शेवग्याच्या शेंगांचे लोणचे

Submitted by दिनेश. on 29 July, 2010 - 15:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चार जास्त जूनही नाहीत आणि अगदी कोवळ्याही नाहीत, अश्या शेवग्याच्या शेंगा.
पाऊण कप तेल, अर्धा कप व्हिनीगर, एक टिस्पून हिंग, एक टिस्पून जिरे, दोन टिस्पून (किंवा जास्त)
लाल तिखट, अर्धा टिस्पून हळद, अर्धा टिस्पून मेथी, अर्धा टिस्पून मोहरी, दोन टिस्पून साखर, मीठ

क्रमवार पाककृती: 

शेंगांचे एक इंचाचे तूकडे करून सोलून घ्या. वरची साल शक्य तितकी काढा. तेलाची फोडणी करुन, त्यात मेथी तळा, ती गुलाबी झाली कि मोहरी टाका, जिरे टाका, हिंग हळद टाकून, गॅस मंद करुन शेंगांचे तूकडे टाका. परतून सगळीकडून सोनेरी करुन घ्या. लाल तिखट व साखर घाला. व्हीनीगर घालून, उकळा. रस दाट झाला व तेल दिसू लागले कि बंद करा. अगदी थंड करा मग बाटलीत भरा.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याला काय प्रमाण ?
अधिक टिपा: 

व्हीनीगर वापरल्याने शेंगा छान मुरतात व मऊ होतात. मसाल्याचा स्वादही चांगला लागतो, व व्हीनीगरचा वास अजिबात रहात नाही.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमि, टिकण्यासाठी व्हीनिगरला पर्याय नाही. ताजेच संपवायचे असेल, तर चिंचेचा कोळ चालेल. (व्हीनीगरचा वास अनेक जणांना आवडत नाही, पण हॉटेलमधल्या अनेक पदार्थात ते असते. पनीर करताना पण ते वापरतात हॉटेल्स मधे. मसाल्यात शिजवल्यावर त्याचा वास रहात नाही. मी तरी ते एकदा ट्राय करायचा सल्ला देईन. समजा नाहीच आवडले, तरी फुकट जाणार नाही, सिंक मोकळे करण्यापासून, कपडे धुण्यापर्यंत, अनेक उपयोग आहेत त्याचे)
जागू, व्हिनिगर वापरले तर वर्षभरही टिकेल.

करून पहायला हवंच.
[ दिनेशदा,मी मालवण भागातला आहे हे समजल्यावर रत्नागिरीच्या एका प्रसिद्ध बागायतदारानी मला मालवण- देवबाग परिसरातल्या ट्रकभर शेवग्याच्या शेंगा मिळवून द्याल का विचारलं होतं; तिथल्या रेताड, खार्‍या जमीनीतल्या शेंगाना खास स्वाद असतो, हे त्यानी उलटं मलाच सुनावलं होतं ! अमेरिकेतील भारतियांकडून त्याना खूपच विचारणा होत होती व सॉल्टींग व कॅनिंग करून त्याना शेंगांची पहिली
कंन्साईनमेंट निर्यात करायची होती. पुढे काय झालं माहीत नाही पण शेंगांच्या लोणच्याची - वर्षभर टिकणार्‍या - कल्पना त्याहूनही आकर्षक वाटते.]