मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment banker from Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift झाल्यावर तिथे त्याला काही video tapes सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची.. मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point किव्वा किरणचा strong point म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu.. त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...
धोबी घाट- हिंदी चित्रपट सृष्टीची नवी पहाट...
Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2011 - 13:42
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुक्ता, आम्हा परदेशी
मुक्ता, आम्हा परदेशी राहणार्यांना तूमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांच्या लेखनाचाच काय तो लाभ होतो. प्रत्यक्ष सिनेमा बघायला काही काळ जाईल. (मी पिपली लाईव्ह आता विमानात बघितला) त्यामूळे आणखी थोडे सविस्तर लिहिणार का ?
बघायला हवा ... तु छान लिहिलयस
बघायला हवा ... तु छान लिहिलयस गं...
चुकून २ वेळा पोस्ट पडले
चुकून २ वेळा पोस्ट पडले
कालच धोबीघाट बघीतला. वरचेवर
कालच धोबीघाट बघीतला. वरचेवर भारतात असे चित्रपट बनोत आणि ते यशस्वी होवोत.
प्रतिक आणि इतर दोन मुलींचे काम खूप आवडले. रैनाने चित्रपट बाफवर लिहीलय त्याप्रमाणे थिएटरमध्येच मोठ्या पडद्यावर बघा हा सिनेमा.
खुपच छान लिहिलय. आजच धोबीघाट
खुपच छान लिहिलय.
आजच धोबीघाट बघीतला, चान्गला वाटला.
खुपच छान लिहिलय. आज चाललोय हा
खुपच छान लिहिलय. आज चाललोय हा चित्रपट पहायला , धन्यवाद
@दिनेशदा.. अर्थात.. अजुन बरच
@दिनेशदा..
अर्थात.. अजुन बरच सविस्तर लिहिण्यासारख आहे... पण लवकरात लवकर हे लोकांपर्यंत पोहचावं आणि त्यांनी हा सिनेमा पहावा म्हणून घाईघाईत टाकली पोस्ट जरा.. पीपली लाइव्ह जर तुम्हाला आवडला असेल तर हा नक्कीच त्यापेक्षा जास्त आवडेल... पण यावर अजून सविस्तर नक्की लिहीन..
चिकवा वर टाकले होते. इथेही
चिकवा वर टाकले होते. इथेही डकवते.
मेकुसा- छान.
रैना | 22 January, 2011 - 00:48
धोबीघाट पाहिला
पाहणार असाल तर मोठ्या पडद्यावरच पहा प्लीज. कारण ती सिनेमॅटोग्राफीच पाहण्यासारखी आहे.
काही दृश्ये अ प्र ति म दिसतात.
शिनीमा मध्येमध्ये ब्रिलियंट आणि मध्ये मध्ये अगदी क्लिशे. चालायचेच.
मला तरी आवडलाच एकुणात. कमीतकमी खोटा तरी नाहिये हेच समाधान.
चारही कलाकारांची कामेही फार सुरेख, त्यांच्या त्यांच्या भाषेच्या लहेजांसकट. पार्श्वसंगीतही सुंदर.
थेटर अर्धे रिकामे त्यामुळे शिनीमा बिनघोर शांतपणे बघता येतो. फक्त स्युडोइंटुकांच्या वटवटीपासून सावध रहा.
नाव मात्र काहीसे अनिवार्य क्लिशेसारखे. असो.
अंजली | 22 January, 2011 - 00:54
प्रतिक बब्बरबद्दल काय मत? त्याच्या आईचा वारसा चालवतोय का नाही?
प्रतिसादरैना | 22 January, 2011 - 01:01
प्रतीकबब्बरही छानच आहे. पण बाकीचे तिघेही उत्तम आहेत. सर्वात चांगले म्हणजे कमी मोजके संवाद. त्या दोघी बायकाही. नुसते डोळे मिटुन त्यांचे (मोजकेच) संवाद ऐकले तरी त्यांचा प्रातिनिधीक चेहरा दिसतो.
@रंगासेठ,सायली,सिद्धार्थ धन्य
@रंगासेठ,सायली,सिद्धार्थ
धन्यवाद...
