*** कधी कधी

Submitted by अरविंद चौधरी on 6 June, 2012 - 02:44

*
वाटे घरी सुखाने,यावे कधी कधी
स्वप्नात मी सुखांच्या,जावे कधी कधी

तृष्णा कशी शमावी,माझी तुझ्याविना ?
पीयूष लोचनांचे,प्यावे कधी कधी

ओलांडला कधीचा,नाहीच उंबरा
पंखांवरी मला तू,न्यावे कधी कधी

पोटात घातल्या मी,सा-या चुका तुझ्या
माझ्यावरी तरी कां,दावे कधी कधी !

ओझे तुझ्या स्मृतींचे,वाहून वाकलो
आधार तूच माझा,व्हावे कधी कधी

व्हावेस तू शहाणा,वेडया मना जरा
घेऊन खूप झाले,द्यावे कधी कधी

----- अरविंद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

इतक्या वर्र्‍षानतही

Submitted by anumadhura on 6 May, 2012 - 06:13

मनाच्या कानाकोपर्यात व्यापुन असतात स्वप्न तुझी
पहाटओल्या वेळा सर्‍व अस्वस्थ होतात
तेव्हा राहुन राहुन वाट्त............

आथवूच नयेत तुझे बोलके ओधाळ डोळॅ
ज्यात दडल आहे एक
प्रश्नचिन्ह माझ्या होकाराच

आणी आणूच नयेत डोळ्यापुधे
त्या विरलेल्या गुलाबी आथवनी
तुझ्या माझ्या प्रेमाच्या
आपल्या धुन्द सहवासाच्या

देवुच नये मनालाही कधी तुझ्या
अबोल प्रश्ननाच होकारर्थी उत्तर
या अस्वस्थ पहाटओल्या वेळी
इतक्या वर्शान्न्तर्ही!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!! साजण !!

Submitted by बकुल on 28 January, 2011 - 04:10

! साजण !

धुंद मंद लय नादमधुर
वाजती पायी पैजण ग !!
किणकिणती गोड गुपित
हाता मधले बिलवर ग !!

कुंकुम तिलक भाळीवरचा
सांगे नाते उभ्या जन्माचा
लगोन दिठ उभयताना
गळ्यात काळी सर ग !!
वाट पाहते मी ----
कधी यईल साजण माजा
चितचोर ग !!
चितचोर ग !!

---- बकुल
09-01-1996

http://tanujaneve.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे श्री गणेशा

Submitted by देवनिनाद on 10 September, 2010 - 07:49

प्रिय
मायबोलीकर मित्रांनो ...

गणेशचतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा !!

झटपट यमक करून केलेले खालील काव्य केवळ निमित्त. चार दिवसापुर्वी ``जल्लोष गणरायाचा'' हे शीर्षक असलेल्या कार्यक्रमाचं लेखन करण्याची संधी झी मराठी वाहीनीने दिली.

तेव्हा जरूर पाहा आणि आपला अभिप्राय कळवा.

चॅनेल : झी मराठी
कार्यक्रम : जल्लोष गणरायाचा
वेळ : ६.३० वाजता (११ ते २१ सप्टेंबर - रविवारखेरीज)
लेखन : निनाद शेट्ये
सुत्रसंचालन : डॉ. निलेश साबळे (फू बाई फू फेम अँकर)

तू येता घरी
पवित्र अन
मंगल होती
सर्व दिशा
राहो कृपादॄष्टी
अन आशीर्वाद
सदा सर्वदा
हेच मागणं
हे श्री गणेशा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ग