माझे आवडते/नावडते विकतचे लोणचे

Submitted by हर्ट on 28 December, 2009 - 00:44

पुर्वी मला फक्त लिंबाचे आणि कैरीचे असे दोनच लोणच्याचे प्रकार माहिती होते. इथे सिंगापोरात आल्यानंतर माहिती पडले लोणच्याचे अनेक प्रकार असतात आणि लोणचे विकणार्‍या एक नाही अनेक कंपण्या आहेत. पुर्वी मला फक्त बेडेकर आणि हल्दीराम ह्या दोनचं कंपण्या माहिती होत्या. इथे 'मुस्तफामधे' लोणच्याच्या ४ लांबलचक रांगा आहेत. संबंध भारतातून, पाकिस्तानातून, बांगलादेशातून आलेली लोणची. कारल्याचे, गाजराचे, वांग्याचे, भेंडींचे, लसणाचे, गोबीचे, अंबाडीचे, करवंदीचे, मिश्र भाज्यांचे एक नाही अनेक प्रकाराची लोणची मी इथे पाहिली आहेत.

हे असे खूपदा झाले आहे की मी घरी लोणचे आणावे आणि मग एक वेळा ते चाखून झाले की त्यातला फोलपणा कळावा की दुरवरूनचं लोणच्याच्या ह्या बाटल्या चटकमटक दिसतात. उघडून पाहिल्यात की एकतर भरपूर तेल आणि मसाले आणि त्यांची जळजळीत चव लगेच सांगून जाते की हे सर्व तब्येतीला बरे नव्हे.

परवा माझी कार्यलयीन सहकारी मला म्हणाली संजीव कपूर यांचे लोणचे आले आहे. उनकी बात क्या कहू.... मी दुसर्‍याचं दिवशी त्यांचे मिरचीचे लोणचे आणले. एकतर बाटली उघडता उघडेना. आतमधे मी चमचा घातला तर इतका गच्च गाळ होता की तो प्लास्टिकचा चमचा लगेच मोडला. ज्या मिरच्या त्यांनी वापरल्या होत्या त्यांची डेखे मोठमोठी नीट निवडली-तोडली नव्हती. मिरच्या देखील लोणच्याच्या नव्हत्या. आता हे लोणचे असेच वाया जाणार. चवीला देखील ते काही खास नाही.

हल्दीरामचे लोणचे इतके तेलकट असते की आतमधे कैरीच्या फोडी तरंगत असतात.

त्यातल्या त्यात मला प्रवीणचे मिरच्यांचे लोणचे तेवढे आवडते. तेवढे एकच लोणचे माझ्याकडून संपते. बाकी लोणच्याच्या बाटल्या एकदा उघडून झाल्यात की परत त्या मी कधी उघडत नाही. मग आपोआप त्यांची मुदत संपण्याची तारीख येते.

शाळेमधे रवी येवले नावाचा एक मित्र होता. तो पोळीच्या मधोमध लोणच्याची भरपूर मोहरी घातलेली फोड आणायचा. ती पोळी हळदीमुळे तेलकट पिवळी व्हायची. डबा उघडला की लोणच्याचा वास वर्गात दरवळायचा की भूक चाळवायची. हे असे कधी विकतच्या लोणच्या बरोबर होत नाही!!!!

असो.. या धाग्याचा उद्देश लोणच्यावर मी जशी टिका केली तसा नाही. खरचं एखादा चांगला लोणच्याचा ब्रांड तुम्ही अनुभवला असेल तर इथे लिहा. आवडती नावडती लोणची दोन्हीबद्दल लिहा. ते जास्त उत्तम.

मी आभारी आहे!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकतच्या लोणच्यात खरेच काही राम नाही.

मी बेडेकरांचे घ्यायचे आधी पण त्यात मीठ खुपच असते. मदर्सचे ब-यापैकी आहे. प्रविणचेही चांगले आहे. पण कैरीचेच फक्त. बाकीच्या पदार्थांची लोणची विकतची चांगली नसतात असा माझा तरी अनुभव आहे.

