मोगरा फुलला मोगरा फुलला ...

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 3 July, 2012 - 03:05

माझ्या अंगणात मोगर्‍याचे झाड आहे त्याला फुले आली नाही म्हणुन मित्राला विचारले तर गेल्या ३/४ दिवसात अचानक तो असा बहरला. माझा कॅमेरा अगदीच साधा असल्याने प्रचि असे आलेत. गोड माना.

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥

इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥

मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥

MG3.jpgMG4.jpgMG5.jpgMG7_0.jpgMG8.jpgalt="MG1_2.jpg" />MG2.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

धन्यवाद लोक्स
monalip | 3 July, 2012 - 16:22
केवढ्या त्या कळ्या नी फुले. अगदी सुगंधी झाला असेल परिसर.
>>> रात्री छान दरवळतो सुवास, रोज २ टोपल्या (छोट्या) फुले निघत आहेत.

रात्री छान दरवळतो सुवास, रोज २ टोपल्या (छोट्या) फुले निघत आहेत
<<<<<<<<

मजा आहे राव तुमची.......... कोणाला मोगरयाचा नैसर्गिक सुगंध येइल असा चांगला परफ्युम माहीत आहे का ? ते जस्मिनच्या नावाने विकले जाणारे नको त्यांचा वास खुप उग्र असतो ..... एकदम नैसर्गिक वाटेल असा हवा , नाहीतर last option आहेच मोगरयाची फुले जवळ बाळगणे पण ती सर्वकाळ सर्व ठिकाणी भरपुर प्रमाणात मिळायला हवीत ना.........

मस्त फुललाय्/बहरलाय. खुपच सुंदर वास येतो रात्री यांचा. माझ्या कुंडीतल्या झाडांना रोज एक दोन फुले येतात पण सुगंध पसरवतात अगदी.