@रूनी पॉटर,
मोठ्या पदद्यावरच पहिला मी पण.. आणि सगळ्यांचीच कामं सुरेख झालीयेत.. अगदी well planned.. पण अजूनही या चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया आहेत.. त्यामुळे जोवर लोकांची टेस्ट develope होत नाही तोवर असे चित्रपट सगळीकडून स्विकारलं जाणं अवघड आहे...
@रैना.. धन्यवाद.. खरय तुझ..
@रैना..
धन्यवाद.. खरय तुझ.. पण अशा चित्रपटाला अर्ध theatre रिकामं असणं हीच वाईट गोष्ट आहे.. आणि प्रतिकचे expressions तर अफलातून आहेत... खासकरून त्या restorant मधल्या आणि शेवटच्या प्रसंगात... म्हणजे घरी हा सिनेमा बघताना नक्कीच pause करून back जाऊन पाहावेत असे...
आजच हा चित्रपट पाहीला. आणि
आजच हा चित्रपट पाहीला. आणि इथे थिएटर पुर्ण भरलेल होत. (जे बर्याच वेळा त्रासाच असत. शांत पणे चित्रपट पहाता येत नाही). एक चांगला प्रयत्न अस मत झालं. पार्श्वसंगीत अतीशय उत्तम. माझ्या मते सरव चित्रपट मुख्यत्वे केवळ पर्श्वसंगीताने 'चांगल्या' च्या दर्जापर्यंत उडी मारतो. नक्षीच्या प्रेमात, ट्रीट्मेंटच्या प्रेमात अडकल्या सारखा टेंटेटीव्ह होतो.
आमीर खान पुर्णपणे मिसफीट...
मला धोबी घाट आवडला.
मला धोबी घाट आवडला. स्क्रिप्टमधे लूज एन्ड्स आहेत पण ठिक आहे. इंटर्वल नाही हे जाणवणारही नाही इतपत स्टोरीत इंटरेस्ट टिकून राहतो हे महत्वाचे. चित्रपट हिंदीत डब केलाय हे जाणवत रहातं आणि रसभंग होतो. मात्र वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या भाषेचा लहेजा ओरिजिनल ठेवलाय हे छानच.
प्रतिकची व्यक्तिरेखा त्याने त्याच्या एक्स्प्रेशन्स, देहबोलीतून जे अफलातून डेव्हलप करत नेलय ते आवर्जून बघण्यासारखेच. शायपासून त्याचं दोनतीनवेळा धावत सुटणं हे जरा खूप टिपिकल दाखवलय. जास्त सटलिटी चालली असती.
आमिरची व्यक्तिरेखा अजून नीट यायला हवी होती. त्याचं काम मला इतरांच्या तुलनेत फारसं आवडलं नाही. यास्मिनच्या शेवटच्या व्हिडिओचिठ्ठीतलं तिचं बोलणं ऐकल्यावर धक्का बसून मागे जाण्याची त्याची अॅक्टिंग काहीतरीच. मात्र यास्मिनच्या आयुष्यातलं त्याचं गुंतणं खूप संवेदनशिलतेने येतं.
मुंबई पार्श्वभूमीला ठेवून असलेली सिनेमॅटोग्राफी सुरेख. विशेषतः पाऊस. मुंबईच्या कोणत्याही कानाकोपर्यात पडलेला पाऊस केवळ सुंदरच दिसू शकतो. मात्र मुन्नाच्या कॉटवर ठिबकणारा छतातला पाऊस आणि त्याने पावसात गच्चीवर जाऊन घातलेलं प्लास्टिक मुंबईचा खरा पाऊस दाखवून जातो. मुंबई टिपायला कॅरेक्टरचं फोटोग्राफर असणं हेही आता खूप क्लिशे झालय आणि मधे मधे दाखवलेल्या फोटोस्लाईड्सही एरवी फोटोएक्स्झिबिशन्समधून वगैरे अनेकांनी अनेकदा टिपलेल्या त्यामुळे क्लिशे वाटणार्याच होत्या पण हिंदी सिनेमाच्या पडद्यावर बहुधा पहिल्यांदाच आल्या त्यामुळे हेही ठिक आहे(डबेवाले वगैरे). मात्र यास्मिनचा व्हिडिओकॅम मजा आणतो. गणपती विसर्जनाच्या दृश्यात मागे ते टिपिकल देवा हो देवा सारखं म्युझिक नव्हतं हा किती रिलिफ.
