शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

Submitted by जागोमोहनप्यारे on 17 July, 2011 - 06:40

शेअर मार्केट मधील टिप्स...कितपत भरवसा ठेवावा?

ट्रेडिंग करताना आपल्याला स्वतःहून स्क्रिप्स निवडणे काही वेळेला शक्य नसते, इंटरनेट्वर बर्‍याच जाहिराती दिसतात जे एस एम एस द्वारे टिप्स देण्याचा उद्योग करतात.. अशा टिप्स किती भरवश्याच्या असतात? कुणाला चांगल्या टिप्स देनारा माहीत आहे का? बहुताम्शी वेलेला हे लोक इन्ट्रा डे आणि एफ एन ओ मधील टिप्स देतात.. स्पेशल निफ्टीसाठीही काही जणाम्ची सोय असते. असा काही कुणाला अनुभव आहे का? खास करुन वॅल्यु नोट्स डॉट कॉमवर बर्‍याच जाहिराती दिसतात.. काही ब्रोकरही अशी सुविधा पुरवतात.. त्यांचा कुणाला अनुभव आहे का?

( एखादा शेअर वर जाईल म्हनून रुमर/अफवा पसरवणारे यात इन्क्ल्युड केलेले नाहीत. रोजच्या ट्रेडिंगसाठी टिप्स सांगणारे, तशा वेबसाइट्स हे इथे अपेक्षित आहे. )

हॅपी ट्रेडिंग ! Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयसीआयसीआय सेलफोनवर व त्यांच्या संकेतस्थळावर टिप्स देतात. त्यांचे बरेच अंदाज चुकलेले आहेत. माझ्या सेलफोनवर खालील टिप्स अजून ठेवलेल्या आहेत.

(१) Buy rating on "Maruti SuzukI" with target on Rs. 1482 (Tip given on 21 June 2011)
Status -
२१ जून २०११ रोजी ह्या शेअरचा भाव रू. ११८० च्या आसपास होता. २१ जून पासून हा शेअर कधीही ११८० च्या वर गेलेला नाही. ह्या शेअरचा भाव आज रू. ११७५ आहे. ही टीप अजून तरी खरी ठरलेली नाही.

(२) Strong buy recommendation on Tata Motors with target price of Rs. 1523 and potential upside of 26% ( Tip given on 19 Feb 2011)
Status -
१९ फेब्रु २०११ या टीप दिलेल्या दिवशी या शेअरचा भाव रू. १२०० होता. त्यानंतर त्याचा भाव एप्रिल २०११ च्या पहिल्या आठवड्यात १२९० पर्यंत गेला. त्यानंतर तो कोसळला. काल त्याचा भाव रू. १०३३ आहे. टीप देऊन ५ महिने उलटून गेले, तरीसुध्दा, ही टीप अजून खरी झालेली नाही.

(३) यापूर्वी आयसीआयसीआयने दिलेल्या जीव्हीके पॉवर, युनिटेक, आय आर बी इन्फ्रा (हा शेअर २-३ वेगवेगळ्या मासिकात रेकमेंड केला होता) इ. शेअर्सच्या टीप खोट्या ठरल्या आहेत.

(४) आयसीआयसीआय सध्या इन्फोसिस रेकमेंड करत आहे (टारगेट प्राईस - रू. ३३५०). याचा आजचा भाव रू. २७४० आहे.

आय सी आय सी आय चे रिकमांडेशन चुकतात.... अगदी सहमत आहे या मताशी... मग त्यांची टिप उलट करुन फॉलो केली तर???? Proud

त्यांच्या आय क्लिक, वीकली डेरि. बद्दल काय अनुभव आहे?

>>> आय सी ओआय सी आय चे रिकमांडेशन चुकतात.... अगदी सहमत आहे या मताशी...

मला अशी दाट शंका आहे की, आयसीआयसीआय ने ज्या शेअर्स मध्ये स्वतः गुंतवणूक केली आहे व गुंतवणुकीनंतर ज्या शेअरचा भाव खूप खाली गेला आहे, त्या शेअरचा भाव वर आणण्यासाठी आयसीआयसीआय मुद्दाम तो शेअर रेकमेंड करते. रेकमेंड ज्यांना केलेला आहे, त्यापैकी काही जणांनी त्यांच्या रेकमेंडेशनला फसून तो शेअर घेतला तर त्याचा भाव आपोआप थोडासा वाढेल व त्यामुळे आपली तोटा कमी होईल, ही स्ट्रॅटेजी असावी. Biggrin

>>> त्यांच्या आय क्लिक, वीकली डेरि. बद्दल काय अनुभव आहे?

यांचा अनुभव नाही.

काही वर्षांच्या अनुभवानंतर माझ्या असे लक्षात आले आहे की, ब्ल्यू चिप शेअरमधली गुंतवणूक कधीही तोट्यात जात नाही. (उदा. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टीसीएस, एल अ‍ॅण्ड टी, इन्फोसिस इ.). हे शेअर मधेच काही काळ खाली गेले तरी, काही काळातच ते पुन्हा झपाट्याने वर येतात. तसेच, आयसीआयसीआय, "दैनिक सकाळ", एचडीएफसी इं. च्या टीप्सवर विसंबून राहण्यापेक्षा, स्वत:च्या अनुभवानुसार गुंतवणूक केल्यास बर्‍याच वेळा फायदा होतो. आयडीएफसी, हिंदाल्को इ. शेअर्सवर लक्ष ठेवून त्यांचा भाव उतरल्यावर खरेदी केल्यास भविष्यात पुष्कळ फायदा होतो.

