चर्चाविषय

‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

विषय: 

चा चा चो !

Submitted by तोमीन on 1 November, 2019 - 00:31

मराठी आंतरजाल सुरु होऊन आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय. अनेकविध विषयांवर त्यावर आपण चर्चा, वादविवाद करतो. त्यातले काही विषय बरेच वादग्रस्त असतात आणि त्यामुळे सतत चर्चेत येतात. त्यातल्या काहींचा तर चावून चावून चोथा (चा चा चो ) झालेला असतो. त्या विषयांच्या वारंवार चर्चेतून एक लक्षात येते ते असे. अशा विषयाच्या दोन्ही बाजूस भक्कम असे मुद्दे असतात. आपण सगळे प्रौढ असल्याने त्यातल्या कुठल्यातरी बाजूवर ठाम असतो. इथल्या चर्चेतून त्यावर काही परिणाम होत नसतो (काही अपवाद सोडून देऊ वरवर आपण कधी म्हणतो की मला त्या विषयाची दुसरी बाजू समजली. पण सहसा आपले मतपरिवर्तन होत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - चर्चाविषय