शाय उठून बाहेर आल्यावर आमीरखानचा कर्ट, स्टॅन्डॉफिश मूड दिग्दर्शकाने मोजक्याच हालचालींतून मस्त दाखवलाय. किरण रावच्या दिग्दर्शनात अजून रॉनेस आहे पण चित्रपट हा तिचाच आहे नक्की. गावदेवी आणि महमद अली रोडचे पॅनोरेमिक व्ह्यू अप्रतिम!
@पेशवा, आमिर मिसफिट वाटला
@पेशवा,
आमिर मिसफिट वाटला नाही मला तरी.. उलट त्याला अजुन चान्गल करुन घेता आल असत अस वाटल..
@शर्मिला, किरन च्या
@शर्मिला,
किरन च्या दिग्दर्शनातला रॉनेस च जास्त चान्गला वाटला मला, अर्थात पहिला प्रयत्न म्हणुन पाहिल तर... त्यात असलेला वेगळेपणा आणि मान्डणीचा सर्व बाजुने केलेला विचार इम्प्रेस्स करतो... आपल समिक्षण सुरेखच आहे..
आमिर च काम आवडल मला पण त्याला वावच मिळाला नाहीये...
१-२ प्रसन्ग अगदिच टिपिकल.. आपल्याशी सहमत आहे.. पण कथा साधी किव्वा टिपिकल असली तरी तिच्या दिग्दर्शनतला वेगळेपणा स्तुत्य आहे अस वाटत मला...
धक्का बसून मागे जाण्याची
धक्का बसून मागे जाण्याची त्याची अॅक्टिंग काहीतरीच.>> अगदी अगदी शर्मिला. ते चक्कं वियर्ड वाटत होतं.
चित्रपटातील क्लिशेंची यादी करायची झाल्यास- भरपूर भरतील. हेतू प्रामाणिक वाटतो त्यामुळे जाऊद्या झालं.
आमच्या थेटरात लोकं कंपलसरी हातमाग कपडे, ब्लॉक प्रींटेड गणवेषात होते. आणि 'स्टॅनिसलावस्की इ.' कंपलसरी गप्पा मारत होते. त्या आमिरच्या चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनासारखाच क्राऊड होता एकुणात. ज्ञानदाबैंनी याची सुपारी का घेतली नाही अजून- सार्टोरियल पॅकेज.
मला आमिर आवडला. आदतसे मजबूर. पण इतर तिघे निव्वळ आउटस्टँडिग वाटले.
पेशवे- अनुमोदन.
काल धोबीघाट पाहिला... खूप
काल धोबीघाट पाहिला... खूप आवडला.. शर्मिला ताईंनी ऑलमोस्ट सगळं लिहिलच आहे.. त्याला अनुमोदन..
यस्मिनचा व्हिडीओ मला खूप आवडला... त्यात गुंतून पडायला होतचं पण तो स्टोरीबोर्डसारखं पण काम करत चित्रपट पुढे सरकवतो असं वाटलं.. तिचं कॅरॅक्टर (म्हणजे युपी बिहारहून मुंबईत आलेली आणि मुंबईचं आकर्षण वाटण्या बरोबरच घराची आणि गावाची आठवण होणारी मुलगी) अगदी हुबेबूब टिपलं आहे...
प्रतिकचं आणि शायचं काम पण मस्त झालय...
पाऊस भारीच...! यास्मिन म्हणते "यहां की बारीश कभी रुकतीही नही.. " मुंबईचा पाऊस अनुभवलेल्यांना अगदी पटलं आणि रिलेट झालं असेल..
आमिरच बॅकफूटला गेल्या सारखा वाटला एकूणात...
