शैलजा यांचे रंगीबेरंगी पान

श्री गणराय

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मध्यंतरी सान्वीकडे गेले होते काही कामानिमित्त. तेह्वा तिने केलेली एकसे एक सुरेख काचेवरची पेंटींग्ज पाहिली. त्यातला एक बाप्पाचे पेंटींग मला खूप आवडले, आणि ते घेऊनही टाकले लगेच! Happy

गमते उदास...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

खरं तर हे, असले श्रद्धांजलीवाले लेख लिहायला मला मुळीच आवडत नाही! जमत तर त्याहूनही नाही! मुळात, ज्यांच्या निधनामुळे काही हरवलं आहे असं वाटावं, अशी माणसं बोटांवर मोजण्याइतकीही नसतात, आणि अशी माणसं कायमची उठून गेल्यावर काय सुचणार लिहायला तरी? तेह्वा, मग लिहिणार तरी काय... तरीसुद्धा, सुनिताताई, तुम्हांला, तुमची एक वाचक म्हणून काही सांगावसं वाटलं, म्हणून ह्या लेखनप्रपंचाचा प्रयत्न.

तसा आपला संबंध फक्त लेखिका आणि वाचक ह्या कुळीतला. एवढाच. खरंतर, एकतर्फीच संबंध, म्हणजे, मीच एक वाचक म्हणून, प्रथम तुमच्या लिखाणाशी आणि नंतर, लिखाण वाचता वाचताच कधीतरी आपसूक तुमच्याशी जोडलेला.

विषय: 
प्रकार: 

बहुरूपी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गांधी बाजार, बसवनगुडी, बंगलोर इथे काढलेले प्रकाशचित्र.
सहज गंमत म्हणून नारळ फोटो एडिटरमध्ये रंगवलेत! नारळवाल्याकडे नव्हते असे रंगीत नारळ विकायला! Proud

मोठा फोटो इथे पहा.

धन्यवाद!

विषय: 

गंध फुलांचा गेला सांगून...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मोग-याचा बेभान करणारा गंध बघ माझ्याकडे म्हणून खुणवायला लागला आणि आपोआप याकडे लक्ष वेधल गेलं. नाजूकरीत्या गुंफलेल्या ह्या टपो-या गज-यांचा मोह टाळणं कठीणच, नाही?

मोठा फोटो इथे पाहा.

धन्यवाद!

विषय: 

दुरितांचे तिमिर जावो...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात....

ह्या फोटोबरोबर काय लिहावं हे सुचत नव्हतं खरं तर. ते इतक्या आपसूक आणि अशा तह्रेने सुचेल असं वाटलं नव्हतं मात्र! दुरितांचे तिमिर जावो हे शीर्षक फोटोला दिलं खरं, पण त्याचा अर्थही उमगायला थोडीफार मदत झाली असं मानायला हरकत नाही. Happy

विषय: 

दिवाळीची प्राजक्त पहाट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

prjkt1_for_mb.jpg

मोठा फोटो इथे पाहायला मिळेल.

विषय: 

झुरळे, पाली आम्हां सोयरी..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!

अगोदरच्या घरात पाल नव्हती अजिबात. नवीनच घर बांधलं होतं आणि घरमालक स्वतः रहायच्या आधी मी तिथे भाडेकरु म्हणून रहायला गेले. पाल - झुरळ विरहीत घर म्हणजे एक सुखस्वप्नच प्रत्यक्षात उतरल होतं! अर्थात, त्याऐवजी मुंग्या होत्या! पण त्या चालतात, आणि त्या काळ्या होत्या. लहानपणी म्हणत असू, काळ्या देवाच्या असतात, लाल चावकुर्‍या...

प्रकार: 

काही संवाद, काही विषाद...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हे आपलं असंच मनात आलेलं, काहीबाही सुचलेलं आणि तसंच्या तसं गिरगटवलेलं लेखन. एका वाक्याचा कदाचित पुढच्या वाक्याशी काही संबंधही नसेलही! Happy क्षणात इथे, क्षणात तिथे, असं काहीसं. थोडंस दिशाहीन, आणि कदाचित बर्‍यापैकी अर्थहीन, पण आत्तातरी आहे हे असं आहे! Happy

विषय: 
प्रकार: 

पिवळ्या पंखांचा पक्षी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

असं म्हणतात की कोकणात परसबागेत जिथे केळी असायच्या तिथे कर्दळीही!
केळ जशी नवपरिणित वधूसारखी, तशी फुललेली पानेरी कर्दळ ही सचैल न्हालेल्या षोडशेसारखी!

महानोरांच्या एका गीतातील काही ओळी आठवतात,

पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना..
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..

विषय: 

रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

महानोरांनी किती सुंदर वर्णन केलंय पावसानं भिजलेल्या धरेचं! निसर्ग आपल्या अवतीभवती अनेक नयनरम्य कलाकृती घडवत असतो.

चिंब पावसानंतर श्रावणातली हिरवाई अलवार रंगातून निथळते. उमललेला प्रत्येक रंग जणू सांगत असतो,
रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!

rangmazawegala.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शैलजा यांचे रंगीबेरंगी पान