Container gardening - कोथिंबीर

Submitted by अक्षता08 on 21 June, 2020 - 01:39

कोथिंबीर घरी लावताना बागकामाची खूप कमी माहिती असूनसुद्धा आपण यशस्वीपणे कोथिंबीर लावू शकतो. कोथिंबिरीची मुळं जास्त खोलवर जात नसल्यामुळे उथळ व पसरट कुंडी घ्यावी. कोथिंबीरीच्या बिया/ धणे घरी उपलब्ध असतील तर ते वापरू शकतो किंवा नर्सरीमध्येही कोथिंबिरीच्या बिया /धणे मिळतात (त्यांचा germination rate जास्त असतो). कोथिंबीरीसाठी माती तयार करताना माती,कोकोपीट आणि शेणखत ह्यांचे (५०:२५:२५) असे प्रमाण घ्यावे. परंतु, फक्त मातीत सुद्धा कोथिंबीर चांगल्या प्रकारे लागते. धणे घेताना ते थोडे भरडून घ्यावे म्हणजेच एका धण्याचे दोन भाग करून घ्यावे. व तसेच मातीत पेरावे किंवा १-२ तास पाण्यात ठेवून मग मातीत पेरावे. धणे पेरताना एकमेकांमध्ये अंतर ठेवून पेरावे. दोन बियांमध्ये कमी अंतर राहिल्यास कोथिंबिरीच्या पानांची वाढ होत नाही. ५-६ दिवसात अंकूर फुटतात व ३०-४० दिवसांमध्ये आपण कोथिंबीर कधीही harvest करू शकतो. कोथिंबिरीची फुलं दिसेपर्यंत आपण कोथिंबीर harvest करू शकतो. दर पंधरा दिवसांनी शेणखत किंवा आणि Neem cake Powder खत म्हणून वापरावे.
भरपूर सूर्यप्रकाश (direct sunlight), दररोज पाणी (पावसाळ्यात एक दिवसाड) आणि दर १५ दिवसांनी खत ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी सहजरित्या कोथिंबीर मिळू शकते

123.jpegCollageMaker_20200621_101948112.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त
माझ्याकडे सूर्यप्रकाशाचा प्रॉब्लेम आहे. खिडकीत जेवढं ऊन येत तेवढंच ऊन. त्यामुळे झाडं जगत नाहीत

मी कोथिंबीर लावली त्याला लगेचच धणे आले. पाने कमी वाटली. हे कोथिंबिरीच्या प्रकारावर अवलंबून असते का?

माझ्याकडे पण उन्हे कमीच आहेत. वॉशिंग मशीन आहे बाल्कनीत त्यावर ठेवता येइल पण तो खाउ ठेवला आहे असे समजून पक्षी नक्की खाउन टाकतील. पण हे करणे बल आहे. लॉक डाउन मध्ये फार टेन्शन घेतले आहे कोथिंबिरी पायी.

कोथींबिरीला किती ऊन चालतं / लागतं हे ट्रायल एररनीच शोधावे लागते.

ऊन जास्त झालं तर फुलं / धने पटकन येऊन जातात.

तेव्हा फिल्टर्ड सन , घरात, खिडकी जवळ योग्य होईल. उजेड कमी वाटला तर जवळ दिवा ठेवायला हरकत नाही. रोज २-३ तास दिव्याचा चांगला उजेड मिळाला तर झाड वाढेल चांगलं.

अमा, बाल्कनीत ठेवा. नुसती जाळीची , भाज्या धुवायची चाळणी पालथी घाला. किंवा अ‍ॅल्युमिनीयम फॉईलच्या झिरमिळ्या खराट्याच्या काडीला चिकटवून , त्या काड्या कुंडीत खोवून ठेवा.

कोथिंबीरीला थंड, कोरडी हवा आणि भुसभुशित माती लागते. कमी पाणी.
मुंबई किनारपट्टीच्या ऊष्ण दमट हवेला मान टाकते. मरगळते ( कांद्याचंही तसंच)
डिसेंबर - जानेवारीत बाजारातून आणलेल्या कोथिंबीरीच्या काड्या पाने काढून कुंडीत रोवल्या तरी वाढते. १५ फेब्रुवारी लास्ट डे. मग काढून टाकतो.

वरच्या मजल्यांवर राहणार्‍या घरांमध्ये जो वारा येतो त्याने सुरुवातिच्या दिवसात रोपे नीट उभी रहात नाहीत असे पाहिले आहे. यावर कोणी काही उपाय केला आहे काय?

@विनिता.झक्कास

मस्त दिसत आहे तुम्ही लावलेली कोथिंबीर Happy Happy

@जाई.
धन्यवाद Happy
तुम्ही टोमॅटो लावून बघू शकता (टोमॅटोला कमी ऊनही चालतं).

@चंपा
खडा मसाल्या मधले धणेही वापरु शकता

@मामी
धन्यवाद Happy

@शुगोल
सहमत !
(कोथींबिरीला किती ऊन चालतं / लागतं हे ट्रायल एररनीच शोधावे लागते.)

@Srd
होय. November to Feb कोथिंबीर कही कष्ट न घेता बहरते

@निर्झरा
मस्तच ! Happy

@अनिश्का.
धन्यवाद Happy
नक्की करून बघा !!

धन्यवाद अक्षता Happy
भाजीत घातली होती, ताजी ताजी, करकरीत मस्त लागली.

मी धने पेरुन ८ दिवस झाले तरी काहिच उगवल नाही, त्याबरोबरच मेथी पेरली होती त्याची रोप सुद्धा झाली , आमच्याकडे सध्या मस्त वातावरण आहे, गॅलरीत व्यवस्थित उन येत.सकाळच्या कोवळ्या उन्हापासुन ते दुपारपर्यत छान उन लागतय.

@प्राजक्ता
कधी कधी १०-१५ दिवसांनी अंकुर येतात. अख्खे धणे असतील किंवा धणे जास्तच भरडले गेले तर कोंब नाही येत