ओम नम: शिवाय !
सर्व प्रथम मला नमूद केले पाहिजे की या यात्रेचे मूळ / बीज हे येथील अनया, पराग आणि केदारच्या कैलास मानस सरोवर यात्रेबाबत येथे केलेल्या लिखाणात आहे. या यात्रेची प्रेरणा मला यांनी केलेल्या लिखाणातूनच मिळाली. तेंव्हा सर्वप्रथम त्यांचे अनेक धन्यवाद!
आदिकैलास यात्रा करायची असे गेले काही वर्षे मनात होते. २०१४ला जेंव्हा प्रथम कैलास मानसरोवर यात्रे विषयी वाचले तेंव्हापासून कैलास मानसरोवर यात्रा करायची मनात आहे. नंतर अशीच माहीती मिळवत असताना, KMVN आदि कैलास यात्रा पण नेते असे कळाले. दरम्यान कोव्हिडमुळे सगळेच थांबले होते.
" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे ईश्वरी शक्तींचा स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही.
आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला.