मी मुक्ता..

रुबायत (चर्चा)

Submitted by मी मुक्ता.. on 6 April, 2011 - 03:46

माझ्या रुबाईयतच्या धाग्यावर काही मायबोलीकरांनी ज्या शंका विचारल्या त्यावरुन रुबाई या प्रकाराविषयी अधिक जाणुन घ्यायला ते उत्सुक असल्याचे जाणवले. त्या अनुषंगाने अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात काही चांगल्या साइट्स पण मिळाल्या. त्या सर्वांची एकत्रित माहिती इथे द्यायचा हा प्रयत्न. जाणकारांनी व रसिकांनी यात सहभाग घ्यावा, चर्चा करावी ही अपेक्षा..

गुलमोहर: 

व्हेलेंटाईन..

Submitted by मी मुक्ता.. on 11 February, 2011 - 02:16

बस्स...!
आज मला तुला सांगायचचं आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे..
अगदी सोबत वाढलो आपण आजवर,
पण हे सांगायची संधीच कधी मिळाली नाही..
किंवा प्रत्येक वेळी तुला समोर पाहिल्यावर तुझ्या रुपात इतकं हरवायला व्हायचं की,
हे सांगायचं भानच राहिलं नाही कधी..
मला तुला सांगायचय की,
उमलणारी कळी बघुन तुझ्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद
किंवा चुकलेलं पाखरु पाहुन तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू पाहिले नसते तर,
कित्येक क्षणांमधून आयुष्य असच निसटुन गेलं असतं..
अन्याय बघुन चिडलेलं आणि दुसर्‍याच्या दु:खाने पोळलेलं तुझं मन
तू माझ्यासमोर व्यक्त केलं नसतस, तर कदाचित मलाही कधीच समजलं नसतं
आयुष्याचं मर्म..

गुलमोहर: 

थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..

Submitted by मी मुक्ता.. on 6 February, 2011 - 23:12

जीवनावर संधिछाया लागल्या पसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..

दात माझे, ओठ माझे, दोष कोणाचा असे
चेहरे माझेच होते, मजसवे भांडायला...

मांडला बाजार ज्यांनी ते पुजारी थोर रे
देव आता मंदिरातुन लागला निसटायला..

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...

उदर भरता छान होती दशदिशा स्वर्गापरी,
लागते पण भाकरी असली क्षुधा शमवायला..

गुलमोहर: 

दु:ख आता फार झाले..

Submitted by मी मुक्ता.. on 30 January, 2011 - 07:00

सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...

गुलमोहर: 

आवर्तन..

Submitted by मी मुक्ता.. on 23 January, 2011 - 05:36

असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...

कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...

नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...

नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्‍यात मिसळून जावे...

नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...

नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...

अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...

पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे....

गुलमोहर: 

धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...

Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2011 - 13:42

मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...

विषय: 
Subscribe to RSS - मी मुक्ता..