स्वप्निल जोशी, कोण होईल मराठी करोडपती २०१६ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2016 - 11:52

शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !

या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !

पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही.. Happy

ऑल द बेस्ट !!!!!!

लिंक - http://www.konhoeelmarathicrorepati.in/

Kon-Hoil-Marathi-Carodpati-2016-Swapnil-Joshi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी कुणाचा नंबर लागो न लागो तुझा नंबर मात्र लागू देत. त्याचे दोन फायदे आहेत, एकतर तुला तुझ्या आवडत्या स्वजोला भेटता येईल आणि दुसरं म्हणजे बर्याच माबोकरांची ऋ ला बघण्याची इच्छा पुर्ण होईल: )

>>>घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी <<<

ह्या वाक्यात 'तुमचा' हा शब्द भरीचा वाटतो.

>>>

आपले शब्द भारीच असतात स्मित<<<

चिडलात का एकदाचे? Wink

>>>तरी मी परत बातम्या चेक करतो यूट्यूबवर त्यातलेच वर्णन मी उचललेय .. बहुधा<<<

उचला उचला!

स्वप्नील anchor असणार कळल्यावर, मला ऋन्मेष पहिला तूच आठवलास. तुझा नं. लागुदे, शुभेच्छा तुला.

चिडलात का एकदाचे? डोळा मारा
>>>
बेफी हे काय होते, मला चिडवायच्या सुपार्‍या निघाल्या आहेत का Wink
अहो ते भरीचा आणि भारीच ही कोटी होती.. कबूल आहे जरा छोटी होती.. पण माझे मराठीचे ज्ञानही तेवढेच तोकडे आहे Happy

मला शुभेच्छा देणार्‍यांचे धन्यवाद.. शाहरूखच्या वेळी प्रयत्न करून करून थकलो पण नाही लागला नंबर.. सारा पॉकेटमनी त्यातच संपला.. यावेळी स्पर्धा कमी असेल, आशा करतो ईथे तरी संधी मिळेल.. मायबोलीवर मी याची जाहिरात माझे स्पर्धक वाढवायला केली नाहीये तर ईथे कोणाचा नंबर लागला तर नक्की या धाग्यावर कळवा.. जर माझा नाही लागलाच तर तुम्ही तिथे जा आणि सांगा त्याला तुझा आणि सईचा असा कंम्बाईन एक फ्यान आहे आमच्या मायबोलीवर..

>>>मला चिडवायच्या सुपार्‍या निघाल्या आहेत का<<<

छे छे, तुम्ही चिडलात की नवीन धागा काढता, त्यामुळे अश्या सुपार्‍या निघणे असंभव आहे. Light 1

तुम्हाला शुभेच्छा Happy

कधी पासून टेलिकास्ट आहे व किती वाजता रात्री?

रुनमेष तुम्हाला शुभेच्छा. स्वप्नील ला भेटायची संधी तुम्हास मिळो.

त्याला साधं ट ठ ड .......म्हणता येत नाही तो काय anchoring करणार? स्मित
>>>>>
शाहरूखलाही व्यवस्थित क बोलता येत नाही असे म्हटले जाते .. पण फॅक्ट हे आहे की तो भारतातील नंबर एक अँकर आहे .. फिल्मफेअर = शाहरूख हे समीकरण आहे Happy

मला शुभेच्छा देणारे ऑल धन्यवाद मनापासून आभारी.. शून्य रुपये कमावून आलो तरी चालेल, पण तिथे जाऊन बसायचेय बस्स!!!

शून्य रुपये कमावून आलो तरी चालेल, पण तिथे जाऊन बसायचेय बस्स!!!>>> व्वा!
तुला खुप शुभेच्छा. तुझा नंबर लागावा आणि तुझ्या आवडत्या स्वजो ला भेटण्याची संधी मिळावी.

तुला खुप शुभेच्छा. तुझा नंबर लागावा आणि तुझ्या आवडत्या स्वजो ला भेटण्याची संधी मिळावी.> आणि आम्हाला ही ऋन्मेऽऽष कोण हे बघायची संधी मिळावी Wink

तुला खुप शुभेच्छा. तुझा नंबर लागावा आणि तुझ्या आवडत्या स्वजो ला भेटण्याची संधी मिळावी.> आणि आम्हाला ही ऋन्मेऽऽष कोण हे बघायची संधी मिळावी>+१

ऋन्मेऽऽष कोण ? .. कसा म्हणा ओ Happy

@ हिम्सकूल, हो हे खरेय.
पण तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

स्वप्निलचा आवडता कलाकार शाहरूख आहे हे आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण मला उत्सुकता आहे की तो आता आपल्या डोक्यातून शाहरूखला काढून स्वताची अँकरींग कशी करतो. अर्थात हे तो करेलच, आणि एकंदरीतच त्याचाही स्टेजप्रेजंस, हजरजबाबीपणा, संवादचातुर्य, आणि विनोदाचे टायमिंग पाहता तो छाप पाडणारच. आधीही ईतर प्रोग्राममध्ये त्याने हे केलेय, पण कौबक शाहरूखने सुद्धा केला असल्याने त्याच धर्तीचा, नव्हे तोच कार्यक्रम आपण करतोय हे स्वप्निलच्या डोक्यात रेंगाळत असणारच ..