बाकी आमिर म्हणतो तसं.. "To Bombay.. My muse, my whore, my beloved"
पेशवा मला पण आमीर या सिनेमात
पेशवा
मला पण आमीर या सिनेमात मिसफिट वाटला.
रैना
मला आमीर प्रचंड आवडतो, त्याच्यासाठी मी त्याचा गजनी पण बघीतला आणि आवडून घेतला होता :). पण धोबीघाटमध्ये मला समहाऊ तो मिसफीट वाटला म्हणजे चित्रकाराचे कॅरेक्टर न वाटता तो आमीर खानच वाटला काही प्रसंगात.
आताच पाहुन आले.
आताच पाहुन आले. सुरुवात-मध्य-शेवट ह्या नेहमीच्या गोष्टी-चक्राला वगळुन
सादर केलेली कलाकृती म्हणुन धोबीघाट आवडला. ह्या चार ही व्यक्तीरेखा
बर्याच काळ मनात रेंगाळ्णार हे नक्की. यास्मीन चा आवाज प्रचंड आवडला.
त्या व्यक्तीरेखेचा प्राण म्हणजे नवीन आयुष्याबद्दलची निर्व्याज उत्सुकता
आणि ती त्या आवाजात मला जाणवली.
> मला आमिर आवडला. आदतसे मजबूर. पण इतर तिघे निव्वळ आउटस्टँडिग वाटले.
रैना अगदी अगदी.
किरण राव यांचे कला निर्देशन
किरण राव यांचे कला निर्देशन यात प्रभावाने दिसले. वर लिहल्याप्रमाणे ही डायरी आहे स्टोरी नाही. यास्मीनची जुनी डायरी आणि अरुण, मुन्ना, शाय यांच्या चालु डायर्या यांचे मिश्रण आहे.
शाय व्यक्तिरेखा रंगवलेल्या नटीचा अभिनय बरा वाटला. मुन्ना सिनेमाभर कुठल्याश्या तणावाखाली काम करण्याच्या अभिनय करत होता की त्याला अभिनय जमत नव्हता हे समजल नाही.
अमिरला फारसा स्कोप नव्हता हे बरोबर आहे.
आर्ट सिनेमा किंवा तत्सम प्रकार अजिबात आवडत नाहीत अश्यांनी हा सिनेमा पाहु नये.
किरण राव यांचे कला निर्देशन
किरण राव यांचे कला निर्देशन यात प्रभावाने दिसले. <<
???
प्रॉडक्शन डिझायनर (यात कला निर्देशन इन्क्लुडेड असते) म्हणून तर मनीषा खंडेलवाल हे नाव आहे.
धोबीघाट हा टिपीकल... गल्लाभरू
धोबीघाट हा टिपीकल... गल्लाभरू ... पिक्चर नसेल ही कदाचित, पण एक छान प्रयत्न.
धोबीघाट बघताना एगदम त्यात आपण
धोबीघाट बघताना एगदम त्यात आपण इनव्हॉल्व्ह होत जातो होत जातो आणि एका क्षणी स्क्रिन वर नाव यायला लागतात. आधि वाटल कि आरे संपला.
खरतर घोबिघाट पेक्षा मुंबई डायरि हेच नाव द्यायला हव होत किरनने.
आणि खरोखर इंटर्व्हल नाही हे खरच जाणवात नाही. उलट लिंक तुटत नाही.
हा पिक्चर अचानक केंव्हा संपला
हा पिक्चर अचानक केंव्हा संपला हे कळालेच नाही!!!
पुण्यातल्या एका मोठ्या
पुण्यातल्या एका मोठ्या चित्रपटगृहात धोबीघाट बघून आलेल्या माझ्या एका मित्राने ऐकलेला हा संवाद -
एक डोअरकीपर दुसर्या डोअरकीपरला - 'साला दोन शो पाहिले राव, काहिच कळलं नाही, आता तिसर्यावेळी कळलंच पाहिजे...'
..........
तुम्ही डोअरकीपरच्या Feedback
तुम्ही डोअरकीपरच्या Feedback वर जास्त विश्वास दाखवताय का?
