रिसायकल, रियुज, रिपर्पज - काच

Submitted by नीधप on 30 September, 2015 - 06:08

काचेच्या बाटल्यांचे काय करू असा प्रश्न विचारल्यावर बरेच उपाय आणि उत्तरे पुढे आली.
तपशिलात चर्चा करायला तो धागा योग्य नाही त्यामुळे इथे चर्चा करूया.

काचेच्या बाटल्या व वस्तू आपण कश्या कश्या प्रकारे रिसायकल, रिपर्पज, रियुज करू शकतो याबद्दल इथे लिहूया.
यामधे अमुक प्रकारच्या बाटल्यांमधे अमुक वस्तू चांगल्या राहतात पासून काचेच्या बाटल्यांपासून करता येण्यासारख्या कलाकुसरीच्या वस्तूंची कृती, इतर उपयोग या सगळ्यांचा समावेश होऊ शकतो.

मात्र मटेरियल काच हेच असायला हवे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कॅम्बोडियाला एक प्रयोग पाहिला आहे नीधप. एका बाईने वेगळ्या आकाराच्या बाटलीमधे कसले तरी लोणचे विकायला ठेवले होते आणि त्या बाटल्या वापरलेल्या होत्या. क्म्बोडियामधे रिसायकल करुन बरेच काही केलेले मी पाहिले आहे. तिथे मुळात गरीबी इतकी अफाट आहे की रीसायकल आपणहून घडते. प्रयत्न करावे लागतच नाही.

पारदर्शक काचेच्या बाटल्यावर मनमोहक पेन्टींग करुन पाहता येईल.

आणि हो काचेच्या बाटल्या आहे तेंव्हा हाताळताना लक्ष घेणे.

काच निर्मिती करताना काही प्रमाणात काच वापरावी लागते ( कलेट म्हणतात त्याला, विरजणासारखे काम करते ती. ) त्यामूळे त्या कारखान्यांना ती सतत लागत असते. फक्त त्यांना ती रंगानुरुप वेगळी केलेली लागते.

त्यामुळे सोसायटीच्या पातळीवर काचेच्या वापरलेल्या वस्तू स्वच्छ करुन आणि वर्गवारी करून जर त्या काच गोळा
करणार्‍यांना दिल्या तर त्यांना चार पैसे मिळतील, त्यांची वणवण कमी होईल आणि तूमची अडगळही कमी होईल.

काचेच्या शोभेच्या वस्तूही काही काळाने अडगळीतच जमा होतात.

एकदा वापरलेली बाटली दुसरा पदार्थ ठेवायला चांगली पण खुपदा झाकण खराब झालेले असते, त्याचा वास लागतो दुसर्‍या पदार्थाला.

शेताघराची निदान एखादी भिंत तरी काचेच्या बाटल्यांची बनवायची असे ठरवून टाकले आहे.

शेतघर होणार हे नक्की, कधी होणार ते विचारू नका.

हर्पेन, घराच्या आतली भिंत करण्यासाठी काचेच्या अर्धपारदर्शक वीटा मिळतात. बाहेरची भिंत काचेची केली तर ग्रीन हाऊस इफेक्ट मूळे आतली हवा कायच्या काय तापते. माझ्या सध्याच्या ऑफिसमधे तसे झालेय. मग त्यासाठी
जास्त एसी चालवावा लागतो.

हर्पेन..दे ट्टाळी..
प्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेच्या बाटल्यांची भिंत मी पण तयार करणारे. मोस्टली माझा स्टुडिओ करेन तेव्हा.

काच गोळा करणारे कुठे असतात दिनेश? मुंबईत रद्दीवाले घेत नाहीत आता. फुकटसुद्धा.

