मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला.
नमस्कार,
सध्या कंपनी मध्ये Go Green Go Green चे वातावरण आहे. त्यासाठी कंपनीत एक गट तयार केला आहे. आणि आता सर्वांना t-Shirt वर "पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे. यासाठी आपली मदत आवश्यक आहे.
- वाक्य शक्यतो मराठीतच पाहिजे आहे.
मला आतापर्यंत मिळालेली वाक्ये:
१) हिरवा साज, हिरवा बाज
भूमाईची राखू लाज
२) झाडे लावा झाडे जगवा...
३) कमीत कमी पोल्युशन
हेच उत्तम सोल्युशन
४) झाडे लावा आणि झाडे जगवा
पुढच्या पिढीला द्या स्वच्छ हवा
५) निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका
प्रवेशिका क्र. : ९
स्थळ: वेळास, ओलिव्ह जातीच्या सागरी कासवांचे प्रजनन ठिकाण. या कासवांच्या संख्येतील घट रोखण्यासाठी मादीने घातलेली अंडी संरक्षित जागी ठेउन ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना समुद्रात सोडले जाते. माणसाच्या हस्तक्षेपामुळे अंड्यातुन कमी पिल्ले जरी बाहेर आली तरी निदान सगळ्या अंड्याचे ऑमलेट तरी होत नाही!

प्रवेशिका क्र. : ८
छायाचित्र १ : अंधाराचा तास
सिडनी शहरातील 'green house gas pollution' कमी करण्यासाठी WWF च्या सहकार्याने आणि City of Sydney आणि New South Walse Government च्या साहाय्याने ३१ मार्च २००७ या दिवशी सिडनी शहरवाशीयांनी १ तास दिवे बंद ठेवले होते.
प्रवेशिका क्र. : ७
शीर्षक: "CFL दिवे"
CFL दिवे मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतात. हे दाखवलेले दिवे फक्त १३ वॉट्स वापरून ६० वॉट्सएवढा प्रकाश देतात.

शीर्षक: "शेकोटी"
कॅम्पिंग करताना रात्रभर शेकोटी करताना झाडांची कत्तल तर आपण करतोच, शिवाय कार्बन डाइऑक्साइड हवेत सोडून पर्यावरणाची हानी पण करतो.

प्रवेशिका क्र. : ६
नियोजनाचा अभाव :
बेफिकिर जनता.... निष्क्रिय सरकारयंत्रणा.... खिसेभरु राजकारणी आणि एकुणच पर्यावरणाबद्दल अनास्था.... परिणाम : हिरव्यागार डोंगरउतारावर झालेले कॉन्क्रीटचे अतिक्रमण!
ठिकाण : भारतातल्या अनेक अतिक्रमित हिलस्टेशन पैकी एक!
कल्पक नियोजन :
प्रवेशिका क्र. : ५
छायाचित्र क्र. १ :- पर्यावरणामधे सकारात्मक बदल घडवून आणणार्या घटना
यंदाच्या गणेशोत्सवात माझ्या मित्राने "इको-फ्रेंडली" गणेशमुर्ती आणली होती. मिनल लेले यांनी वृत्तपत्रांचा लगदा आणि शाडुची माती ह्यांचे मिश्रण वापरुन ह्या मुर्ती बनवील्या. मुंबईच्या प्रथम नागरीक डॉ. शुभा राऊळ यांच्या मदतीने त्याचे शिवाजी पार्क, दादर येथे प्रदर्शन देखिल भरवीले होते.

छायाचित्र क्र. २ :- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणणार्या घटना
प्रवेशिका क्र. ३
शीर्षक: "वार्याची बात "
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात असलेला महादेवाचा डोंगर परिसर म्हणजे दुष्काळजन्य प्रदेशच आहे. दरवर्षी इथे पावसाळ्यातही पुरेसा पाऊस पडत नाही. बर्याच गावांमध्ये तर पावसाळ्यातही ओढे, नाले, तळी कोरडीच असतात. पावसाळ्यातही टँकरनेच या गावांना प्यायचे पाणी मिळते. दृष्टिक्षेपात दूर दूर बस बोडके वृक्षहीन डोंगर दिसतात. इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एकमेव निसर्गदत्त गोष्ट म्हणजे 'सोसाट्याचा वारा'! जो वारा एका ढगाला कुठे विसावू देत नाही, की एखाद्या वृक्षाला पठारावर थारा! पण अशा प्रतिकूल परिस्थितही हार मानेल, तो प्राणी मनुष्य कसा?
पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २
माझे मग ते पान कोणते कसे ओळखू सांग!
स्थळ : फ्लोरिडा अक्वेरियम, टँपा, फ्लोरिडा. ही एक 'Non-profit environmental organization' आहे. नैसर्गिक पर्यावरणाबद्दल 'हसत-खेळत माहिती आणि जागृती' करण्यावर ह्या संस्थेचा भर आहे.