मला अशी दाट शंका आहे की, आयसीआयसीआय ने ज्या शेअर्स मध्ये स्वतः गुंतवणूक केली आहे व गुंतवणुकीनंतर ज्या शेअरचा भाव खूप खाली गेला आहे, त्या शेअरचा भाव वर आणण्यासाठी आयसीआयसीआय मुद्दाम तो शेअर रेकमेंड करते. रेकमेंड ज्यांना केलेला आहे, त्यापैकी काही जणांनी त्यांच्या रेकमेंडेशनला फसून तो शेअर घेतला तर त्याचा भाव आपोआप थोडासा वाढेल व त्यामुळे आपली तोटा कमी होईल, ही स्ट्रॅटेजी असावी. >>
असा प्रकार एक मार्केट analyst CNBC -18 वर करत असे. त्याला SEBI ने काही महिन्याकरता प्रतिक्रिया देण्यास आणि मार्केट मध्ये व्यवहार करायला बंदी घातली होती.

MONEYCONTROL.COM वर ALL STATS मधे पहा HOURLY GAINERS आयडीया मिळतिल.MOVEMENT बघा.

नमस्कार १) कंपनिचि मागिल ३ वर्शाचि नफा-तोटा पत्रक पहा
२) नफ्यात सातत्य असेल तर ५२ week low-high पहा अनि खरेदि क

मला वाटते हे (HOURLY GAINER )पान INTRADAY साठी उपयोगी पडेल.यात आपल्याला शेयरच्या हालचालीवरुण आणि VOLUME बघून एक अंदाज बांधता येइल.यात चार्ट सुद्धा महत्वाचे ठरते.यात किचकट म्हणजे या पानाला वारंवार क्लीक करून पहावे लागते कुठल्या शेयरमध्ये VOLUME वाढून(किंवा वाढ होत आहे) हांलचाल सुरु आहे.

त्यानी वेबसाइट्वर दिलेला पर्फॉर्मन्स तर चाम्गला वाटला... सब्स्क्राइब करायला हवे..... इन्वेस्ट्मेम्त ऑप्शन चाम्गला वाततो.... सबस्क्राइब करुन इथे लिहिले तर चाम्गले होईल. बघू.

फ्युचर्/ऑप्शन ट्रेडींग करतांना शक्यतो निफ्टी वर ट्र्डींग करावे.
निफ्टीचा व्हॉल्ञूम जास्त असतो आणि व्होल्याटीलीटी सिंगल स्टॉक डेरिव्हेटीव्हपेक्षा कमी असते.

कायम निफ्टीचा एकच एक मार्ग पकडला तर निफ्टी ट्रॅक करणे सोपे जाते आणि त्यातले ट्रेन्ड समजायला लागतात.

त्यासाठी ही एक चन्गली साईट आहे:

http://tradeinniftyonly.blogspot.com/

टिप्स देनाऱ्यां पासून सावधान ख़ास करून बेस्ट स्टॉक अनालिसिस पासून
एकदा साइट चाळ्त बसलो असता. बेस्ट स्टॉक अनालिसिस चा फॉर्म भरला.लगेच दुसऱ्या दिवसापासून फोन यायला लागले.८-१० दिवस फोन आले.सर आम्ही ९०%ते ९५% सक्सेस रेट देतो म्हणून मला त्यानी राजी केलं.त्यासाठी मी ६६०० रु. भरले. दुसऱ्या दिवसां पासून मला कॉल येवू लागले.मॅसेज येईपर्यंत तो स्टॉक वर गेलेला असायचा आणि वर घेतला की तो खाली यायचा.कधी कधी त्यानी सांगितल्या रेटला मिळालाच तर तिथून तो उलट्या दिशेला जायचा.एकही स्टॉक त्यानी दिलेल्या टार्गेट पर्यंत पोचला नाही.ते असे टिप्स देत होते जे सगळे अंधारात तीर मारल्या सारखे होते.वैतागुन मी स्वत:त्याना फोन करून ती सेवा बंद करायला लावली.तो पर्यंत माझे १२,५०० उडाले होते.इथे हे लिहिण्याचा उद्देश की अश्या जहिरातिना कुणी बळी पडू नये.१२,५०० घालवून मी अक्कल विकत घेतली.

सगळे टिप्सवाले असेच असतात.. टिप्स देणारा कुणी आला की त्याचे नाव आणि कंप्लेंट्स असं टायपून गुगल करायचं... त्याचे सगळे जुने अनुभव समजतात... टिप्स देणार्‍यांच्या वेब साइट वरच्या पर्फॉर्मन्स रिपोर्टला काही अर्थ नसतो.. तो बोगस असतो... आपल्याला आलेल्या टिप्स व त्यातील नोंदी हे कधी मॅच होत नाही.

इंट्रा - डे टिपस् तर एकदम बकवास असतात, मग तो ब्रोकर कोणीहि असो, कधितरी नशिबाने नेम बरोबर लागलाच तर ते बोलायला मोकळे होतात की आमचा अभ्यास किती चांगला आहे.