Submitted by अरविंद चौधरी on 6 June, 2012 - 02:44
*
वाटे घरी सुखाने,यावे कधी कधी
स्वप्नात मी सुखांच्या,जावे कधी कधी
तृष्णा कशी शमावी,माझी तुझ्याविना ?
पीयूष लोचनांचे,प्यावे कधी कधी
ओलांडला कधीचा,नाहीच उंबरा
पंखांवरी मला तू,न्यावे कधी कधी
पोटात घातल्या मी,सा-या चुका तुझ्या
माझ्यावरी तरी कां,दावे कधी कधी !
ओझे तुझ्या स्मृतींचे,वाहून वाकलो
आधार तूच माझा,व्हावे कधी कधी
व्हावेस तू शहाणा,वेडया मना जरा
घेऊन खूप झाले,द्यावे कधी कधी
----- अरविंद
गुलमोहर:
शेअर करा
व्हावेस तू शहाणा,वेडया मना
व्हावेस तू शहाणा,वेडया मना जरा
घेऊन खूप झाले,द्यावे कधी कधी<<<
वा वा वा
(No subject)