बातमी

अस्त

दिवसभर बहुदा कुठे-कुठे फिरल्यामुळे ग्लानी येत होती. येथील सुर्यास्त खूप प्रसिद्ध होता - रोज एक वेगळा अनुभव म्हणे. तिकडेच आमची बस थांबकळत निघाली होती. जास्त वेळ उरला नसल्याने सर्वच मनातल्या मनात का होईना रस्त्यावरील गर्दीला शिव्या देत होते. बसच्या डाव्या बाजुला पश्चीम होती व सलग असलेल्या उत्तुंग इमारतीं दरम्यान असलेल्या रस्त्यांच्या बारक्या फटी अचानक प्रकाश वाढवुन खुणावत होत्या, आकर्षीत करत होत्या, चुळबुळ वाढवत होत्या.

READY!!!

काल काही मित्रांसोबत READY!!! पाहिला.

प्रमुख भुमिका: सलमान खान. असिन थोट्टुमकल.

गाणी: ढिंक चिका. कॅरेक्टर ढिला. हमको प्यार हुवा है.
* म्युझिक : प्रितम.

टारगेट ऑडियन्स : कॉलेजकुमार/कुमारींसाठी (ज्यु. कॉलेज) किंवा दुसरी-तिसरीतली पोरं.

- हा चित्रपट बहुधा एका रात्रीत शुट झाला आहे. सलमान सतत झोपलेल्या डोळ्यांनी वावरतो.
अतीच झाल्यावर अधेमधे चष्मा घातला आहे.

- असिनचा मेकअप नक्कीच कोणी इंडस्ट्रियल ट्रेनी माणसाने केला आहे. ती मधेच गोरी मधेच सावळी मधेच निम्सावळी दिसते.

नववर्ष २०११

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या भयंकर शुभेच्छा....
जख्खी साहेबांनाही फिदीफिदी
... .. .. .. .. ... .. ..

ऑस्ट्रेलियात महिलाराज....

आजच्या ऐतिहासिक दिवशी ऑस्ट्रेलिया देशाच्या इतिहासात प्रथमच एक महिला पंतप्रधान झाली. गेल्या (कालपर्यंतच्या) सरकारात उप पंतप्रधान असलेल्या मा. ज्युलिया गिलार्ड आजपासुन पंतप्रधान झाल्या. तथाकथित पुढारलेल्या देशांत आजवर केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला देशाचे नेतृत्व करु शकल्या. http://www.terra.es/personal2/monolith/00women3.htm
पुढारलेल्या देशाच्या मानाने अविकसीत अन विकसनशील देशांमध्ये महिला राजकीय नेतृत्व नेहमीच आघाडीवर राहिले. भारत-पाक-बांगलादेश ह्यांनी तर कित्येक दशके अगोदरच महिला नेतृत्वाचा स्वीकर केला... नव्हे महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले!

इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

सदर घटना मला भारतीय लोकशाही च्या पुढील प्रवासात अत्यंत महत्वाची वाटते. म्हणुनच कानोकानी मध्ये दुवा देऊन सुद्धा मला ही बातमी माझ्या पानावर असायलाच हवे असे वाटले स्मित

_____________________
इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

सोर्सः http://www.esakal.com/esakal/20100609/5385281238549006040.htm

अहमदाबाद - राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांत इंटरनेटद्वारे मतदान करण्यास परवानगी देणारी अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी काढली. राज्य निवडणूक आयोगाने हा "ई-वोटिंग'चा प्रस्ताव मांडला होता.

डीसी स्नेहसम्मेलन

GTG20100410.pdf (37.96 KB)

घरी इंटरनेट बंद पडल्यामुळे PDF करावी लागली. तेव्हा इथून वाचा..

चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य स्थान मिळण्यासाठी राज्यपालांना शिष्टमंडळाची भेट

केंद्रशासित चंदीगढ प्रदेशात पंजाबी भाषेला तिचे योग्य व कायदेशीर स्थान मिळवून देण्यासाठी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली.

सचिनचं द्विशतक

आज सचिनने आंतरराष्ट्रिय एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवलं..
सचिनच्या विक्रमांच्या मांदियाळीत अजून एका विक्रमाची भर..

त्याला मानाचा मुजरा!!!

15_sachin_tendulkar_2.jpg

देवा, आमचा प्रणाम स्वीकार!!!

आजपासून शेतकऱ्यांसाठी सबकुछ 'किसान' प्रदर्शन

प्रगतीशील शेतकऱ्यांना नव्या शेतीसाठी विचार आणि तंत्रज्ञान पुरवणारे 'किसान' हे देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन यंदा मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंदाच्या मैदानावर १४ ते १८ डिसेंबर दरम्यान भरणार आहे. शेती क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार असून राज्यभरातील सुमारे एक लाख शेतकरी त्याला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5334051.cms

शरद पवार

http://72.78.249.124/esakal/20091211/4905875610779262607.htm

शरद पवारांचे अनेक पैलू प्रकाशात येणे गरजेचे - श्रवण गर्ग
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 11, 2009 AT 12:15 AM (IST)
Tags: national, sharad pawar, shravan garg, snn

नवी दिल्ली - शरद पवार हे राजकीय नेते म्हणून परिचित असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू पुरेशा प्रमाणात राष्ट्राच्या समोर आलेले नाहीत. ते राष्ट्राच्या निदर्शनास आणून दिल्यास त्यांच्यातही राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता असल्याची बाब प्रकाशात येईल, असे मत "भास्कर'चे समूह संपादक श्रवण गर्ग यांनी आज येथे व्यक्त केले.