सचिन खेडेकर चांगलं करायचे अँकरींग. त्यांच्याशी कम्पेअर हा करेल का हि शंका आहे? तुलना तर होणारच, ते स्वाभाविक आहे. मी तरी करेन.

अमिताभने ज्या उंचीवर ठेवला होता नेऊन हिंदी करोडपती, शाहरुखचं नव्हतं आवडलं मला.

अमिताभने ज्या उंचीवर ठेवला होता नेऊन हिंदी करोडपती >>> अमिताभने हा कार्यक्रम शाहरूखच्या आधी केलेला, नव्हे आपण पहिल्यांदा कौन बनेगा करोडपती अमिताभचा शो म्हणूनच पाहिलेला, हे मॅटर करते. एकदा तुम्ही राम म्हणून अरुण गोविलला बघितले असेल तर राम म्हणजेच अरुण गोविलचा चेहरा हे समीकरण तुमच्या डोक्यात असे काही फिट बसते की ती रामायण मालिका पुढच्यावेळी कितीही मोठे ताकदीचे कलाकार घेऊन बनवा ती छाप पुसणे अवघडच.. आणि तेच जर हे नाव अमिताभ असेल, तर मग ते अशक्यच !

तसेच आणखी एक मुद्दा म्हणजे कालांतराने प्रेक्षकांची त्या प्रश्नोत्तराला बघण्याची क्रेझ कमीही झालेलीच, शाहरूखने तिथून हा शो केलाय हे विसरून चालणार नाही. त्यामुळे दोन्ही सीजनची लोकप्रियता आपसात कंम्पेअर करण्यात काही अर्थ नाही.
किंबहुना अमिताभला बदलून चेंज म्हणून शाहरूखला घेतले त्यामागे कारण हेच होते की घसरलेला टीआरपी नावीन्य आणत वाढवणे. तसेच आणखी एक गोष्ट ईथे लक्षात घ्या, त्या शो ला एवढे सुपर ड्युपर हिट केलेल्या अमिताभला रिप्लेस करायला पुर्ण ईंडस्ट्रीमध्ये एकच नाव होते, शाहरूख खान !

हिंदी कौबक मध्ये फक्त एकच सिझन शाहरुख खान ने केला होता. आणि त्या सिझनलाच त्याचा टीआरपी झोपला होता.. जरा फॅक्ट्स चेक करुनच विधान करावीत.. https://en.wikipedia.org/wiki/Kaun_Banega_Crorepati

शाहरूखलाही व्यवस्थित क बोलता येत नाही असे म्हटले जाते ..>>> तु "डर" बद्दल बोलतोयस का?

. पण फॅक्ट हे आहे की तो भारतातील नंबर एक अँकर आहे>>> काहीही हा. हो पण हे मान्य आहे की, तो award functions चे anchoring छान करतो.

फिल्मफेअर = शाहरूख हे समीकरण आहे>>> तो awards manage करतो हे माहीत नाही का?

रच्याकने, तुला मनापासून शुभेच्छा!!!! Happy

अरे अमिताभ आजारी पडला म्हणून शाहरुखने केला ना शो. असो आपापली मतं.

तुला स्वजोला भेटायला मिळो ही मनापासून इच्छा.

हो असो, प्लस वन.. हा धागा शाहरूखने हायजॅक केलेला मलाही नकोय.. भले तो विषयाशी थेट संबंध राखून असला तरी त्याला दूर राखलेलेच बरे.. त्याच्या फिल्मफेअर अँकरींग बद्दल आणि अ‍ॅवार्ड मॅनेज करण्याबदल मात्र कुठल्यातरी दुसर्‍या धाग्यात नक्की बोलेन Happy

शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, प्रयत्नांना सुरुवात केली आहेच ..

त्याच्या फिल्मफेअर अँकरींग बद्दल आणि अ‍ॅवार्ड मॅनेज करण्याबदल मात्र कुठल्यातरी दुसर्‍या धाग्यात नक्की बोलेन>>> नक्की बोला आणि तो धागा आम्हाला नक्की द्या.

तुला स्वजोला भेटायला मिळो ही मनापासून इच्छा.

स्वप्नील मुळे ह्या शो ला चार चांद लागणार यात शंका नाही. काही झालं तरी ट्वीटर वर व्हेरिफाय झालेला पहिला सुपर स्टार आहे तो.

Pages