आला आला दुश्काळ
माझ्या कोरड्या शेतात
माना टाकती रे पीक
अश्रु म्हातारया डोळ्यात
नाही पाणी गुरा ढोरा
नाही खाण्यास रे चारा
विनवणी करु करु
थकला जीव म्हातारा
ना काठीचा धाक चाले
ना चाले पुजा पाठ
तान्हेल्याले पाणी देणं
पुण्य आहे भलं मोठं
मला दिसतो रे फासा
खंगलेला जीवे देण्या
तू बरस पावसा
घाईकर जीव घेण्या
घाईकर जीव घेण्या
पुरे जहली तीच विराणी
गाणी आता जीर्ण पुराणी
आता गाऊ मुक्त स्वरांनी
मंगल गाणी दंगल गाणी
*****************
केव्हा तरी दुपारी हलकेच पेंग आली
वर्गातली मुले ती कॉपी करून गेली
******************
तू गेलीस अन शब्दातील सूरच हरवले
अधरावरचे स्वर माझे आज मूक झाले
पंचम आता बधीर झाला तुझ्या वियोगात
षड्ज मी शोधतो पण गवसेना या तिमिरात
*******************
काय घालू ओवाळणी , आज आहे बीज
गडबडीत सार्या राहून गेली करायची तजवीज
लक्ष लक्ष शुभेच्छांचे ओवतो आता मणी
गोड मनून घे तू , आज ही ओवाळणी