फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा घोषणा

Submitted by संयोजक on 8 August, 2009 - 00:07

"रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा..." असं म्हणत आज रंगांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न चालू असतो. निसर्गातल्या रंगांपासून ते माणसांच्या रंगांपर्यंत, रंग अनेक इतिहास घडवून गेलेत, काव्य निर्माण करून गेलेत, कलाकारांना प्रोत्साहीत करून गेलेत. छायाचित्रण ही अशीच एक कला. छायाचित्रणात जेव्हा रंग टिपण्याची क्षमता आली तेव्हा त्यात खर्‍या अर्थाने क्रांती घडली. पण मग त्या पूर्वीचे छायाचित्रकार ह्या रंगांशिवाय आपली कला कशी बरं सादर करत होते? निसर्गातल्या करामती, इतिहासातल्या महत्वाच्या घटना, राजेरजवाड्यांचे ऐश्वर्य हे सगळं ह्या छायचित्रकारांनी टिपलं ते पण रंगांशिवाय...

आज संगणक युगात छायाचित्रांचे रंग अगदी हवे तसे बदलता येतात, ते झाले तंत्र. छायाचित्रकार कॅमेर्‍याच्या डोळ्याने टिपतो ते कौशल्य. आपण पण जरा मागे जाऊन ब्लॅक आणि व्हाईट फोटोग्राफी करायचा प्रयत्न करूया ? रंगांशिवाय भावभावना, निसर्ग, सौंदर्य छायाचित्रात टिपूया ?

फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी

********************************************************

स्पर्धेचे नियम :

१. विषयाचे बंधन नाही.

२. फोटो 'ब्लॅक अँड व्हाईट' (Grayscale Image) अथवा 'सेपीया-टोन' (Sepia-toned Image) या २ प्रकारांमधे स्वीकारला जाईल.

३. कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे. मात्र बंधनकारक नाही.

४. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. असे सॉफ्टवेअर वापरून कलर चा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला असल्यास, तसा फोटो ग्राह्य धरण्यात येईल. मात्र फोटोत असे काही बदल केले असल्यास तसे लिहावे.

५. फोटोवर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा.

६. एका आयडी तर्फे एकच एन्ट्री स्वीकारली जाईल.

७. फोटो स्वत:च काढलेला असावा.

८. फोटो आधी मायबोलीवर प्रकाशित झालेला नसावा.

९. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.

स्पर्धेची सुरवात गणेश चतुर्थीला होईल आणि प्रवेशिका कशा आणि कुठे पाठवायच्या याबद्दल माहिती लवकरच दिली जाईल.

********************************************************

इतर स्पर्धांसाठी पहा : मायबोली गणेशोत्सव २००९ स्पर्धा घोषणा

विषय: 

हां, हे जमेल, जमेल म्हन्जे काय? जमलच! फोटू काढून तय्यार हे! कवा कुठ कसा टाकायचा तेवढ सान्गा Happy ते वॉटरमार्कच काय जमत नाहीये Sad

संयोजक, 'विषयाचे बंधन नाही' म्हंटल्यावर मायबोलीकरांनी स्वतःचा किंवा कुटुंबियांनाचा फोटो टाकायचं ठरवलं तर फोटोवर आयडी चा वॉटरमार्क न घालताही ओळखीतल्या बर्‍याच मायबोलीकरांना 'फोटो कुणी काढला असावा' ह्याची कल्पना येईल.

लिंबूटिंबू, फोटोवर वॉटरमार्क घालणं हे बंधनकारक नाहीये. पण घालायचा असल्यास "मायबोली गणेशोत्सव २००९" असाच घालावा.

वॉटरमार्कची अजुन महिती ह्या साईटवर मिळेल. http://picmarkr.com/

रंगीत फोटो काढुन तो पिकासा/फोटोशॉप मधे काळा-पांढरा किंवा सेपिया केला तर चालणार आहे का?

सन्योजक, धन्यवाद, पण ती साईट आमच्या इथे ब्यान आहे Sad
स्पर्धेकरताच्या फोटोचा आकार थोडा मोठा ठेवायची परवानगी असुद्यात Happy म्हणजे दिसायला बरे दिसेल

लिंबूटिंबू,
प्रवेशिका मोठ्या आकाराच्या (high resolution pictures) फाईल साईझ मधे सुद्धा स्वीकारल्या जातील.
प्रवेशिका कशा आणि कुठे पाठवायच्या याबद्दल माहिती लवकरच दिली जाईल.

सर्व स्पर्धा गणेश चतुर्थीला म्हणजेच २३ ऑगस्ट्ला सुरू होतील.
त्याच दिवशी स्पर्धेसाठी प्रकाशचित्रे कशी व कुठे स्वीकारली जातील, ह्या विषयी माहिती दिली जाईल.

|| गणपती बाप्पा मोरया ||