तुम्ही डोअरकीपरच्या Feedback
तुम्ही डोअरकीपरच्या Feedback वर जास्त विश्वास दाखवताय का? >>>>>
बाबो!!!!!!!!!!!
अजिबात नाही........ पण तो संवाद लिहायला दुसरा कुठला धागा समर्पक होता???
हा, तो संवाद लिहायचीच गरज नव्हती असं मत असेल तर काढतो लगेच...
आत्ताच बघितला... आवडला....
आत्ताच बघितला... आवडला.... खूप छोट्या गोष्टी पण हायलाईट केल्या आहेत.. शायच्या घरी असलेल्या मेडचं मुन्नासाठी वेगळ्या ग्लासमधून चहा आणणं वगैरे...
हम्म बिचार्या अमिरला काही काम नाही जास्त. पण ठीक आहे जेवढी त्या पात्राची गरज आहे तितका वेळ दिसतो. त्याच्या शेजारच्या आजींच्या घरात दुसरी कोणीच व्यक्ती दाखवत नाहीत हे जरा पटले नाही. बाकी सगळ्यांची कामं मस्तच ...
प्रतिक - एक नवीन चांगला अभिनेता मिळालाय हिंदी फिल्म इंडस्ट्रीला.... त्याला चांगले रोल मिळो.
मला आवडला धोबीघाट .. चारही
मला आवडला धोबीघाट ..
चारही पात्रांची, किंबहुना ईतर छोटे छोटे रोल असलेल्या सगळ्यांचीच कामं खूप आवडली ..
रैना म्हणते तसं 'Cliche' वाटू शकतात काही गोष्टी पण त्या तशाच आहेत मुंबईत हे ही तिकंच खरं आहे .. मला आमीर खान खूपच आवडतो म्हणून तसं वाटलं की काय पण त्याचा मागे जाण्याचा, सैरभैर होण्याचा अभिनय खटकला नाही .. तो किती गुंततो यास्मीनच्या जीवनात हे परत त्यातून दिसून येतं .. (त्यांच्या whereabouts बद्दल चौकशी करणे, एक माणूसकी म्हणून त्यांच्या गोष्टी त्यांना परत करता याव्यात इतपासून ती चेन, अंगठी चकचकीत करून गळ्यात घालणं इथपर्यंत) .. त्याला फार 'भाव' नाही तरीसुद्धा त्याने छान काम केलंय .. त्यामुळेच चित्रपट केवळ आमीर चा नाहीये आणि हे ही तो (बायको साठी का होईना) करू शकलाय हे मला महत्वाचं वाटतं ..
यास्मीन च्या आवाजात मला सोनाली कुलकर्णी ची झाक वाटली ..
धोबीघाट पाहिला, वर उल्लेख
धोबीघाट पाहिला, वर उल्लेख केल्याप्रमाणे आमिर थोडासा मिसफिट वाटला,, अर्थात शेवटच्या प्रसंगातील आमिर भारीच रंगवलाय. सुरुवातीला खरच जड गेलं हे समजण्यात की दिग्दर्शिकेला काय सांगायचयं, पण चित्रपट जस जसा पुढे सरकत जातो तसं थोडं कळायला लागलं. प्रतिक, मोना डोग्रा (शाय) आणि यास्मिन या तिघांची कामं उत्तम. यास्मिनने विडिओ शूटिंग करताना दाखवलेला मुंबैचा पाउस (पहिला प्रसंग) फार आवडला.
पण चित्रपट मला तरी अजून नीट कळाला नाही, काही काही प्रसंगातून काय सांगायचं हे उमगल नाही. शेवटच्या प्रसंगाचा अर्थ मला अजून उमजला नाही, कदाचित पुन्हा पाहीन. (कळाला असल्यास विपू करा )
चित्रपटातील 'सिनेमॉटोग्राफी' मस्त.
शेवटच्या प्रसंगाचा अर्थ
शेवटच्या प्रसंगाचा अर्थ म्हणजे नक्की काय हवय?? मला वाटतय मी सांगु शकते.. विपुत लिहिते.. ह्म्म...
Pages