शेअर मार्केट

सध्याचे (युएस) स्टॉक मार्केट रोलर कोस्टर - संधी?

Submitted by maitreyee on 9 February, 2018 - 14:21

गेल्या कित्येक महिन्यात अमेरिकन स्टॉक मार्केट चा आलेख चढता राहिलेला आहे. अपेक्षित असलेली "करेक्शन" २ वर्षात झालेली नव्हती.
अनेक गुंतवणूकदार वाहत्या गंगेत हात धुवून तत्पुरते का होईना श्रीमंत झाले . तर इतर काही जास्त सावध खेळाडू योग्य "एन्ट्री पॉइन्टः ची वाट पहात होते.
जानेवारीचा शेवट मात्र सनसनाटी झाला आणि फेब्रुआरी त्याहून वादळी ठरत आहे.

अमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी

Submitted by हायझेनबर्ग on 3 April, 2015 - 10:55

अमेरिकास्थित मायबोलीकरांकडून ज्यात -

जुने जाणते आणि नवे, सिटीझनशिप वा एच वन बी विसा होल्डर्स, फॉर हिअर वा टू गो, वीनस वा मार्स वरचे, डेम्स वा रेप्स, पेट्रिऑट वा सी-हॉक्स, यांकीज वा रेड सॉक्स, वॉलमार्ट वा मेसीज चे पेट्र्न्स, योगा वा मॅरॅथॉन फॅन्स, आयटी वा बिगर आयटी, शिळे वा ताजे खाणारे, व्हेज वा नॉनव्हेज, सोनिया वा मोदी फॅन्स, गटग करणारे वा टांग देणारे,चुकीच्या वा बरोबर किनार्‍यावरचे ई.- असे झाडून सगळे लोक आले त्यांच्याकडून -

401K, IRA, रिटायरमेंट प्लॅनिंग, HSA, FSA, शेअर मार्केट, गुंतवणूक, होम मॉर्टगेज, म्युच्युअल फंड, टॅक्स

श… श शेअर बाजाराचा!

Submitted by अनघा आपटे on 21 March, 2014 - 09:08

अर्थकारण कळत नसण्याच्या वयापासून ते पुढील अनेक वर्षे "शेअर बाजार" हा नोकरी व्यवसाय यापेक्षाही भरपूर प्रमाणात पैसे कमावण्याचा मार्ग आहे हि एक माझी ठाम समजूत होती. आणि त्यातून जर तुम्ही कधी स्वत:बद्दल एखाद्या कुडमुड्या कडून तुमच्या पालकांना किंवा तुम्हालाच जर हे सांगताना ऐकलं असेल की "नशिबाचा खूप पैसा आहे, अचानक धनलाभ आहे नशिबात" तर मग काय विचारायलाच नको!

अशी मीच एकमेव नाही तर अनेकजण असतील…. खात्रीने सांगते की या मंडळीनी आयुष्यात किमान एकदा शेअर बाजारातून पैसे थोड थोडके नाही तर बक्कळ पैसा कमवायचा विचार केला असेल. इतकेच नव्हे तर आपले हात ही येथे पोळून घेतले असतीलच.

शब्दखुणा: 

शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर

Submitted by जागोमोहनप्यारे on 25 September, 2011 - 08:05

शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर

ह्ल्ली शेअर मार्केटसाठी आणि कमोडिटीसाठी लाइव बाय सेल सिग्नल देणारी सॉफ्टवेअर मिळतात. कुणाला त्यांचा काही अनुभव आहे का? सगळेजण ९०-९५% सक्सेस रेट देतात.. कुणी असे सॉफ्टवेअर वापरले आहे का?

http://mcxncdexnifty.weebly.com/index.html इथे एक उदाहरण म्हणून दिले आहे, याशिवाय निफ्टीबाय्सेल, श्री चक्र, एझीलाइवट्रेड असे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत..

सुरुवातीला ते काही फी घेतात. त्यानंतर डेटा युसेज फी दर महिन्याला द्यावी लागते म्हणे.

शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव

Submitted by जागोमोहनप्यारे on 11 September, 2011 - 05:50

शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव

इक्विटी आणि एफ ओ साठी चांगला ब्रोकर कोणता? सध्या कमीत कमी ब्रोकरेज कोणाचे आहे?

आय सी आय सी आय चे अकाउंट सोपे, चांगले आहे. त्यांची कॉल ट्रेड सुविधापण चांगली आहे. पण ब्रोकरेज अगदी जास्त आहे.

एस एम सी मध्ये माझे अकाउंट होते. पण तिथले लोक न सांगताच आपल्या अकाउंटला ट्रेड करतात, असा मला तरी अनुभव आला होता.

बी एम ए वेल्थ क्रिएटर सध्या सगळ्यात कमी बोकरेज घेते असे ऐकून आहे. कुणाला काही अनुभव आहे का?

प्रिपेड ब्रोकरेजचा अनुभव कसा आहे? बर्‍याच जणांच्या त्याविषयी तक्रारी आहेत.

शेअर मार्केट : अनोखा ब्रोकर

Submitted by जागोमोहनप्यारे on 8 August, 2011 - 07:51

'शेअर मार्केटसाठी आमच्या कंपनीत अकाउम्त काढा.
तुमच्या अकाउंटवर आम्ही ट्रेडिंग करु.
नफा झाला तर तुमचा ( किमान दरमहा ५%)
नुक्सान झाले तर आम्ही* ते भरुन देऊ. '

असा एस एम एस मला आला. मी त्याच्याशी बोललोदेखील. अशा प्रकारचे मेसेजेस आनखी कुणाला आले आहेत का? ब्रोकर फर्म नावाजलेली आहे. मुद्दाम इथे नाव देत नाही. हा एस एम एस पाठवणारी व्यक्ती मुंबईची आहे. कुणाला असा काही अनुभव आहे का?

* ( 'आम्ही' म्हणजे कोण? आणि कसे? ते मला माहीत नाही. म्हणजे ती व्यक्ती का ब्रोकर फर्म)

शब्दखुणा: 

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 July, 2011 - 06:40

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्‍याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्‍याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात.. त्यांचा कुणाला अनुभव आहे का?

Subscribe to RSS - शेअर मार्केट