मुंबईत पुर्वी काच कारखाने होते. चेंबूरला ग्लास फॅक्टरी असा बसस्टॉपही होता. खरं तर नुसती काच वापरूनही काचेच्या ( त्याच्या विटा, लाद्या ) करता येतात. बाकीचे घटक म्हणजे रेती आणि सोडा अ‍ॅश. पण नुसत्या काचेने ते वापरले नाहीत तरी चालतील. मग खर्च येईल तो इंधनाचाच ( तपमान १४०० अंश से. लागते )

तशीच, बाहेरच्या भिंतीसाठी काच वापरून गरम हवा ट्रॅप होते. ( बाटल्या वापरून तेवढी मजबूती येणार नाही ) आतल्या, खास करून बाथरुमच्या, पार्टीशनच्या भिंतीसाठी काचेच्या विटा वापरतात.

तसे नाही दिनेश. विटांच्या जागी बाटल्या वापरून भिंत. >>> +१

काचेच्या विटा मुद्दाम तयार कराव्या लागतात बाटल्या, त्यांचा पुनर्वापर म्हणून वापरायच्या आणि हो आतल्या भिंतींकरताच.

तशा त्या शहरातल्या घरातही वापरता येतील पण बाटल्यांची भिंत रुंदीला जास्त होते / जास्त जागा व्यापते म्हणून शेतघरासाठी

हे इथे आहे तसं.
ज्याअर्थी आख्खे घर बनवतायत त्याअर्थी त्याच्या दणकट असण्याबद्दल काय ती काळजी घेतली असेलच. नसेल तर शोधता येतील आयडिया.

आम्ही लहान असताना डबा - बाटली असे ओरडत माणुस यायचा. त्याला आम्ही घरातले सगळे रिसायकल करण्याचे सामान द्यायचो. तो ते सामान वेगळे करुन विकायचा. काच्येचा बाटल्या ह्या काच कंपनीला विकल्या जायच्या.

हल्ली हे डबा-बाटली वाली मडळी फिरताना आढळत नाहीत पण. आजुन ही जरीमरी, कुर्ला ह्या भागातुन गेल्यास रिसायकल काचेच्या बाटल्याचे ट्र्क तसेच फुटलेले काचेचे सामान (high quantity मध्ये) घेणारे दुकाने दिसतात

मोरचूदाची रासायनिक बाग (कॉपर सल्फेट) आणि जेली बॉल्स रंगीबेरंगी पाण्यात घालून ठेवणे इतके दोनच आठवले पण ते इतक्या संख्येत बाटल्यांसाठी उपयोगी नाहीत.

काच गोळा करणारे कुठे असतात दिनेश? मुंबईत रद्दीवाले घेत नाहीत आता. फुकटसुद्धा. - पुण्यात पण घेत नाहीत .
भंगार गोळा करणारे मेटल, कागद , इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतात , प्लास्टिक पण बघून घेतात

आमच्याइथे भंगारवाले घेतात. पण पैसे देत नाहीत. ते प्लास्टीक बाटल्या, काच बाटल्या, धातुच्या बाटल्या असं सगळं वेगवेगळं करुन त्या त्या कंपन्यांना विकतात म्हणे. पण तसंही फारशा काचेच्या बाटल्या नसतात त्यामुळे कदाचित तो काही म्हणत नसेल... क्वचित औषधं किंवा मग जॅम लोणच्याच्या बाटल्या. या बहुधा घरातच वापरल्या जातात.

पूर्वी सॉफ्टड्रींकच्या, दुधाच्या काचेच्या बाटल्या त्या कंपन्याच परत घेत असत ते बरं होतं. वाईनच्या बाटल्या असल्या तर त्या त्या कंपन्या पुन्हा परत घेतात का?

बाहेरच्या भिंतीसाठी काच वापरून गरम हवा ट्रॅप होते. >>++

नीधपने लिंक दिलीये त्यात बाहेर बर्‍याच प्लास्टीक बाटल्या वापरल्या आहेत. पण अती गरमी वगैरेने प्लास्टीक डिजनरेट होईल, सिमेंटच्या वजनाने, तापल्याने तुटेल / तुक्डे पडतील का काय याची कल्पना नाही.
आतली वॉल काचेच्या बाटल्यांची, पण सिमेंट न वापरता दुसरे कायतरी ग्लु वापरुन केली तर छाया प्रकाशाचा सुंदर खेळ होईल आत तयार.

