व्यवसाय

श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 December, 2011 - 04:12

कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.

निकिताची चॉकलेट स्टोरी (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 September, 2010 - 09:45

''असावा सुंदर चॉकलेटचा बंगला'' असं स्वप्न लहानपणी सगळेच बघतात. पण त्यातली एखादीच निकिता असते, जी वयाच्या पंधराव्या वर्षापासून ह्या स्वप्नातल्या चॉकलेट्सना मूर्त स्वरूप देऊ लागते, छंद म्हणून चॉकलेट्स बनवता बनवता केवळ सतरा वर्षे वय असताना चॉकलेट्सचे आणि फक्त चॉकलेट्सचे दुकानही सुरू करते! ज्या वयात इतर मुले-मुली कॉलेजला बुट्ट्या मारून स्वच्छंद जगणे, पार्ट्या, मित्रमैत्रिणी यांच्यात मश्गुल असतात त्या वयात अवघ्या एकोणिसाव्या वर्षी निकिता आपल्या तिसऱ्या ''चॉकलेट स्टोरी''च्या दुकानाचे मोठ्या दिमाखात अनावरण करते!!

‘अर्थार्जन करणार्‍या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 August, 2010 - 05:38

जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.

इमु पालन

Submitted by एजे on 15 January, 2010 - 00:08

ईमु पालन : ईमु ह्या पक्षाला खुप मागणी आहे,त्यांचा वापर मांस, लेदर , तेल तसेच अंडी मिळवण्यासाठी होतो.
प्रकल्पाचा खर्च अंदाजे
दहा जोड्या : ३००,०००
जमीन १-२ एकर : ४००,०००
कुंपण : १००,०००
सालगडी : ७५,०००
पशुखादय (१ वर्ष) : १००,०००

--------------------------------------------
एकून अंदाजे ९,७५,००० ~ १०,००,००० रू

हा पक्षी १८ महिन्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतो.
एक जोडी प्रत्येक हंगामात १०- २० अंडी घालतो. म्हणजे एकून १००- २०० अंडी.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - व्यवसाय