आमेर कोसुंदी, (बंगाली लोणचे )

Submitted by दिनेश. on 9 June, 2010 - 13:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक किलो घट्ट कैर्‍या, (किंवा पाव किलो आंबोशी, म्हणजे सुकवलेल्या कैरीच्या फोडी.) तीन टेबलस्पून मोहरीची डाळ्,एक ते दोन टिस्पुन मेथीचा रवा, एक टिस्पून हळद, पाव वाटी मीठ, दोन टेबलस्पून तिखट, तीन टेबलस्पून बडीशेपेची पूड, मोठ्या लिंबाएवढा गूळ, हिंग, अर्धी वाटी शक्यतो मोहरीचे तेल.

क्रमवार पाककृती: 

वेळ आणि उन असल्यास घरी कैरीच्या लांबट फोडी करून उन्हात कडकडीत वाळवाव्यात. नाहीतर तयार अंबोशी घ्यावी.
थोडे तेल गरम करुन, त्यात मेथीचा रवा परतावा, मग हिंग परतावा व बडिशेपेची पुड परतावी. मग हळद व तिखट टाकून गॅस बंद करावा.
मोहरीची डाळ बारीक वाटावी. बाकीचे तेल गरम करुन ते थंड करुन त्यात ती टाकावी. हातानेच जरा फेटावी. मग त्यात कैरीच्या फोडी आणि वरील मसाला, मीठ व गूळ घालावा. हे सगळे आठदहा दिवस मुरु द्यावे.
खायला घेताना, सगळेच परत गरम करावे, म्हणजे फोडी मऊ होतात. मग खायला घ्यावे.
चवीला मस्तच लागते हे.

अधिक टिपा: 

आपण मोहरी फेसून जे प्रकार करतो, तशी फेसलेली मोहरी बंगाल्यांच्याकडे बाटलीत तयारच असते. हे मिश्रण खराब होत नाही. त्याला कासुंदी म्हणतात.
मला वाटते हे लोणचे अश्या कासुंदीचा वापर करुन केले तरी चालेल, पण ते कितपत टिकेल, याची शंका आहे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा.

अरुंधतीने माझ्या विपू मध्ये कासुंदीची लिंक दिली आहे. ती इथे देत आहे:

अरुंधती कुलकर्णी 9 June, 2010 - 10:56
अमि
मला कासुंदीची ही रेसिपी नेटवर मिळाली बघ!

http://www.bangalinet.com/chutney.htm

Aam Kasondi (Mango pickle with mustard)
Ingredients:
Green mangoes-1 kg, Coarse Salt-250 gms, Ginger paste-50 gms.
Red chilli powder-25 gms, Mustard powder-150gms, Ripe tamarind (seedless)- 50gms, Mustard oil- 250gms, Salt to taste.

Steps:
Peel and remove the seeds of the mangoes and cut into equal pieces.
Mix in the coarse salt. Use ordinary sea salt and not iodised salt as iodised salt is not a preservative. Place in a wooden or a porcelain bowl and leave in the sun for a couple of days until the mango pieces are quite soft. Lightly squeeze and drain the excess liquid accumulated in the bowl. Now add to the mangoes all the spices, the ripe tamarind and salt. Mix thoroughly. In a large aluminum pan heat the oil until a blue haze appears. Add the spiced mango pieces. Stir and mix thoroughly with the oil and remove from fire. Allow to cool and then pour into an airtight glass or earthenware jar. Will keep for 2 months.

कासुंदी हा एक भयाण प्रकार आहे हे मझं वॅयक्तीक मत आहे..मोहरी अवडत नाही अजीबात..

आपण मोहरी फेसून जे प्रकार करतो, तशी फेसलेली मोहरी बंगाल्यांच्याकडे बाटलीत तयारच असते. हे मिश्रण खराब होत नाही. त्याला कासुंदी म्हणतात.
मला वाटते हे लोणचे अश्या कासुंदीचा वापर करुन केले तरी चालेल, पण ते कितपत टिकेल, याची शंका आहे.>>

हो हे जास्त टिकणार नाही, पाणी सुटतं, वास येतो सकाळ्च्या मीक्स ला संध्याकाळी.

काय राव, फोटो दिसेल म्हणून उत्सुकतेने आलो.

फोटो द्या फोटो!

फोटो पाहिजे अशा नावाच्या पदार्थाचा

फोटो द्या फोटो

द्या बर का फोटो?

बेफी, मानुषी आणि मी, दोघांनी आंबोशी वाळवत ठेवलीय. ज्याची आधी वाळेल...
आज रात्री एका लोणच्याचा फोटो टाकणार आहे. पण ते दुसरं.

अर्रे ......आमच्या नगरच्या उन्हाची तुमच्या आफ्रिकेच्या उन्हाशी स्पर्धा की काय? बघू या कोणतं ऊन जास्ती कडक आहे......बादवे मी १ कि. कैर्‍या वाळत ठेवल्या आहेत.

मानुषी नगरच जिंकणार, आमच्याकडे दिवसेंदिवस उन पडत नाही. नैरोबीवर कायम ढग असतात. आणि उन कडक नसले तर कैरी काळी पडते.

अशा नावाच्या पदार्थाचा फोटो दिसेल म्हणून उत्सुकतेने आलो. >> मी सुध्द्दा..

फोटो नाही प्रतिक्रिया नाही.. Happy
फोटो डकवा दिनेशदा..
[तुमच्या पाकृमध्ये फोटो नाही हे अजुनही पटत नाहीय...खरंच दोनतीनदा वरखाली स्क्रोलुन पहीले]

दिनेश दा........ आमच्याकडे तर कैर्‍याच नाही मिळत..
आम्ही नाही घेणार भाग या खेळात Sad Lol

फोटू टाका बरं.. मोहरीचा रवा म्हंजे मोहरीची डाळ का/?
मला बंगाली लोणचं भयंकर आवडतं.. ते त्या सौंफ,कलौंजी आणी सरसो तेलामुळे........

वर्षू अगं रवा मेथीचा गं, मोहोरीचा नव्हे. म्हणजे मेथी दाणे मिक्सरमधून काढायचे. तो रवा.
आम्ही नाही घेणार भाग या खेळात >>>>>>>>>>>>>> असं काय गं वर्षू ....आमी नाय ज्जा!
हाहाहाहाहा!

दिनेशदा, मानलं तुम्हाला! किती हौशीने पदार्थ करून बघता हो...
मला आमेर काशुंदी (स हा उच्चार करणे बंगालीत गावंढळ समजतात! Proud ) आवडते, पण रेसिपी माहीत नव्हती. आणी माझ्या दृष्टीने सर्वात सोपी रेसिपी म्हणजे दुकानातून आणून खाणे. फारतर उत्तर बंगाल मधून कुणी येणार असेल तर त्यांच्याकडून मागवणे. तिकडची काशुंदी विशेष प्रसिद्ध आहे.