आवडते घर

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशिका

Submitted by uju on 11 September, 2011 - 11:10

नाव--ईशिका

वय--आठ वर्षे नऊ महिने

आमची मदत--कुंडीतली थोडी माती घेऊन ती चाळून देणे, जून्या झाडूचे(जो दिवाळीत पूजेला वापरतो तसल्या छोटा झाडूचे) ऑर्डर येईल त्याप्रमाणे तूकडे करून देणे.:

ईशिकाला खरतर पूठ्ठ्याच्या खोक्याच घर बनवून त्यावर वारली पेंटिंग करायच होत, पण एकतर मी तीला ह्या उपक्रमाबद्द्ल काल बोलले आणि मला तीला हव असलेल सामान ( पूठ्ठ्याचा खोका ,गेरू ,पांढरा पोस्टर कलर) आणून द्यायला न जमल्यामूळे शेवटी हे आता बनवलय तस कागदावर चित्र काढायच ठरल व तिने हे घर बनवल.ह्यात जे घर दिसतय त्याला रंगवलेल नसून त्यावर चाळलेली माती फेविकॉल वर टाकून चिकटवली आहे.

सामान--

विषय: 

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - अनन्या

Submitted by विनार्च on 10 September, 2011 - 07:48

नाव : अनन्या
वय : सात वर्षे
माझे आवडते घर : डोंगराच्या कुशीतले छोटेसे घर.
साहित्य :
DSCN0557_0.JPG
बांधकामाला सुरुवात
DSCN0608.JPG
हे झाले तयार घर
DSCN0614.JPG

विषय: 

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर + आवडते कॅरॅक्टर - सानिका नवरे

Submitted by कविन on 10 September, 2011 - 07:34

नावः सानिका नवरे
वयः ८ वर्ष
मायबोली आयडी (पालक): कविता नवरे
पालकांची मदतः काहीही नाही

माझं आवडतं घर - जलमहाल आणि आवडतं कॅरेक्टरः जलपरी (ह्यातली गुलाबी आहे ती सानु जलपरी आणि दुसरी * आहे ती आई जलपरी असं तिचं म्हणणं आहे :P) (*च्या इथे आधी जाडी असा शब्द लिहिलेला, पण "माझ्या आईला कोणी जाडी नाही म्हणायचं, आईनेही नाही ह्या मागणीमुळे तो गाळला आहे. आईचं शेपूट असण्याचा काळ आहे सध्या म्हणुन नो बॅड रिमार्क्स फॉर आई :P)

i.jpg
ही आमची सुरवात

2.jpg

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशान

Submitted by तृप्ती आवटी on 9 September, 2011 - 21:47

नावः ईशान
वयः सव्वा चार वर्षं
घरच्यांची मदतः टाचण्या लावून जोडा-जोड

खरं तर ईशानला आर्ट/क्राफ्टमध्ये अजिबात रस आणि/म्हणून/व्हाइस व्हर्सा गती नाही. पण आधी आम्ही गणपती बाप्पासाठी आसन वगैरे बनवले ते बघितलेले असल्याने आणि त्यातली गंमत (उर्फ रहाडा) माहिती असल्याने घराचे चित्र काढतोस का असे विचारल्यावर त्याने गणपती बाप्पासाठी घर बनवायचे आहे सांगितले. आलीया भोगाशी असावे सादर Happy

विषय: 

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - तन्वी उपकारे

Submitted by पियापेटी on 9 September, 2011 - 14:28

नावः तन्वी उपकारे (तनु) / (माउ)
वयः ४.५ वर्ष
घरच्यांची मदत :- रंगसांगती निवड. सांगणे
सामान :- पेन्सिल, खडूचे रंग, कागद.
आवडते काम :- चित्रकला आणी पडद्याला लटकणे

2011-09-09 22.50.26.jpg

कॅमरा सेट करेपरयन्त मॅडम चे स्केच पूर्ण झाले.

2011-09-09 22.51.00.jpg
.

चित्र दाखवायची घाई ...

2011-09-09 23.03.19.jpg

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - परी

Submitted by अमीदीप on 9 September, 2011 - 13:49

पाल्याचे नावः परी
वय: पाउणे तीन
साहित्य : पेपर, पेन्सिल्स ,स्केच पेन, र्थमाकोलचे बॉल, रबर, फेवीस्टीक
मदत : रेषासाठी थेंब काढले जेणे करुन सरळ रेष, तिरपी रेष काढता येईल, तिच्या हात पकडून फेविस्टीक वापरणे.

DSC05223.JPGDSC05226.JPG

हे झाल घर तयार

DSC05229.JPG

विषय: 

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ऋचा

Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:20

वयः साडेपाच वर्षे
आईची मदत : काहीच नाही

हे साहित्य

Color-Pencils_0.JPG

ऋचा चित्र काढताना

Rucha1.JPG

ऋचा चित्र रंगवताना

Rucha2.JPG

हा तयार झालेला चॉकलेटचा बंगला

Rucha-House.jpg

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशा

Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:03

वयः ८ वर्षे
आईची मदत : काहीच नाही

हे साहित्य

Color-Pencils.JPG

ईशा चित्र काढताना

Isha1.JPG

ईशा चित्र रंगवताना

Isha2.JPG

हा तयार झालेला ईंद्रधनुष्यी राजवाडा

Isha-House.jpg

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - सानिका

Submitted by तोषवी on 5 September, 2011 - 22:04

नाव : सानिका
वय : ५ वर्षे
माध्यम : पेन्सिल,खोडरबर
सजावट आणि रन्गकामासाठी वेगवेगळ्या डाळी चण्याची टरफले,चहा पावडर आणि कोथींबीर

नुकतच शाळेत I eat healthy, i eat good food,so I'm strong....हे गाणं शिकवलं असल्याने (सध्या हेल्दी फूड डोक्यात आहे),म्हणून म्हणे हे तिचं हेल्दी होम.

माझी मदत: तिला डाळी ई.साहीत्य काढून देणे आणि तिचे फोटो काढणे.

चित्र काढायला सुरवात.
IMG_3733.JPG

चिकटवा-चिकटवी करताना.
IMG_3748.JPG

घराचे नामकरण ही झालं.

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - श्रावणी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2011 - 14:55

नाव - श्रावणी
वय - ६ वर्षे.

सामान : पेपर, पेन्सिल, स्केचपेन, खडू (क्रेयॉन्स), गम, रेडीयम स्टार्स, जेम्स च्या गोळ्या.

चित्र तिने स्वतःच काढले आहे. फक्त डोंगराची ब्लॅक बॉर्डर आखुन देण्यास तिच्या वडीलांनी मदत केली. तिने घरावर रेडीयम स्टार चिकटवले आहेत. रात्री घराची लाईटींग दिसावी म्हणून Happy डोंगरावरुन घरापर्यंत नदी वाहते आहे. घरा भोवती दगड म्हणून तिने एक्पायरी डेट झालेल्या जेम्सच्या गोळ्या चिकटवल्या आहेत.

Subscribe to RSS - आवडते घर