वेटोळे

Submitted by जव्हेरगंज on 25 January, 2016 - 03:25

तर मी एकदा असाच चालत होतो, भटकत होतो, दगडधोंडे तुडवत, पायवाट मळवत, तहानभुक भागवत, ऊन्हा-पावसाला भिजवत, अंधाराला कवटाळत, जगत होतो.

माझ्या कपाळी अपयशाचा टिळा लावला होता.
प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता.

तो प्रश्न घेऊन मी आत जंगलात खोलवर गेलो. उंच टेकाडं चढून पाहीली. दलदलीत चिखल माखून घेतला. काटेरी गवतात झोपुन गेलो. झऱ्याच्या पाण्यात गारठून गेलो. हे असह्य झालं.

तुडुंब भरलेली माझी धोपटी रिकामी होत गेली, दुनिया भणंग झाली, मन ऊदास झाले, झाडाझाडांच्या सावलीत, डोंगर दऱ्यांच्या कपारीत, नदीकिनारच्या मातीत, स्वप्ने मरुन गेली.

शब्दखुणा: 

आला आला दुश्काळ माझ्या हिरव्या शेतात......

Submitted by आमीनचौहान on 23 September, 2012 - 04:39

आला आला दुश्काळ
माझ्या कोरड्या शेतात
माना टाकती रे पीक
अश्रु म्हातारया डोळ्यात

नाही पाणी गुरा ढोरा
नाही खाण्यास रे चारा
विनवणी करु करु
थकला जीव म्हातारा
ना काठीचा धाक चाले
ना चाले पुजा पाठ
तान्हेल्याले पाणी देणं
पुण्य आहे भलं मोठं

मला दिसतो रे फासा
खंगलेला जीवे देण्या
तू बरस पावसा
घाईकर जीव घेण्या
घाईकर जीव घेण्या

विषय: 
शब्दखुणा: 

*** कधी कधी

Submitted by अरविंद चौधरी on 6 June, 2012 - 02:44

*
वाटे घरी सुखाने,यावे कधी कधी
स्वप्नात मी सुखांच्या,जावे कधी कधी

तृष्णा कशी शमावी,माझी तुझ्याविना ?
पीयूष लोचनांचे,प्यावे कधी कधी

ओलांडला कधीचा,नाहीच उंबरा
पंखांवरी मला तू,न्यावे कधी कधी

पोटात घातल्या मी,सा-या चुका तुझ्या
माझ्यावरी तरी कां,दावे कधी कधी !

ओझे तुझ्या स्मृतींचे,वाहून वाकलो
आधार तूच माझा,व्हावे कधी कधी

व्हावेस तू शहाणा,वेडया मना जरा
घेऊन खूप झाले,द्यावे कधी कधी

----- अरविंद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ंमा़झा राज

Submitted by vishnu ramchand... on 19 February, 2011 - 05:11

वेड्याचे हास्पीट्ल नर्स वेड्यांना तपासत असतात. तपासण्याचि रूम वरच्या ३र्‍र्य मजल्यावर असते. एक वेडा नर्सला म्हण्तो. मला माझ्या हाताने व ओटाने काहितरी करायच आहे. तशी नर्स भीऊन पळ्त सुट्ते. तेंव्हा वेडाही तीच्या पाटी लाग ला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अ