वांगी

वांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)

Submitted by मॅगी on 3 December, 2016 - 03:38

साहित्य:

पाव किलो वांगी
अर्धा इंच आल्याचा तुकडा
तीन लसूण पाकळ्या
एक टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ
चार पाच पाने कढीलिंब (पानांचे तुकडे करा)
एक टेबलस्पून लाल तिखट पावडर (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)
एक टीस्पून हळद
अर्धा टेबलस्पून काळ्या मोहरीची पूड
पाव टेबलस्पून भाजलेल्या मेथीची पूड
एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड
पाव कप मीठ (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)
अर्धा कप साखर
एक कप मोहोरीचे तेल/ गोडेतेल
पाऊण कप व्हिनेगर

कृती:

१. वांग्याचे बारीक तुकडे करून, ताटलीत वांग्याचे तुकडे त्यावर मीठ पुन्हा वांग्याचे तुकडे, मीठ असे थर लावून चार तास ठेवा. ताटलीत पाणी जमायला हवे.

विषय: 

वांग्याचे दहयातील भरीत

Submitted by प्रमोद् ताम्बे on 10 April, 2014 - 20:22

वांग्याचे दहयातील भरीत

साहित्य : भाजलेल्या एका मध्यम वांग्याचा गर (बलक) , एक मोठा बारीक चिरलेला कांदा , फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा लाल तिखट , साखर , मीठ, जरुरीप्रमाणे दही , तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड असे कूट.

विषय: 

बाबागनोश आणि हम्मस (फोटोसहीत)

Submitted by मामी on 24 February, 2012 - 10:43

हा एक मेडिटरेनियन प्रकार आहे. भारी सोपा आणि चविष्ट. घरच्या लोकांकरता मुख्य जेवण म्हणून चालू शकेलच. पण न्याहरीला, हाय टी आयटेम, स्टार्टर, डिप किंवा साईड-डिश म्हणूनही हा बाबा नक्कीच उपयोगी पडेल. हे एका प्रकारचे भरीतच.

वेष बावळा परी अंतरी नाना कळा असं आहे बाबाचं. रूप काही देखणं नाही. ओटा पुसायचं फडकं साधारण महिन्याभरानं जसं दिसतं तसा मळखाऊ रंग. त्यामुळे पाहुण्यांना सर्व करताना दिलो जानसे नटवायला लागेल. पण पिटा ब्रेड, लवाश, क्रुटॉन्स, ब्रेडस्टिक्स बरोबर एकदम झक्कास जोडी जमते आणि खाणारे बाबागनोश मध्ये विरघळून जातात.

विषय: 

वांग्यांच कच्चं भरीत

Submitted by योकु on 5 December, 2011 - 08:21
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. २ ते ३ जांभळी, पांढरी भरताची वांगी. (फोटो लवकरच टाकेन)
२. २ पातीचे कांदे, पातीसकट बारीक चिरून
३. १ वा २ हिरवी मिरची, चिरून
४. हवा असल्यास एखादा टमाटो
५. हिरवे मटार
६. कोथिंबीर
७. तेल, मीठ, मोहरी, हवी असल्यास हळद, लाल तिखट

क्रमवार पाककृती: 

१. वांगी स्वच्छ धूवून, कोरडी करावीत. सुरीने टोचे मारून, तेलाचा हात लावून गॅसवर वा असल्यास निखार्‍यांवर भाजावीत. टमाटो घेतला असल्यास तो सुद्धा भाजावा (टोचे मारून).
२. वांगी जरा थंड झाल्यावर, साल काढावे. वांग्याला सुटलेलं पाणी सुद्धा घ्यावे. जाडसर मॅश करावे. टमाटो असेल तर, साल काढून बारीक चिरावा.
३. हे सगळं एका मोठ्या बाऊल मधे घ्यावे
४. पातीसकट बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी.
५. मटार घालावेत. मीठ घालावं. व्यवस्थित एकत्र करावं
६. आता जरा जास्त तेलाची फोडणी करावी. मोहरी, मिरच्या घालाव्यात, हवं असेल तर, हळद, लाल तिखट घालावं. ही फोडणी भरतावर ओतावी. छान कालवून घ्यावं. भरीत तयार आहे. गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर वा लोणी + बाजरीच्या भाकरीबरोबर हाणावं!

वाढणी/प्रमाण: 
भरपूर! कारण पातीचा कांदा जनरली कोणी खात नाही तो यानिमित्ताने खाल्ला जातो. थंडीतच या वांग्यांना चव असते, त्यामुळे जरूर करावं.
अधिक टिपा: 

मी कधी मुंबईत असली वांगी पाहीली नाहीत, आता आईला विचारून फोटो मागवीन आणि मग टाकीन! बहुदा पुण्यात मिळावीत... बट आय अ‍ॅम नॉट शुअर! Sad

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
आई, आजी.

वांग्याची नॉर्थ इंडियन स्टाईल ने भाजी

Submitted by सशल on 18 February, 2010 - 16:15
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांगी, बटाटे, टोमॅटो
तेल, जिरे, हिंग, आलं, हळद, लाल तिखट, धनेपूड, मीठ

क्रमवार पाककृती: 

वांगी, बटाटे आणि टोमॅटो रश्श्यासाठी कापतो तसे तुकडे (dice/cubes) करा ..

तेल तापवून त्यात जिरे घाला .. ते तडतडले की हिग आणि हळद घाला ..

त्यावर बटाटे, वांगी आणि आलं घालून परतून एक वाफ काढा .. मग त्यात टोमॅटो, तिखट, धने पूड, मीठ घालून परत झाकण ठेवून शिजवा .. भाजी तयार!

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

नेहेमीच्या पद्धतीने वांग्याची भाजी करून कंटाळा आला म्हणून हा प्रयोग करून पाहिला .. आणि चव आवडली ..
माझ्या मैत्रिणींकडून ऐकून उत्तर भारतीय पद्धतीने भाजी करायची तर आलं, लाल तिखट आणि धनेपूड घालायची हे बर्‍याच वेळा ऐकलं आहे .. त्यामुळे नविन पद्धतीने काही करायची हुक्की आली की मी असं करून बघते ..

मला स्वतःला आल्याच्या उभ्या सळ्या कापून घालायला आवडतात ..

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
मैत्रिणी, प्रयोग
Subscribe to RSS - वांगी