फोटोग्राफी

वो शाम कुछ अजीब थी...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

हे असं काही अनुभवायला नशीब लागतं... आणि मी खूप नशीबवान आहे !
इतका कमी आणि वेगळाच प्रकाश होता खरं तर, की ट्रायपॉड्शिवाय फोटो काढायची माझी हिंमतही झाली नसती...
पण समोरचं दृष्य पाहून श्वास आपोआपच रोखला गेला... आणि ट्रायपॉडशिवाय फोटो काढण्याची गुस्ताखी हम कर बैठे !

DSC_2344c.jpg
Yellowstone National Park, USA

शब्दखुणा: 

आईना देखकर तसल्ली हुई...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

कॅमे-यामधून पाहताना अचानक माझ्या मनाची अवस्था अशी माझ्यासमोर प्रतिबिंबासारखी सामोरी आली..क्षणभर दचकायला झालं स्वतःलाच असं समोर पाहून.. त्या क्षणी ही 'खिडकी' माझ्यासाठी माझ्या मनाचा 'आरसा' बनून गेली... गुलजारच्या 'आईना देखकर तसल्ली हुई...' ह्या ओळी आणि कॅमे-याचं बटन एकाच वेळी क्लिक झालं !

DSC_0177c.jpg
Grand Canyon, North Rim

शब्दखुणा: 

फोटोग्राफी : शटरस्पीड

Submitted by सावली on 26 September, 2010 - 22:20

शटरस्पीड, प्रकाशचित्रणातला एक अतिशय महत्वाचा पैलू. काढला जाणारा प्रत्येक फोटो कसा दिसणार हे ठरवणारा हा एक महत्वाचा घटक. वेगात जाणाऱ्या गाडीचे फोटो असोत , मऊशार सिल्की, प्रवाही दिसणारे निर्झर असोत, आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके असोत कि अंधाऱ्या अपुऱ्या उजेडात काढलेले देवळाचे गाभारे असोत. कुठल्याही फोटोमध्ये सगळ्यात आधी दिसून येतं ते जमलेलं किंवा हुकलेलं एक्स्पोजर अर्थात योग्य किंवा अयोग्य प्रमाणातला प्रकाश. आणि हां कंट्रोल करणारा एक महत्वाचा (एकमेव नाही हं!) पैलू म्हणजे शटरस्पीड.

फोटोग्राफी : तुमचा कॅमेरा

Submitted by सावली on 20 August, 2010 - 11:57

त्या दिवशीच मी कॅमेर्‍याच्या शटरस्पिड बद्दल लिहायला घेतल. आणि मला जाणवल की जोपर्यंत कॅमेरा कसा चालतो त्याच्या आत मधे काय असते हे जाणुन घेत नाही तो पर्यंत पुढचे विषय लिहायला आणी समजायला दोन्ही कठीण आहेत. प्रकाशचित्रण हि एक अशी कला आहे जिचा पायाच भौतिकशास्त्र (Physics, तंत्रज्ञान(technology) आणि काहीसा जीवशास्त्रीयही(Biology) आहे. त्यामुळे थोड्याफार तांत्रिक गोष्टी येणारच. पण तरिही या गोष्टी थोड्या सोप्या करुन सांगता येतात का बघते. काही जणांसाठी हे कदाचित अगदिच बाळबोध होईल. पण ज्यांना अजिबात माहित नाही त्यांच्यासाठीतरी मला इथुनच सुरुवात करावी लागेल.

फोटोग्राफी : फिल्टर्स

Submitted by सावली on 25 July, 2010 - 19:59

मी SLR फोटोग्राफी सुरु केली तेव्हा फिल्टर म्हणजे काय ते माहीतच नव्हतं. एकदा भावाने रंगीत फिल्टर आणून दिले मला. दोघानाही हे कसे वापरायचे ते माहीत नाही पण उत्साह दांडगा होता. त्या फिल्टर किट मध्ये निळा, पिवळा, लाल, हिरवा आणि केशरी असे रंग होते. आता ते तसेच लेन्स पुढे लावून काढले कि त्याच रंगात न्हालेला फोटो यायचा. आम्ही तसेच काही रंगीत फोटो काढले आणि नंतर तो फिल्टर किट फारसा वापरेनासा झाला. मग पुढे बऱ्याच दिवसानी आम्हाला कळल कि ते रंगीत फिल्टर कृष्णधवल फोटोग्राफी साठी असतात. पण आम्ही कधीहि त्याने कृष्णधवल फोटोग्राफी केली नव्हती!

फोटोग्राफी: जादूचा मंत्र (फोटोसह)

Submitted by सावली on 2 July, 2010 - 13:04

तुझे फोटो म्हणजे काय प्रश्नच नाही. मस्तच असतात.
कसे काय जमत तुला असे फोटो काढायला?
अस ऐकायला मिळालं कि कस वाटेल तुम्हाला? आणि अशी प्रतिक्रिया नेहेमीच मिळाली तर कस वाटेल? नेहेमी नेहेमी अस कौतुकाचे शब्द लाभले तर खरच छानच वाटेल ना?
हि काय जादू आहे का म्हणून काय विचारता? खरच हे अगदी बऱ्यापैकि शक्य आहे. विश्वास बसत नाहीये का? चला तर मीच तुम्हाला एक जादू शिकवते? जादू जी तुमची फोटोग्राफी लक्षणीयरित्या बदलेल. आणि तुम्हाला तुम्ही काढलेल्या फोटोबद्दल हमखास पावती मिळत जाईल.हो अगदी तुमचा कोणताही कॅमेरा असला ना तरीही.
आहात ना तय्यार? मंत्र सांगते ह आता.

फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा घोषणा

Submitted by संयोजक on 8 August, 2009 - 00:07

"रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा..." असं म्हणत आज रंगांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न चालू असतो. निसर्गातल्या रंगांपासून ते माणसांच्या रंगांपर्यंत, रंग अनेक इतिहास घडवून गेलेत, काव्य निर्माण करून गेलेत, कलाकारांना प्रोत्साहीत करून गेलेत. छायाचित्रण ही अशीच एक कला. छायाचित्रणात जेव्हा रंग टिपण्याची क्षमता आली तेव्हा त्यात खर्‍या अर्थाने क्रांती घडली. पण मग त्या पूर्वीचे छायाचित्रकार ह्या रंगांशिवाय आपली कला कशी बरं सादर करत होते? निसर्गातल्या करामती, इतिहासातल्या महत्वाच्या घटना, राजेरजवाड्यांचे ऐश्वर्य हे सगळं ह्या छायचित्रकारांनी टिपलं ते पण रंगांशिवाय...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - फोटोग्राफी