दिग्दर्शिका "सुमित्रा भावे" यांचे चित्रपट समजून घेणं, हीच खरी श्रध्दांजली....

Submitted by हर्षद साबळे on 4 May, 2021 - 03:31

दिग्दर्शिका "सुमित्रा भावे" यांचे चित्रपट समजून घेणं, हीच खरी श्रध्दांजली....

चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजनाचे साधन नव्हे. समाजामध्ये दिसणार्‍या प्रतिमा जिवंतपणे पडद्यावर मांडण्याचे हे एक साधन आणि हेच नेमकं काम केलं ते दिग्दर्शिका "सुमित्रा भावे" यांनी. पण दुर्दैव असं की फारच थोड्या रसिकांना त्यांचे नाव परिचित आहे. याचाच अर्थ असा की, मराठी रसिक आशयघन चित्रपट पाहणे पसंत करत नाहीत. धांगडधिंगा असणारे, जास्तीत जास्त नाचकाम असणाऱ्या सिनेमांकडे कल जास्त. असं का? आणि असंच जर घडत राहिलं तर भावी लेखक-दिग्दर्शक सुद्धा समाजाची वस्तुस्थिती मांडणारे, वेगळी मांडणी, बाज असलेले चित्रपट करण्यासाठी फारसे धजावणार नाहीत. नको असलेल्या गोष्टींनीच सिनेमागृहाच्या पडदा भरून जाईल. तेव्हा आपणच समाजशील चित्रपटांना समजून घेऊन त्यांना योग्य ती दाद द्यायलाच हवी. नाहीतर, भविष्यात "ढासळलेल्या मराठी चित्रपट सृष्टी मराठी रसिकच जबाबदार" असे म्हणण्याची वेळ येईल...

(दैनिक "लोकसत्ता" मधून प्रसिद्ध दि.21/04/2021)

- हर्षद बाळासाहेब साबळे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावे-सुकतंकर जोडगोळीचे चित्रपट प्रचंड आवडायचे. कोणताही चित्रपट "असाच" बनलेला नसायचा. त्या मागे प्रचंड रिसर्च असायचा. "वास्तुपुरुष" माझा आवडता.
लोकसत्ता मधला लेख तुम्हीच लिहिला आहे का? की नुसता एक परिच्छेद इथे पेस्ट केला आहे?

म. टा मध्ये सुनील सुखथनकर ह्यांनी सुमित्रा भावेंवर लेख लिहिला आहे.
डोळे कधी पाणावले कळालंचं नाही.
सुमित्रा भावेंवर सौमित्र, देविका दफ्टतरदार ह्यांचेही लेख वाचले.
पण सुनील सुखथनकर ह्यांनी लेहिलेला लेख मनाला फार स्पर्शून गेला.