सावली, दुधाच्या बाटल्या मोठ्या तोंडाच्या असल्याने त्या साफ करणे सोपे होते पण वाईनच्या तश्या नसतात ना, म्हणून रियुझेबल नसतात त्या.

मार्बल डस्ट च्या जश्या मूर्ती करतात तश्या काचेच्या कूटाच्या ( Wink ) करता येतील का ? गोंद खास वापरावा लागेल.
त्या भाजल्या तर झळाळी पण येईल चांगली, असे वाटतेय.

पुर्वी काच कुटून मांजा करत असत.

बियर बाटल्यांचा एक ग्रोटो टिव्हीवर पाहिला होता. एकदम सुंदर. जागा असल्यास करून पाहण्यासारखा प्रकार.

आमची नगरपालिका सुदैवाने बाटल्या रिसायकल करते. तरी जुन्या एकसारख्या क्लियर काचेच्या बाटल्यांमध्ये आम्ही कडधान्ये आणि डाळी भरून ठेवल्या आहेत. त्यात भरायला एक नरसाळे घेतलेले आहे. इवल्याश्या किचनमधे जागा कमी, तेव्हा बर्‍याच गोष्टी कट्ट्यावर असतात. त्यात ह्या बाटल्या चांगल्या दिसतात रंगीत डाळी/ धान्यांमुळे.

सध्या माझ्या डाळी कडधान्ये प्लास्टिक डब्यांमधे आहेत. ते पण नवीन विकत आणलेले नाही. सगळे च्यवनप्राश वगैरेचे आलेले डबे. एकही काचेची बाटली माझ्याकडच्या ड्रॉवरमधे मावण्याएवढी बुटकी नाही.

मध्यंतरी कुठल्याही रेस्तो. म्ध्ये मॉकटेल्स्/डिझर्ट्स मेसन जार मध्ये मिळायचे. आता ते ड्न टु डेथ झाले. पण दिसतं फार सुंदर.
बाटल्यांमध्ये अर्ध्या उंचीपर्यंत पेबल्स/ जाड रेती आणि त्यावर टीलाइट पण छान दिसतात.
हे पण करता यईल- http://timesofindia.indiatimes.com/life-style/home-garden/How-to-make-yo...

त्या भिंती कितपत दणकट असतिल ही शंका मलाही आली पहिला फोटो पाहुन. पण शेवटाला पोचेपर्यंत लक्षात आले की बाटल्या ब-यापैकी झाकल्या जाऊन फक्त ती डिजाईन शिल्लक राहिलीय. सो, मजबुत असणार हा प्रकार.

मला तरी आवडला ब्वा हा प्रकार. अर्थात, इथे कोणाला करणे जमतेय. तरी कुंपणाची एखादी भिंत करुन पाहाविशी वाटतेय. परदेशात एक बरे असते, सगळे DIY.

मी मनीप्लांट लावलेत.परंतू अरूंद तोंडाच्या बाटलीत वाढत नाहीत लवकर.पुर्वी हिरकणीने गळा कापून पेला करायचे त्याचा फ्लॅावरपॅाट चांगला व्हायचा.

एकदा फार्मर्स मार्केट मधे स्टॉल पाहिला होता, काचेच्या बाटल्यांपासून वेगवेगळे विंड चाईम्स केलेले. त्यात हँगिग्स मधे रिसायकल मटेरियल पासून बनवलेले शेप्स, बाटलीच्या कॅप्स , बिड्स असं बरच वेरियेशन्स होते. त्या शिवाय काही बर्ड फिडर्स पण होती.