जणांच्या आस्था त्या होळीत पेटल्या गेल्या असतील आम्हालाच ठाऊक. त्या दिवसा पासून पुढे कधी कोणी गणवेशात स्वतःहून फेरबदल करण्याच्या भानगडीत पडले नाही………….

माझा स्पेलिंग बी स्पर्धेतील सहभाग

"आई, मी स्पेलिंग बी मध्ये भाग घेतेय." मुलीने जाहिर केलं आणि माझा चेहरा खाडकन उतरला.
"अगं त्यासाठी स्पेलिंग यावी लागतात." माझ्या स्वरातली अजीजी तिच्या पर्यंत पोचली नाही.
"मग?"
"मला येत नाहीत."
"पण भाग मी घेणार आहे. खी खी खी...."
"हो, पण तुझी तयारी मला करुन घ्यावी लागेल नं." माझं केविलवाणं स्मित.
"ईऽऽऽ त्यात काय आहे. तू मला शब्द विचार, मी स्पेलिंग सांगेन."
"अगं पण ते शब्द विचारता यायला हवेत ना मला?"
मुलगा फजिती बघायला उभा होताच. फजितीची फटफजिती झाली तर पहावी म्हणून तोही मध्ये पडला.
"बाबा तर म्हणत होता तुझ्याकडे इथली पण पदवी आहे."
"शिक्षणाचा काही उपयोग नसतो काहीवेळेस"