मदर्सचे लोणचे जरा बरे वाटले. नॉनब्रॅन्डेड घरगुती टाईप, दारावर विकायला आलेली लोणचीच जास्त चांगली मिळाली आहेत.

बी, छान.
लोणच्याशिवाय आपले तर जेवण होत नाही! कमीतकमी वरणभाताबरोबर तरी लोणचे पाहीजेच पाहीजे. Happy

प्रविणचे कैरीचे लोणचे आधी आवडायचे खूप. सध्या 'प्रिया'चे जिंजर गार्लिक आणि हिरव्या मीरचीचे आवडते.

बाकी घरच्या लोणच्यांची सर नाही येणार विकतच्या कोणत्याच लोणच्यांना. लिंबुच्या तिखट आंबटगोड लोणच्याची तर....नोवेज !

--"बिग बाझार"ला 'NILONS' या नावानी लिंबाच लोणचे मिळत ते मला आवडल. हे फक्त बिगबाझारलाच मिळत बहुधा ( त्यांच 'प्रायव्हेट लेबल' असाव)
-- नागपुरला केळकरांच ( राजमलाईवाल्या) कैरीच लोणच मिळत तेही उत्तम..

एकदा सहलिला गेले असताना मैत्रिणिच्या वहिनिने काळ्या मिरीच लोणच आणल होत .ते व्हेज पुलाव
बरोबर खूप आवडल .ते मदर्सच होत अस कळल .मला मात्र कुठल्याही दुकानात कुठल्याही कंपनीच मिरीच लोणच मिळाल नाही .

वत्सला, http://www.maayboli.com/node/2548 इथे जाऊन तुम्ही पाककृती विभागाचे सद्स्य व्हा (आधीच नसाल तर), म्हणजे तो धागा दिसेल.

म्दर्स रेसिपी चे महाराष्टर्‍ म्यांगो (Maharashtra mango) बरेच बरे आहे. घरची चव नाही पण घरच्या चवीजवळ जाणारी आहे. बेडेकरांचे मिरची लोणचे पण ठीक आहे. विकतच्या लोणच्यांत भरमसाठ विनेगर असल्याने त्याचा आंबटपणा वाढुन मुळ चव नष्ट होते.

प्रविणच्या लोणच्यासाठी ( आणि पूर्णानंद नाचणी सत्वासाठी )मला माझ्या ३ वर्षाच्या लेकाने लीव घेउन मालदिवमधुन भारतात जायची वेळ आणली !!......तेच लोणचं असेल तर जेवण जास्त जातं चिरंजीवांच्या पोटात ! खाणं एवढंसं ,पण ऩखरे खुप!
एक्सेस बॅगेज भरुन आणलंय १० किलो लोणचं...( अर्थात त्या लोणच्यात बराच वाटा नवरोजीन्चाही आहे!)

मालदीव? तुम्ही आमच्या जामोप्याना ओळखता का? तेही तुमच्या सारखेच डॉक्टर आहेत, मालदीवात आहेत, महाराष्ट्रियन आहेत, त्यानाही तुमच्या मुलासारखे लोणचे खूप आवडते. त्याशिवाय त्याना जेवणही जात नाही असं टेस्टीमोनियल त्यानी कुठं तरी दिलय.....

Happy

सर्व लोणचे प्रेमींनो एक लक्षात ठेवा की त्यात भयंकर मीठ व तेल असते त्यामुळे ज्यांना उच्च रक्त दाबाची तक्रार असेल त्यांनी ते फारसे खावु नये.

ते बाट्ली वाया जाणे माझे ही होतेच. अगदी १०० ग्राम लोणचे आणायचे सुटे विकतात त्यांच्याकडून नाहीतर आपल्या पुरते हात लोणचे बनवायचे.

खाराच्या मिरच्या व आंब्याचे लोणचे, उपासाचे लिम्बाचे लोणचे, छुन्दा, तक्कु फेवरीट.