शिजवलेल्या मिरच्या
Submitted by लालू on 25 January, 2011 - 20:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
पुर्वी मला फक्त लिंबाचे आणि कैरीचे असे दोनच लोणच्याचे प्रकार माहिती होते. इथे सिंगापोरात आल्यानंतर माहिती पडले लोणच्याचे अनेक प्रकार असतात आणि लोणचे विकणार्या एक नाही अनेक कंपण्या आहेत. पुर्वी मला फक्त बेडेकर आणि हल्दीराम ह्या दोनचं कंपण्या माहिती होत्या. इथे 'मुस्तफामधे' लोणच्याच्या ४ लांबलचक रांगा आहेत. संबंध भारतातून, पाकिस्तानातून, बांगलादेशातून आलेली लोणची. कारल्याचे, गाजराचे, वांग्याचे, भेंडींचे, लसणाचे, गोबीचे, अंबाडीचे, करवंदीचे, मिश्र भाज्यांचे एक नाही अनेक प्रकाराची लोणची मी इथे पाहिली आहेत.