काहीच्या काही कविता

भस्म्या

Submitted by ठिपका on 25 November, 2013 - 01:07

मूळ कवीची क्षमा मागून...
(मूळ कविता - http://www.maayboli.com/node/46473 )

चिवडा कडबोळे अन् चकली
एक फराळ मी खाल्लेला
शिवाय चहा मारत आहे
ढेरी माझी वाढत आहे
पोट ना खाल्ले किती समजे
दुनिया त्यालाच अती समजे

पुष्कळ माश्या झाल्यावरती
फडके मारत टेबलवरती
द्रोणांमधला रस पाझरतो
जेव्हा पत्रावळ अंथरतो
त्याच पत्रावळी उसवल्या
चटण्या कोशिंबीरीही स्त्रवल्या

आहे ते खायची घाई आहे
अन्न पुरेसे नाही आहे
भोजन रोखा रेचन होते
रेचन रोखा भोजन होते
जो तो मजला टाळत आहे
मी पण दोन्ही पाळत आहे

आणखी थोडा भात लाव तू
वाढ मला तो चारी ठाव तू
सोबत असूदे लोणची पापड
गोडाविना तर जेवण अवघड

विषय: 

मॉर्स कोड

Submitted by चायवाला on 13 November, 2013 - 01:57

. - . -- . -- . -- .. ----
.... -- .. ---- ..... -- .. --- ... ------

.. ---- . -- .... ------- .. --- ...... ----- ... -- .......
. -- .... -- ......... -- . -- .. ----
....... --- ---- ..... ----

....... -- .. ----- .. ---- .. -

- -
........

... -- -- ..... --- ---- ...... --- ..... -------
... -- - ..... ---- ....

आहे!?

Submitted by पाषाणभेद on 16 August, 2013 - 22:09

आहे!?

आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे?
आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे!

आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे?
आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे!

आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे?
आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे!

आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे?
आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे!

(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?)
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!)

किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे?
साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे

तेल ३ किलो आहे, तुप पाऊण किलो आहे, मिरची अर्धा किलो आहे

प्रेमात पडलोय ना? मग फक्त प्रेम करायचं ;)

Submitted by कविन on 19 April, 2013 - 02:25

दिसता ती उरात धडधड
ऐकत रहावी तिचीच बडबड

जगाकडे करुन पाठ
गिरवावे प्रेमाचे पाठ

हळूच धरावा तिचा हात
वाजेल गाणे मनात आत

बघतो जेव्हा तिच्याकडे
सोबत्यांचा पण विसर पडे

सोबती घालतात चिक्कार वाद
म्हणतात कंपूतून तुला करु बाद

आता सांगा ह्यांना समजत कसं नाही?
वेडं प्रेम वागतं असं, मी मुद्दाम वागत नाही

कळेल कळेल जेव्हा चालतील माझाच रस्ता
विचारायला सल्ले मग शोधतील माझाच पत्ता

तोपर्यंत मात्र सारं कानाआड करायचं
प्रेमात पडलोय ना? मग फक्त प्रेम करायचं

गुपित

Submitted by rmd on 29 January, 2013 - 00:27

( माझ्या मैत्रिणीची कविता इथे पोस्ट करत आहे अर्थात तिची परवानगी घेऊनच! Happy )

आकलनाच्या पलिकडले
पण अनाकलनाच्या अलिकडले
आयासाच्या पलिकडले
पण अनायासाच्या अलिकडले
विचारांच्या क्षितीजावरचे
आचारांच्या डोहाखालचे
एक गुपित सांगते सख्या...

रात्री घोरणे बंद कर!

विषय: 

बादरायण संबंध

Submitted by शायर पैलवान on 26 December, 2012 - 02:27

एक पिऊन पिऊन थोडा रंग उडालेला......
अट्टल गोरागोमटा बेवडा....
.....एक काळाकुट्ट जाडसर सिलेंडर ढकलत ढकलत
हॉटेलपाशी आला
उचलून कुठे ठेवावा? विचार करत असतानाच...
धपकन पडला आणि हॉटेलच्या पायरीची फरशी तुटली
हॉटेलचा मालक त्याला भिडला.......धक्का त्याला बसलेला....
जाउद्या रोज भिडे त्याला कोण नडे?
त्याने लगेच र्‍हस्व दीर्घाचा विचार न करत त्याचा नीषेध केला......
नाही रुचले त्याला .....
पायरी सोडून पायरीचे टुकार विडंबन केलेले
आता मोडलेली पायरीच बघायची......उगाचच आपलं......पोपटासारखं.....
गॅस पेटवून त्यावर चहा ठेवलेला बायकोने
तो पण संध्याकाळी
येडी का चक्रम तू? येडीच असणार...

माझं नाव जर दाद असतं

Submitted by Kiran.. on 14 August, 2012 - 11:36

ज्यांच्या शब्दांनी निर्भेळ आनंद दिलाय त्यापैकी काही प्रतिभावंतां प्रती थोडीशी कृतज्ञता :).

माझं नाव जर दाद असतं
हसले असते शब्द आणि
बनले असते ललित शुचिर्भूत होऊन
गाणं देही भिनलं असतं
गानभूलीत झुललं असतं

माझं नाव जर ट्युलिप असतं
अलवार शब्दांची मैफील माझ्या
झोपडीत भरली असती..
हळुवार ललित नि उत्कट कविता
रेगिस्तान मे बहार होती

जर मी असतो धुंद रवी
तरल असता किबोर्ड माझा
धुंद होतानाही आले असते डोळे भरून
आणि लगेच आसमंत
हसला असता पोट धरधरून

माझं नाव जर कौतुक असतं
अष्टपैलू ही ओळख असती
रहस्य हासू, विडंबनं, कविता
अवती भवती नांदत असते

पोंग्याभूत

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 12 May, 2012 - 15:42

स्वप्न पडल एक निराळ, माझ्या भुताला त्यात मी पाहिलं.......
भूत म्हणल माझ मला, मरायच्या आधी पोंगे खायचं राहील.....
भटकायला लागली माझी आत्मा फक्त पोंग्यांसाठी बरका....
थरार निर्माण झाला माझ्या भुताचा, हे पोंगे भूत बरका...
पोंग्याभुताला सगळीच घाबरली गल्लीतली पोर्ह माझ्या
पोंग्याभुताला मज्जा आली, पोंग्याभूत बनलं राजा...
पोंग्याभूत खायचं पोंगे जे मी लहानपणी खायचो...
शाळेच्या जवळच्या वरल्या गल्लीत कुठेतरी राहायचो...
शहरात आ ल्यावर माझे खायचे सुटले होते पोंगे...
उगीच घेतली होती मी शहरीपनाची भकास सोंगे...
स्वप्नातलं भूत माझ, माझ्या लहानपणीच रमल
राहिलेल्या माझ्या हौशींना पुरं करत सुटलं...

.....धुंद.....

Submitted by अन्नू on 17 October, 2011 - 08:31

rose image.jpg

इतकी जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस अशी कि प्रेम होऊन जाईल;
तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे, नाहीतर-
ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल.........

-तुझी एक गोड आठवण.

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता