'मायबोली गणेशोत्सव २०२२

कॉलेजचे मोरपिशी दिवस - बस्स, इतकंच! - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 September, 2022 - 14:24

तसं विशेष काही घडलं नव्हतं.

'ट्रेडिशनल डे'ला ती साडी नेसून आली तेव्हा त्याने पुन्हा वळून तिच्याकडे पाहिलं, आणि ते पाहून का कोण जाणे, पण तिने लाजून मान खाली घातली. बस्स, इतकंच!

अगदी खरं सांगायचं, तर त्यानंतरही काही विशेष घडलं नाही.
म्हणजे ते त्याच मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमध्ये अजूनही होते. फक्त त्यानंतर तो तिच्याशी बोलण्याआधी जरा घसा खाकरायचा, आणि ती त्याच्याशी बोलायला गेली तर शब्दच विसरायची. बस्स, इतकंच!

झालंच तर शब्द विसरले की तिची कानशिलं तापायची, आणि खाकरल्यावर त्याचा आवाजही एरवीपेक्षा हळूवार व्हायचा.
बस्स, इतकंच!

विषय: 

मर्मबंधातील एखादे नाते - प्राचीन

Submitted by प्राचीन on 8 September, 2022 - 14:53

मर्मबंधातील नातं.
"बसा गं, शाळेत बाई असले तरी घरात मी आई आहे",
त्यांच्या - माझ्यातील हा पहिला संवाद. संवाद तरी कसा म्हणू! कारण तेव्हापासूनच माझी  त्यांच्यासमोर जी बोलती बंद झाली (म्हणजे लाक्षणिक अर्थाने कमी झाली हो ) ती अद्यापही फार फरक नाही.
माझ्या - त्यांच्या नात्याचं जे व्यावहारिक जगात नाव आहे ते म्हणजे त्या  माझ्या सासूबाई आणि मी त्यांची सून.

विषय: 

कथाशंभरी २- ओळखा पाहू- मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 7 September, 2022 - 08:26

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि त्याला गावातील प्रसिध्द ज्योतिषाने सांगितलेले बोलणे सवयीने आठवले.

“जर तुला तुझ्या नामसद्रृश एक पक्षी त्या घरात दिसला आणि तू त्या पक्ष्याला संस्कृतमध्ये जो शब्द आहे त्याने हाक मारली आणि त्याने ठमीला आवडणारा आवाज काढला; तर तुझ्यावर तुझे नामसद्रुश असणारा देव प्रसन्न होईल. आणि तुला तुझ्या आडनावात असणारी गोष्ट मुबलक मिळेल.”

पाय उंचावून, नजर ताणून देखील भिंतीपलीकडच्या त्या घरात काहीच न दिसल्याने रघू मिठ्याचा परत एकदा ‘त्या पक्षाचे सामान्यनाम’ झाला होता.

मर्मबंधातील एखादे नाते-मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 6 September, 2022 - 13:14

नमस्कार, मर्मबंधातील एखादे नाते हा विषय वाचला आणि माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो म्हणजे विनू ;माझा पहिल्या कंपनीतला मित्र.

आमची ओळख कशी झाली हा एक किस्साच आहे. कंपनीत अंतर्गत मेल एप्लिकेशन होतं. तिथे सेटिंग्स मध्ये आम्ही आमचा एक मेसेज लिहायचो. समजा अ व्यक्तीने ब व्यक्तीला मेल केला तर त्याला ब व्यक्तीने सेट केलेला मेसेज दिसायचा.

एकदा मी एक स्टेटस रिपोर्ट पाठवला होता. रेसिपियंटसमध्ये विनू होता. त्यावेळी मला त्याचा “only crying babies get milk” असा काहीसा मेसेज वाचायला मिळाला.

कथाशंभरी २ - हे बंध केरसुणीचे - आशूडी

Submitted by आशूडी on 6 September, 2022 - 07:38

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो चमकला. दारावरची पाटी वाचून त्याला धडकी भरली. परवाच मालक म्हणाले होते हा बंगला ज्यांना विकला आहे ते येतीलच लवकर राहायला मग तू त्यांचा भाडेकरू. पण हा योगायोग असा जुळून येईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. आता ताबडतोब नवं घर शोधायला सुरुवात केली पाहिजे.
त्याने लगेचच ग्रुपवर मेसेज टाकला, आजची पार्टी कॅन्सल. खिशातले पाकीट उघडून पाहिले त्यात सत्तर रुपये होते. एक केरसुणी पण कोपऱ्यात उभी होती. आता नवा खेळ रंगणार होता. तो आळीपाळीने दोन्ही बंद दरवाज्यांकडे बघत होता ज्यावर पाट्या होत्या -

कथाशंभरी - सण - देवीका

Submitted by देवीका on 6 September, 2022 - 07:35

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय,

आज इतक्या वर्षांनी आपण दोघी एकत्र येवु असे वाटलेच नाही.
काय करणार, साहेबांचा मूड. सगळंच सोडलं ना त्यांनी.
त्यात त्यांच्या सचिवाची भारीच लुडबुड.
हो, ना. आगावू आहे खरा.

विषय: 

कथाशंभरी २- अंधश्रद्धा - अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 5 September, 2022 - 07:30

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले
आणि
स्वतःशी हसत घरात परतला.
भुताट्कीच्या घरात रात्रभर राहतो म्हणून काल संध्याकाळी तिथे रहायला आलेला अंधश्रद्धा हटाव समितीचा तरूण कार्यकर्ता त्याला आठवला.
माझ्या घरातून त्या घरातल्या पलंगाखालच्या लादीत उघडणारे भुयार खोदले असेल हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.
रात्री बाराच्या ठोक्याला आपण पलंगाखालून पहारीने ठोकत हसायला लागलो तेव्हा दमच तोडला घाबरटाने.
वाईट तर झालंच बिचार्‍याचं पण रघू मान्त्रिकाशी पंगा घ्यावाच का म्हणतो मी?
जाऊंदे..झालंं ते झालं.
बरीच कामं पडलीयेत

कथाशंभरी - रग -मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 3 September, 2022 - 12:53

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. …

तिघे-चौघे मवाली दिसणारे टगे एका सभ्य पांढरपेशी माणसाला उगाच छळत होते.

त्या दोघींचे रक्त खवळलं. एकामेकींकडे बघत त्यांनी सांकेतिक इशारा केला आणि पहिल्या मजल्यावरच्या टेरेसमधून उडी मारत त्यांनी त्या तरूणांना बुकलायला सुरूवात केली.

कॅालेजची दुसर्यांवर अन्याय होताना पाहून खवळणारी रग आणि धग अजून कमी झाली नव्हती.

कथाशंभरी - गॅासिप - मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 3 September, 2022 - 10:35

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

तिच्या घशाला कोरड पडली, हात-पाय थरथरू लागले,पोटात गोळा आला.

हे बघून आश्चर्याने दुसरी पुढे झाली आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. शेजारच्या भिंतीला हात धरून ती कशी-बशी बसली आणि तिने घटाघटा पाणी प्यायलं.

ठार बहिर्या सासूबाईंना ऐकायला जाणार नाही म्हणून दोघी जावा बिनधास्त इतका वेळ उखाळ्या-पाखाळ्या काढत होत्या. तिथेच सासूबाई त्यांचं कानाचं भारीतील नवीन यंत्र घालून शांतपणे रेडिओ ऐकत बसल्या होत्या.

कथाशंभरी- सनी- मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 3 September, 2022 - 05:59

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

एक खडखड वाजणारी निळी सनी गेटमधून आत येत होती. २०२२ मधे कोणी सनी चालवत असेल या गोष्टीचं फिसक्कन हसूच आलं सीमाला.
टेरेसमधे थोडं पुढे जाऊन तिने बघितलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.
तेवढ्यात मुग्धा पुढे आली आणि म्हणाली “अगं, हा समीर, माझा नवरा”.
सीमाच्या चेहर्यावरचे विचित्र भाव पाहून ती पुढे म्हणाली “अगं, हा दर १४ फेब्रुवारीला त्याची जुनी-पानी सनी चालवायला बाहेर काढतो”

Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  २०२२